Home Uncategorized Bihar Election: ‘तेजस्वी’ झळकणार अन् ‘नितीश’जींची पिछेहाट होणार!

Bihar Election: ‘तेजस्वी’ झळकणार अन् ‘नितीश’जींची पिछेहाट होणार!

45
0

पुणे : बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीशकुमार यांना ‘अँटी इन्कम्बन्सी’चा फटका बसणार असून राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तेजस्वी यादव यांना मोठे पाठबळ मिळेल, अशी चिन्हे मतदानादरम्यानच दिसत होती. ‘जेडीयू’पासून भाजपने अंतर राखून प्रचार केल्याचा त्यांना फायदा झाला, असे ‘मिटसॉग’तर्फे पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.१०) सांगण्यात आले.

– कमी जागा मिळूनही नितीश CM बनतील का? जेडीयूने दिलं उत्तर

कोरोनानंतरची पहिल्या निवडणुकीची पाहणी करण्यासाठी ‘एमआयटी’च्या ‘मिटसॉग’चे वरिष्ठ संचालक रवींद्रनाथ पाटील, प्रा. महेश साने आणि 11 विद्यार्थ्यांनी 27 ऑक्‍टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान बिहारचा दौरा केला. पाटना, छपरा, नालंदा, गया जिल्ह्यांतील सुमारे 55 मतदारसंघांना त्यांनी भेट दिली. मतदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ‘मिटसॉग’ने तेथील राजकीय नेते आणि कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांशी त्यांनी संवाद साधला होता.

बिहारमध्ये नितीशकुमार यांचे सरकार सलग 15 वर्षे सत्तेत होते. ‘अँटी इन्कम्बन्सी’चा फटका बसेल, अशी चिन्हे दिसत होतीच. तसेच तेजस्वी यादव यांची युवकांमध्ये ‘क्रेझ’ होती, असे जाणवले. सोशल मीडियाचा यादव यांनी प्रभावीपणे वापर केला. तसेच त्यांच्या झंझावती प्रचारसभांमुळेही निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात वातावरण ढवळून निघाले, अशी माहिती पाटील यांनी दिली.

– Bihar Election: बिहारमध्ये आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही; शरद पवारांचा टोला

नितीशकुमार यांच्या ‘जेडीयू’ला काही प्रमाणात फटका बसेल, अशी चिन्हे असल्यामुळे प्रचारात भाजपनेही त्यांच्यापासून काही अंतर राखले होते. भाजपने त्यांच्या प्रचारसाहित्यावर जाणीवपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे मुबलक प्रमाणात वापरली. मोदी आणि नितीशकुमार यांची छायाचित्रे असलेले फ्लेक्‍स अभावानेच आढळले, असेही त्यांनी सांगितले. ‘आरजेडी’ने जागा वाटपात कॉंग्रेसला 70 जागा दिल्या. मात्र, कॉंग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे प्रचारातही दिसत होते. त्याचाही फटका ‘आरजेडी’ला अप्रत्यक्षपणे बसला, असेही निरीक्षण पाटील यांनी नोंदविले.
कोरोनाचा फटका मतदानाला बसला नाही, असेही निरीक्षण त्यांनी नोंदविले.

– #BoycottAmazon : नेटकरी संतापले; अॅमेझॉनवर हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्र, पायपुसण्या​

पुण्यात कोरोनाचे सुमारे साडेतीन लाख रुग्ण होते. परंतु, संपूर्ण बिहारमध्ये 2 लाख 15 हजार पेक्षा जास्त रुग्ण नव्हते. पाटणा शहराच्या बाहेर तर कोठेही मास्क वापरण्याचे प्रमाण जास्त नव्हते. बिहारमध्ये कोरोनाचा संसर्ग फारसा नसल्यामुळे तेथे कोरोना, लॉकडाउन हे मुद्दे प्रचारात फारसे नव्हतेच. मात्र, भाजपने ‘जंगलराज के युवराज’ ही तेजस्वी यादव यांना उपमा दिल्यावर, त्यांनी ‘नितीशकुमार थकले आहेत, त्यामुळे युवक बेरोजगार झाले आहेत, आता बदल हवा आहे’ अशी घोषणा दिली. ती युवकांना भावल्याचेही दिसून आल्याचे पाटील आणि प्रा.साने यांनी सांगितले.

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

News Item ID: 
599-news_story-1605018241-awsecm-958
Mobile Device Headline: 
Bihar Election: ‘तेजस्वी’ झळकणार अन् ‘नितीश’जींची पिछेहाट होणार!
Appearance Status Tags: 
Bihar Election 2020 MITSOG comment about Tejashwi Yadav and Nitish Kumar (Image Source :Google)Bihar Election 2020 MITSOG comment about Tejashwi Yadav and Nitish Kumar (Image Source :Google)
Mobile Body: 

पुणे : बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीशकुमार यांना ‘अँटी इन्कम्बन्सी’चा फटका बसणार असून राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तेजस्वी यादव यांना मोठे पाठबळ मिळेल, अशी चिन्हे मतदानादरम्यानच दिसत होती. ‘जेडीयू’पासून भाजपने अंतर राखून प्रचार केल्याचा त्यांना फायदा झाला, असे ‘मिटसॉग’तर्फे पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.१०) सांगण्यात आले.

– कमी जागा मिळूनही नितीश CM बनतील का? जेडीयूने दिलं उत्तर

कोरोनानंतरची पहिल्या निवडणुकीची पाहणी करण्यासाठी ‘एमआयटी’च्या ‘मिटसॉग’चे वरिष्ठ संचालक रवींद्रनाथ पाटील, प्रा. महेश साने आणि 11 विद्यार्थ्यांनी 27 ऑक्‍टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान बिहारचा दौरा केला. पाटना, छपरा, नालंदा, गया जिल्ह्यांतील सुमारे 55 मतदारसंघांना त्यांनी भेट दिली. मतदानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ‘मिटसॉग’ने तेथील राजकीय नेते आणि कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांशी त्यांनी संवाद साधला होता.

बिहारमध्ये नितीशकुमार यांचे सरकार सलग 15 वर्षे सत्तेत होते. ‘अँटी इन्कम्बन्सी’चा फटका बसेल, अशी चिन्हे दिसत होतीच. तसेच तेजस्वी यादव यांची युवकांमध्ये ‘क्रेझ’ होती, असे जाणवले. सोशल मीडियाचा यादव यांनी प्रभावीपणे वापर केला. तसेच त्यांच्या झंझावती प्रचारसभांमुळेही निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात वातावरण ढवळून निघाले, अशी माहिती पाटील यांनी दिली.

– Bihar Election: बिहारमध्ये आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही; शरद पवारांचा टोला

नितीशकुमार यांच्या ‘जेडीयू’ला काही प्रमाणात फटका बसेल, अशी चिन्हे असल्यामुळे प्रचारात भाजपनेही त्यांच्यापासून काही अंतर राखले होते. भाजपने त्यांच्या प्रचारसाहित्यावर जाणीवपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे मुबलक प्रमाणात वापरली. मोदी आणि नितीशकुमार यांची छायाचित्रे असलेले फ्लेक्‍स अभावानेच आढळले, असेही त्यांनी सांगितले. ‘आरजेडी’ने जागा वाटपात कॉंग्रेसला 70 जागा दिल्या. मात्र, कॉंग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे प्रचारातही दिसत होते. त्याचाही फटका ‘आरजेडी’ला अप्रत्यक्षपणे बसला, असेही निरीक्षण पाटील यांनी नोंदविले.
कोरोनाचा फटका मतदानाला बसला नाही, असेही निरीक्षण त्यांनी नोंदविले.

– #BoycottAmazon : नेटकरी संतापले; अॅमेझॉनवर हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्र, पायपुसण्या​

पुण्यात कोरोनाचे सुमारे साडेतीन लाख रुग्ण होते. परंतु, संपूर्ण बिहारमध्ये 2 लाख 15 हजार पेक्षा जास्त रुग्ण नव्हते. पाटणा शहराच्या बाहेर तर कोठेही मास्क वापरण्याचे प्रमाण जास्त नव्हते. बिहारमध्ये कोरोनाचा संसर्ग फारसा नसल्यामुळे तेथे कोरोना, लॉकडाउन हे मुद्दे प्रचारात फारसे नव्हतेच. मात्र, भाजपने ‘जंगलराज के युवराज’ ही तेजस्वी यादव यांना उपमा दिल्यावर, त्यांनी ‘नितीशकुमार थकले आहेत, त्यामुळे युवक बेरोजगार झाले आहेत, आता बदल हवा आहे’ अशी घोषणा दिली. ती युवकांना भावल्याचेही दिसून आल्याचे पाटील आणि प्रा.साने यांनी सांगितले.

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Vertical Image: 
English Headline: 
Bihar Election 2020 MITSOG comment about Tejashwi Yadav and Nitish Kumar
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
पुणे, नितीशकुमार, Nitish Kumar, सरकार, Government, तेजस्वी यादव, मुख्यमंत्री, खून, पत्रकार, कोरोना, Corona, सोशल मीडिया, bihar, election, शरद पवार, Sharad Pawar, टोल, नरेंद्र मोदी, Narendra Modi, फ्लेक्‍स, हिंदू, Hindu, बेरोजगार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Maharashtra Pune News Bihar Election 2020 Tejashwi Yadav Nitish kumar
Meta Description: 
Marathi news about Bihar Election 2020 Tejashwi Yadav Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीशकुमार यांना ‘अँटी इन्कम्बन्सी’चा फटका बसणार असून राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तेजस्वी यादव यांना मोठे पाठबळ मिळेल, अशी चिन्हे मतदानादरम्यानच दिसत होती.
Send as Notification: 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here