Home Uncategorized 25 लाखाच्या लॉटरीपायी महिलेने गमावले 23 लाख रुपये! 

25 लाखाच्या लॉटरीपायी महिलेने गमावले 23 लाख रुपये! 

16
0

पुणे – एखाद्याने तुम्हाला लाखोंची लॉटरी लागली असे सांगून पैशांची मागणी केल्यास तुम्ही किती रुपये द्याल? फार तर 10 ते 20 हजार रुपये. परंतु एका महिलेला तिच्या मोबाईल क्रमांकावर “कोन बनेगा करोडपती’ची 25 लाखाची लॉटरी लागल्याचे अनोळखी व्यक्तीने सांगितले. तिनेही त्यांच्यावर विश्‍वास ठेवला आणि हळूहळू महिलेकडील एक, दोन नव्हे तर तब्बल 23 लाख रुपये सायबर चोरट्यांनी लंपास केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द येथे 39 वर्षीय महिला राहतात. ऑगस्ट महिन्यात त्यांना व त्यांच्या पतीला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने त्यांना आपण जिओ कंपनीतून बोलत आहोत. तुमच्याकडे असलेल्या जिओ क्रमांकाला “कोन बनेगा करोडपती’ची 25 लाखांची लॉटरी लागली आहे, असे सांगितले. त्यावर महिलेने विश्‍वास ठेवला. त्यानंतर त्याने 25 लाख रुपये मिळविण्यासाठी विविध प्रकारचे कर, विम्यासाठीचे पैसे भरावे लागतील असे महिलेला सांगितले. त्यानंतर त्यांना व्हाट्‌सअपद्वारे 25 लाखाचे तिकीट व इतर माहिती पाठवून त्यांच्याकडून वेळोवेळी 23 लाख 41 हजार रुपये घेतले. महिलेने इतकी मोठी रक्कम भरली तरीही त्यांना लॉटरीची रक्कम काही मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तींना फोन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी महिलेस उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळण्याचा प्रयत्न केला. अखेर आपली फसवणूक झाली आहे, असे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची प्राथमिक तपासणी केल्यानंतर याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार यावर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये घडला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी  
– अनोळखी व्यक्तींच्या फोन, ईमेल, मेसेजला उत्तर देऊ नका. 
– लॉटरी, गिफ्ट, सोने-चांदी, मौल्यवान वस्तू मिळण्याच्या आमिषाला भुलू नका. 
– व्हॉटसअप, फेसबुकवर आलेल्या कोणत्याही लिंकला प्रतिसाद देऊ नका. 
– अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करू नका 
– संशयास्पद फोन, मेसेजबाबत तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याला माहिती द्या 

News Item ID: 
599-news_story-1605033754-awsecm-879
Mobile Device Headline: 
25 लाखाच्या लॉटरीपायी महिलेने गमावले 23 लाख रुपये! 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
woman loses Rs 23 lakh in pune
सकाळ न्यूज नेटवर्क
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
पुणे, मोबाईल
Twitter Publish: 
Meta Keyword: 
online, pune,
Meta Description: 
सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द येथे 39 वर्षीय महिला राहतात. ऑगस्ट महिन्यात त्यांना व त्यांच्या पतीला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने त्यांना आपण जिओ कंपनीतून बोलत आहोत.
Send as Notification: 
Topic Tags: 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here