मुख्य सरन्यायाधिशांची खंत, जबाबदारीने वागण्याचा सल्ला
रांची – ज्येष्ठ न्यायाधिशांना निर्णय घेणे अवघड असणार्या अनेक प्रकरणात माध्यमे ‘अनधिकृत न्यायालये’ चालवत असल्याची खंत देशाचे सरन्यायाधिश एन. व्ही. रमणा यांनी व्यक्त केली.
रांची येथील एका कार्यक्रमात शुक्रवारी बोलताना न्या. रमणा यांनी, न्यायालयीन कामकाजावरील माध्यमांमध्ये होणारी सुनावणी आणि समाज माध्यमांमध्ये न्यायाधिशांविरूध्द होणारा प्रचार याबद्दल चिंता व्यक्त केली. न्यायाधिशांच्या ‘आरामदायी जीवना’विषयी फूगवून काही गोष्टी पसरवल्या जात असतात. त्यावेळी न्याय करणे ही सोपी आणि सहज गोष्ट रहात नाही, असे ते म्हणाले.
न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणाबाबत माध्यमांमध्ये माहिती नसताना, एकतर्फी आणि ठरवून घडवलेल्या चर्चांमुळे न्यायदानावर परिणाम होत आहे. माध्यमांच्या नव्या प्रकारात विकसित होण्याची प्रचंड क्षनता आाहे. मात्र, सध्या त्यांमध्ये चुक किंवा बरोबर, चांगले किंवा वाईट आणि सत्य किंवा असत्य यातील फरक ओळखण्याची क्षमता नसल्याचे दिसून येते, असेही निरीक्षण रमणा यांनी नोंदवले.
मुद्रीत माध्यमांमध्ये अद्याप काही उत्तरदायित्वाची भावना आहे. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये शून्य उत्तरदायित्व असते. जणू ते काही दाखवतात ते हवेतच विरून जात असते. वारंवार होणारे उल्लंघन आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक अस्वास्थ्य यामुळे माध्यामांवर अधिक कडक नियम आणि आचारसंहितेची मागनी होत आहे. मात्र माध्यामांनीच शब्द जपून वापरावेत आणि स्वत:च बंधने घालून घ्यावीत, हे त्यांच्यासाठी योग्य राहील, असा सल्लाही त्यांनी दिला.
न्यायधिश कदाचित तातडीने व्यक्त होत नसतील, पण ही त्यांची कमजोरी किंवा असहायता समजू नका, जेंव्हा स्वातंत्र्याचा वापर जबाबदारी केला जातो त्यावेळी बाह्य निर्बंधाची गरज नसते अशा शब्दात त्यांनी माध्यमांना उपदेश केला.
लखनौ- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आादित्यनाथ यांची छायात्रित्रे कचर्याच्या गहाडीतून नेल्यामुळे एका कचरावेचकाच्या नोकरीवर गदा आली. दरम्यान या प्रकरणात आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षक यांना कचरावेचकांनाा मान्यवर आणि लोकप्रतिनिधी यांच्या प्रतीमांच्या हाताळखणीबाबत माहिती न दिल्याबद्दल नोटीस बजाचण्यात आली आहे.
आपण अशिक्षीत असल्याने आणि छायावित्रे ओळखू न शकल्याने हा प्रकार घडला, असे या कचरावेचकाने सांगितल्याचे महापालिकेतील अधिकार्याने सांगितले. मथूराचे महापालिका आयुक्त अनुनय झा यांनी सांगितले की, या प्रकरणात सत्यशोधन समिती नेमण्यात आली आहे. या समितीला ४८ तासांत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आला आहे. हा अहवाल आल्यानंतरच अंतीम निर्णय घेण्यात येईल.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरा संकलन केंद्रातून बॉबी हा कचरा घेऊन जात होता. त्या कचर्याच्या गाडीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे होती. बॉबीला राजस्थानमधून आलेल्या दोघांनी अडवले. कचरावाहक वाहनातून ही छायाचित्रे काढून त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे सहज ओळखता येतात. त्यामुळे बॉबीला निलंबीत करण्यात आले मात्र त्याच्या नुकसानभरपाईबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेण्यात येईल.
पाकिस्तानातील पत्रकारांचाच अन्सारींवर आरोप करणार्यावर अविश्वास
नवी दिल्ली – पाकिस्तानी पत्रकाराला माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी भेटले आणि नंतर या पत्रकाराने पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयला माहिती हस्तांतरीत केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने समाज माध्यमाद्वारे केल्यानंतर खळबळ उडाली होती. प्रत्यक्षात पाकिस्तानातील पत्रकारीतेत या पत्रकाराची ओळख आढ्यताखोर, प्रसिध्दीलोलूप आणि कटाचे काहीतरी कल्पोकल्पीत सिध्दांत मांडणारा अशी आहे. त्याच्या वक्तव्यावर पाकिस्तानातील पत्रकारांचा विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे. या पत्रकराने २००५ मध्ये झालेला भूकंप आणि २०११ मध्ये जपान मध्ये आलेली सुनामी ही अमेरिकेने घडवलेला कट होता अशी मांडणी करून खळबळ माजवून दिली होती.
नुसरत मिर्झा हे काराचीस्थित पत्रकार नवा इ वक्त आणि जंग या दैनिकात स्तंभलेखन करतात. सध्या ते एका टिव्ही चॅनेलवर एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी या मिर्झाला हमीद अन्सारी यांनी निमंत्रीत केले आणि गोपनीय माहिती हस्तांतरीत केल्याचा आरोप समाजमाध्यमांतून केला. अन्सारी यांनी हे आरोप फेटाळून लावत हा खोडसाळपणा आणि खोटारडेपणा असल्याचे स्पष्ट केले होते.
भाटीया यांनी पाकिस्तानी युट्यबर शकील चौधरी यांनी मिर्झा यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा उल्लेख केला. त्या मुलाखतीत मिर्झा यांनी अन्सारी यांचा दोनदा ओझरता उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी अन्सारी यांच्याशी कोठेेही संवाद साधल्याचाा उल्लेख केला नाही. पहिल्या उल्लेखात मिर्झा म्हणतात, २०१० मध्ये मी दहशतवादावरील परिषदेसाठी भारतात गेलो. त्यावेळी हमीद अन्सारी हे उपराष्ट्रपती होते असे म्हटले आहे.
त्यावरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक हल्ला चढवला. त्याला उत्तर देताना अन्सारी म्हणाले, आंतराराष्ट्रीय दहशतवाद आणि मानवी हक्क यांवरील न्यायाधिशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्धाटन मी केले होते. त्यावेळी निमंत्रीतांची यादी आयोजकांनी बनवली होती. आपण मिर्झाला निमंत्रितही केले नाही अथवा त्याला भेटलोही नाही.
आपल्या मुलाखतीत दुसर्यांदा अन्सारी यांचा उल्लेख करताना, मी अन्सारी यांच्यासह अनेक काँग्रे्रस नेत्यांना भेटलो. पण यातही त्याने अन्सारी यांच्याशी चर्चा केल्याचा कोणत्याही तपशीलाचा उल्लेख केला नाही. मिर्झा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी केलेल्या फोनकॉलला कोणताही प्रतीसाद दिला नाही, असे इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटले आहे.
या मुुलाखतीत मिर्झाने स्वत:चा उल्लेख भारतविषयक तज्ज्ञ असा केला आहे. २००५ आणि २००६ मध्ये भाारताला दिलेल्या भेटीत आपण अनेक शहरांना भेट दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या ५० मिनिटांच्या मुलाखतीत मिर्झाने आपल्या भाारत विषयक माहिती आणि अनुभवाला पाकिस्तानात कोणीही गांभीर्याने घेतले नाही आणि तरीही त्याकाळात सामरिक बाबतीत आपण महत्वाची कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. पाकिस्तानला भारतापासून सध्या धोका असताना पाकिस्तानात कोणी भारतविषयक तज्ज्ञ का नाही? या प्रश्नावर मिर्झाा म्हणताात आपल्याला भारताविषयी, भारतीय मुस्लीमांविषयी माहिती आहे. त्यातील काही आपले चांगले मित्रही आहेत. २००६ नध्ये आपण भारतातील अनेक शहरांना भेट दिल्यानंतर त्यावेळचे पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसौरी यांनी आपल्याला सात देशांचा व्हिसा मिळवून दिला. (त्यावेळि पाकिस्तानी पर्यटकांना अधिकाधिक तीन शहरांसाठी व्हिसा मिळत असे) कसौरी यांनी मला आयएसआयचे महासंचालक अशफाक परवेझ कयानी यांना भेटण्यास सांगितले होते.
मी सांगितले, मी कयानींना भेटण्यास जाणाार नाही. तुम्हीच त्यांना ते करण्यास सांगा. त्यानंतर काही दिवसांनी एका ब्रिगेडीयरचा मला फोन आला. तुमच्याकडे काही अधिक माहिती आहे का? असे त्याने विचारले. मी म्हणालो, माझ्याकडे अतिरिक्त माहिती नाही. मी पुरेशी माहिती दिली आहे त्यावर काम करा.
पाकिस्तानला भारत चांगला माहिती आहे. कारण आपण मुगलांचे वंशज आहोत. आपण त्यांच्यावर राज्य केल आहे.
पाकिस्तानातील पत्रकार मात्र कसौरी हे मिर्झा सारख्या व्यक्तीशी चर्चा करत असल्याबद्दल अविश्वास दाखवतात. कसौरी यांच्या खास मर्जीतील पत्रकारांनी मिर्झा अथवा कसौरी यांनी एकमेकांविषयी कधीही काहीही बोलल्याचे आठवत नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचे हे कथानक येथेच खोटे असल्याचे स्पष्ट होते, असे पाकिस्तानातील एका अनुभवी आणि अभ्यासू पत्रकाराने सांगितले. मिर्झा यांचे नाव हल्ली पत्रकारांमध्ये फाारसे घेतलेही जात नाही. त्यामूले त्यांनी केलेल्या कामापेक्षा अधिक वाढवून आणि चढवून ही कथा रंगवली असावी, असे मत अन्य एका पत्रकाराने व्यक्त केले.
मुंबई – महिलेला तिचा मुलगा किंवा करीयर यातील एक निवडण्यासाठी बळजबरी करता येणार नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने एका महिलेला नोकरी मिळाल्याने पोलंडला आपल्या मुलीसह जाण्याची परवानगी दिली.
याबाबत कनिष्ट न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करताना न्या. भरत डोंगरे यांनी व्यावसायिक हिताच्या हक्काकडे डोळेझाक करता येणार नाही, असे स्पष्ट केले. ‘व्यक्तीगत विकासाच्या महत्वाच्या मुद्द्याकडे कनिष्ठ न्यायाालयाच्या निर्णयात डोळेझाक करण्यात आली आहे. महिलेला मुलगा आणि करीयर यातील एकाची निवड करण्याची बळजबरी करता येणार नाही, त्यामूळे कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत आहोत, असे निकालात नमूद केले.
या निकालात, मुलीचा पुरेसा वेळ वडिलांना मिळावा. मात्र ती भाारताबाहेर असल्याने तीची अनुपस्थिती भरून काढण्यासाठी रात्रीही संवादास अनुमती देण्यात यावी. याचा अर्थ मुलीला देत असलेला वेळ हा अधिक असावा असा नसून तो दर्जात्मक असावा. त्याच्यातून त्यांच्यातील पालकत्वाचे नाते विकसित व्हावे, असे न्यायालयाने त्या निर्णयात स्पष्ट केले.
हिवाळ्या सुटीत ही माता आाणि मुलगी भारतात परतल्यानंतर वडीलांना मुलीचा दिवसातील तीन तास वेळ आणि रात्रभर वेळ मंजूर करण्यात आला. उन्हाळ्याच्या सुटीत ती वडिलांकडे चार दिवस राहू शकेल. आणि दिवसातील पाच तास त्यांना एकत्र व्यतीत करता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या या मुलीचे वडील तीला वेळ देऊ शकतात. ते तिला नियमीत अंतराने भेटू शकतात. त्यामुळे तिच्या भवितव्याची काळजी त्यांना वाटणे साहजिक आहे. पोलंडला गेल्यानंतर त्यांच्यातील नात्यात काहीसा दुरावा निर्माण होउ शकतो, ही खरी या पित्याची चिंता असल्याचे निरीक्षण नोंदवले.
व्यवसायाने अभियंता असणार्या या महिलेने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात अर्ज करून या मुलीचे पूर्ण पालकत्व मिळावे आणि मुलीला सोबत पोलंडला घेऊन जाण्याची परवानगी मिळावी त्यात तिच्या पतीने आणि वडिलांनी व्हिसासाठी हरकत घेऊ नये, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती ती फेटाळण्यात आली. त्यावेळी तीला उच्च न्यायालयात जाण्यास सुचवण्यात आले होते.
मुंबई – शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावरील मनी लाँड्रीगच्या आरोपांच्या चौकशीची तपासणी करण्यासाठी एक केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. त्यांनी परब यांच्या रिसॉर्टचे बांधकाम करत असताना सागरी सीमा सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याचीही तपासणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी न्यूज मेट्रोला सांगितले. या घटनेचे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
परब यांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दापोली (जि. रत्नागिरी) येथील त्यांच्या रिसॉर्टच्या बांधकामाप्रकरणी अंमलबजावणी संचनालयाने सलग तीन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांना केंद्रीय पथकाकडून लक्ष्य बनवले जात असल्याची जोरदार टीका राजकीय वर्तुळात झाली होती. यापुर्वी ठाकरे यांचे विश्वासू निकटवर्तीय संजय राऊत यांचीही अंमलबजावणी संचनालयाने चौकशी केली होती.
अंमलबजावणी संचनालयाच्या दबावापाोटीच महाराष्ट्रातील आघाडी सरकार कोसळले. त्यामागे केंद्रीय यंत्रणांचा वापर करूनब घेत असल्याची टीका होत होती. त्याला उत्तर देताना शिंदेसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असल्याची कोपरखळी मारली होती.
दुर्मिळ रक्तगट असणारा व्यक्ती पहिल्यांदाच भारतात आढळला
नवी दिल्ली – जगात अत्यंत दुर्मिळ असणारा रक्तगट पहिल्यांदाच भारतात सापडला आहे. गुजरातमधील एका ६५ वर्षीय रुग्णाचा रक्तगट इएमएम निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. जगभरात मान्य असणार्या ए, बी, ओ किंवा एबी या नेहमीच्या रक्तगटांपेक्षा हा रक्तगट वेगळा आहे.
सामन्यत: माणसात चार प्रकारचे रक्तगट असतात. त्याचे पुन्हा ४२ उपप्रकार पडतात जसे की ए, बी, ओ आरएच आणि डफी. त्यात इएमएम अधिक असणारे ३७५ अॅटीजेनही असतात.
जगभरात दहा व्यक्ती अशा आहेत की ज्यांच्या रक्तगटात इएमएम हे अॅटीजेन आढळले नाही. त्यामुळेच या व्यक्तीचे रक्त अन्य माणसांपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे असा रक्तगट असणारी माणसे कोणाचेही रक्त स्वीकारू शकत नाहीत किंवा ते देऊ शकत नाहीत. अतापर्यंत जगात केवळ नऊ व्यक्तींमध्येच असा रक्तगट आढळला आहे. पण आता गुजरातमधील राजकोट येथे एका ६५ वर्षीय व्यक्तीमध्ये असा रक्तगट आढळला आहे.
सुरतमधील समर्पण तक्तदान केंद्रातील डॉक्टर सन्मूख जोशी यांनी सांगितले की, या ६५ वर्षीय रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर उपचार करताना त्याला रक्त देण्याची गरज निर्माण झाली. त्यावेळी अहमदाबादमधील प्रथम लॅबोरेटरीमध्ये हा रक्तगट उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यामुळे त्यांच्या रक्ताचा नमुना सुरतला पाठवण्यात आला.
तपासणीत त्यांचा रक्त गट कोणत्याच रक्तगटाशी जुळत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे रक्ताचे नमुने त्यांच्या नातेवाईकांसह अमेरिकेला पाठवण्यात आले. तेथे केलेल्या चाचणीत या ज्येष्ठ नागरिकाचा रक्तगट वेगळा असल्याचे निष्पन्न झाले. हा दुर्मिळ रक्तगट असणारा भारतातील पहिला तर जगातील दहावा व्यक्ती ठरला आहे.
या रक्त गटात असणार्या इएमएमच्या अभावामुळे आंतरारष्ट्रीय रक्तसंक्रमण समुदायाने या रक्तगटाचे नाव इएमएम निगेटिव्ह ठेवले आहे.
ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना पत्रकार महर्षी प्र. के. अत्रे पुरस्कार
पिंपरी –
सुदृढ, समृद्ध व तीक्ष्ण पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काळेवाडी येथे पुरस्कार सोहळ्यात केले. मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना “पत्रकार महर्षी प्र. के अत्रे पुरस्कार 2022” देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्ही.एस.आर.एस न्युज मीडिया ग्रुपचे मुख्य संपादक डॉ. लालबाबू गुप्ता, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, शहराध्यक्ष दादाराव आढाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना गिरीश प्रभुणे म्हणाले पुढे म्हणाले की, सध्याच्या आधुनिक युगामध्ये पत्रकारितेची बिकट वाट सुरू आहे. पत्रकारांनी स्वतःचा तोल स्वतःच सावरावा लागतो, कोणीही मदतीला येत नाही. मी स्वतः पत्रकारिता केली असून आठ पानाचे साप्ताहिक वर्तमानपत्र प्रकाशित करत होतो. मी सडेतोड लेख लिहिल्यामुळे माझ्या घरावरही हल्लेखोरांनी हल्ले केले आहेत. पत्रकारांनी सत्यतेची कास सोडू नये.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. लालबापू गुप्ता आपल्या भाषण म्हणाले की “राजकारण, समाजकारण व प्रशासनामध्ये न्याय मिळत नसेल तर शेवटी पत्रकारांकडे धाव घेतात. हा जो पत्रकारांप्रती विश्वास आहे तो विश्वास पत्रकारांनी कायम ठेवला पाहिजे.
कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती विजय भोसले सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड शहर संघटना ही जरी नवीन असली तरी संघटनेत काम करणारे पदाधिकारी जुनेच आहेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे हे पत्रकारांसाठी गेली अनेक वर्षे काम करत आहेत. बापूसाहेब गोरे यांनी कोरोनाच्या भीषण काळात पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या घरोघरी जाऊन अन्नधान्य कीट वाटप केले हा त्यांचा उपक्रम महाराष्ट्रात कौतुकास्पद ठरला आहे.
यावेळी माजी नगरसेवक कैलास थोपटे, युवक काँग्रेसचे शहरध्यक्ष नरेंद्र बनसोडे, आरपीआयचे अजीज शेख, काँग्रेसचे अशोक मोरे, बी.आर.माडगूळकर उपस्थित होते. या वेळी अध्यक्ष – दादाराव आढाव,वरिष्ठ उपाध्यक्ष – संतलाल यादव, उपाध्यक्ष – महेश मंगवडे, संजय बोरा,सरचिटणीस – सुनील कांबळे, चिटणीस – श्रध्दा कोतावडेकर/कामथे, कोषाध्यक्ष- जितेंद्र गवळी, कार्यकारणी सदस्य – सायली कुलकर्णी, विनोद लोंढे, संतोष जराड, विश्वास शिंदे, सदानंद रानडे, कलिंदर शेख, अमोल डांबळे, मनीषा प्रधान, श्रद्धा प्रभुणे, प्रितम शहा, गणेश शिंदे, मुकुंद कदम, अतुल वैराट, मोहन दुबे, सुहास आढाव या नूतन कार्यकारणीचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे, नरेश नातू, यशवंत नामदे, विकास चौधरी इत्यादी उपस्थित होते
कार्यक्रमाची प्रस्तावना बापूसाहेब गोरे यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिध्द निवेदक अक्षय मोरे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष दादाराव आढाव यांनी मानले.