पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनाकाळात भोसरी येथील रामस्मृती व हिरा लॉन्स येथे कोविड सेंटर उभारण्यासंदर्भात स्पर्श हॉस्पीटलला आदेश दिले होते. मात्र सदर ठिकाणी कोणतीही सुविधा न उभारता तसेच त्या ठिकाणी एकाही रुग्णावर उपचार न करता स्पर्श हॉस्पीटलने महापालिकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने महापालिकेला बिल सादर केले होते. या बिलाला स्थायी समितीची मान्यता न घेताच तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित बाबुराव पवार यांनी अत्यंत घाईने स्पर्श हॉस्पीटलला ३ कोटी १४ लाख रुपयांचे बिल अदा केले होते. कोरोना साथीचा गैरफायदा घेत महापालिकेच्या पैशांचा गैरप्रकार केल्याचा प्रकार समोर आला होता.
मुंबई –
राज्यात कोकणात मान्सूनला सुरूवात झाली असली तरी तो राज्यातील इतर भागात पोहोचण्यासाठी विलंब लागत आहे. दरम्यान, कालपासून नंदूरबार, जळगाव, परभणी या परिसरात मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली आहे. मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याचे आयएमडीकडून सांगण्यात आले आहे. परंतु कोकणानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात मान्सूनला सुरूवात होते. यंदा मात्र मान्सूनचा पाऊस या भागात झाला नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकरी खरिपाची पेरणी करण्यासाठी थांबला आहे. तर हवामान खात्याच्या माहितीनुसार 75 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
10 जूनला कोकणात पोहोचलेला मॉन्सून 11 जून रोजी बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात डेरेदाखल झाला. तर सोमवारी मॉन्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठला.
निम्म्या महाराष्ट्रासह दक्षिण गुजरात, कर्नाटकचा बहुतांश भाग तेलंगाणा, रायलसीमाचा काही भाग आणि तमिळनाडूच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने चाल केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. शुक्रवारपर्यंत (ता. 17) गुजरातच्या आणखी काही भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक तामिळनाडूसह विदर्भाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या आणखी काही भागासह झारखंड, ओडिशा, बिहार काही भागातही मॉन्सून प्रगती करण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.
मुंबई –
शरीराचे एकूण आरोग्य राखण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक मानले जाते. तोंडी स्वच्छता म्हणजे तोंड, दात, हिरड्या आणि जीभ तसेच शरीराच्या इतर अवयवांची स्वच्छता राखणे आवश्यक मानले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, परंतु अभ्यास देखील पुष्टी करतात की तोंडाची स्वच्छता, विशेषत: दात स्वच्छ करण्याची सवय, हृदय आणि मानसिक रोगांच्या जोखमीपासून सुरक्षित ठेवण्यात विशेष भूमिका बजावू शकते. संशोधन असे सूचित करते की जे लोक नियमितपणे ब्रश करत नाहीत त्यांना दात किडणे आणि हिरड्यांच्या समस्या तसेच हृदयरोग आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या मानसिक आजारांचा धोका वाढू शकतो.
आरोग्य तज्ञांच्या मते, तोंडाचा भाग अनेक प्रकारच्या जीवाणूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वात अनुकूल आहे. त्यामुळेच तोंडाच्या स्वच्छतेची नियमित काळजी घेणे गरजेचे बनले आहे. आदर्श ओरल स्वच्छतेसाठी, आरोग्य तज्ञ सकाळी आणि संध्याकाळी दात घासण्याची आणि काही खाल्ल्यानंतर लगेच तोंड स्वच्छ धुण्याची शिफारस करतात. तोंडाच्या अस्वच्छतेमुळे हृदय आणि मानसिक रोग कसे होऊ शकतात याबद्दल अधिक तपशीलवार जाणून घेऊया.
दात आणि तोंडाची नियमित स्वच्छता का महत्त्वाची आहे?
तोंडात सतत लाळेचे उत्पादन होते, ज्यामुळे अनेक प्रकारच्या जीवाणूंच्या संवर्धनासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. योग्य मौखिक स्वच्छतेच्या अभावी जीवाणूंचा वेगाने गुणाकार होण्याचा आणि अनेक प्रकारचे तोंडी संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. अन्न खाल्ल्यानंतर काही अन्नाचे कण दात आणि हिरड्यांमध्ये अडकतात, जर ते व्यवस्थित स्वच्छ केले नाहीत तर दात किडणे आणि हिरड्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो. गंभीर प्रकरणांमध्ये, दात काढणे देखील आवश्यक असू शकते. यामुळेच सर्व लोकांनी नियमितपणे तोंडाची स्वच्छता करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया त्यामुळे कोणत्या प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात.
दंत स्वच्छता आणि स्मृतिभ्रंश होण्याचा धोका
अनेक संशोधने असे दर्शवतात की जे लोक आपले दात व्यवस्थित स्वच्छ करत नाहीत त्यांना दात किडणे आणि हिरड्यांच्या समस्या तसेच मानसिक विकारांचा धोका असू शकतो. संशोधकांना असे आढळले आहे की डिमेंशिया असलेल्या लोकांमध्ये दात किडण्याची समस्या सामान्य आहे. संबंधित न्यूरोलॉजी आणि न्यूरोसायन्स रिपोर्ट्समध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, दात किडण्याच्या स्थितीमुळे काही लोकांमध्ये स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढू शकतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, दंत समस्या जसे की पीरियडॉन्टायटिस रोग आणि मेंदूतील जळजळ यांच्यात संभाव्य दुवा सापडला आहे ज्यामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका होऊ शकतो.
दंत समस्या आणि हृदयरोग
दुसऱ्या एका अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की तोंडाच्या स्वच्छतेवर, विशेषतः दातांच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याच्या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संबंधित अभ्यासात, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की जे लोक दिवसातून किमान तीन वेळा दात घासतात त्यांना ऍट्रिअल फायब्रिलेशन आणि हार्ट अटॅक यासारख्या गंभीर आणि जीवघेणा समस्या होण्याचा धोका कमी असतो. अभ्यासात असेही आढळून आले की ज्या लोकांनी जास्त दात काढले आहेत त्यांना ऍट्रिअल फायब्रिलेशन आणि इतर हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
तज्ञ काय म्हणतात?
संशोधकांचे म्हणणे आहे की दात आणि तोंडाच्या नियमित स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. तुम्ही एखाद्या वेळी दात घासायला विसरलात तर घाबरू नका. परंतु लक्षात ठेवा की तुम्ही दिवसातून किमान दोनदा ब्रश केले पाहिजे. बाजारात अनेक प्रकारचे माउथवॉश उपलब्ध आहेत. मात्र त्यांचा जास्त वापर केल्याने दातांनाही नुकसान होऊ शकते. कोमट पाण्यात मीठ टाकून चुळ भरणे फायदेशीर मानले जाते.
पिंपरी –
देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थान संस्थान राज्य सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. देहू नगरीमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात भाजप पदाधिकार्यांनी राजकीय रंग दिला याला देहू संस्थान विश्वस्तांनी मूक संमती दिली. धार्मिक कार्यक्रम असताना राज्य सरकारचे प्रतिनिधी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांना भाषण करून दिले नाही. तसेच मावळचे माजी आमदार बाळा भेगडे व देहू संस्थांचे पदाधिकारी यांनी स्थानिक आमदार सुनील शेळके व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना निमंत्रण न दिल्याचे दिसून आले.
काल झालेल्या धार्मिक कार्यक्रमात देहू संस्थानने राजकारण केले. कार्यक्रमाच्या स्टेजवरती ठराविक नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दोन नंबरचे स्थान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे होते. तसा ट्रू कॉल दिल्ली मधून पंतप्रधान कार्यालयातून संस्थांनाला मिळाला होता. कार्यक्रम ठिकाणी स्वागत भाषण राज्याचे विरोधी पक्षनेते व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. या नंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले.
यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगूनही कार्यक्रमात अजित पवार यांना भाषणासाठी बोलू दिले नाही. देव संस्थानच्या वतीने संबंध नसतानाही नागपूरच्या आमदारांना भाषण करण्याचा मान दिला. मात्र पुण्यातील भूमिपुत्र असणाऱ्या उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना मात्र डावलल्याने भूमीपुत्रांचा अपमान झाला असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी बोलताना व्यक्त केले.
पिंपरी –
शनिवारी 11 जून रोजी रोटरी क्लब ऑफ निगडीच्या सदस्यांनी वेताळे, खेड येथे वृक्षारोपण केले. 14 ट्रीज ह्या संस्थेसोबत हा उपक्रम हाती घेतला होता.
रोटरी क्लब ऑफ निगडी चे अध्यक्ष रो. जगमोहन सिंग, सचिव रो. सुहास ढमाले, सर्व्हिस डायरेक्टर रो. अंकाजी पाटील, क्लब एडमिन रो. केशव मणगे आणि सोबत 21 सदस्य व सहा पाल्यांनी साठ रोपे उजाड डोंगर माथ्यावरती लावली. पिंपळ, उंबर, कडूनिंब, करंज, पिवळा कांचन, इत्यादी देशी झाडांची रोपे लावण्यात आली. त्याची निगराणी आणि देखरेख 14 ट्रीज करणार आहेत. सोबत ओरलिकॉन बालझर या कंपनीच्या 20 कर्मचाऱ्यांनी देखील सी एस आर (CSR) मधून तेथे वृक्षारोपण केले. CSR हेड नचिकेत कणसे आणि वेदांगी पाटील व सुमती ससिधरन उपस्थित होते. रो. मुकुंद मुळे आणि रो. सोनाली जयंत यांनी उपक्रमाचे नियोजन केले होते
14 ट्रीज चे संस्थापक डॉ प्रविण भागवत यांनी संस्थेचे कार्य समजावले आणि मार्गदर्शन केले. आपण आयुष्यभर जेवढे कार्बन डाय-ऑक्साइड उत्सर्जित करतो त्यासाठी सर्वांनी 14 झाडे तरी लावलीच पाहिजे असं त्यांनी समजावून अधिक वृक्षारोपण करण्यास सर्वांना प्रवृत्त केलं. सर्वांनी 14 ट्रीज च्या कार्यास दाद दिली आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
“काय तर म्हणे आपली संस्कृति जगांत महान आहे. बिनबुडाचा असला नेहमी दावा केला जातो. हिंदू संस्कृती महान संस्कृती कशी काय असू शकते. भारतात महाराष्ट्राला सर्वात पुरोगामी मानले जाते पण हे सपशेल खोटे आहे. पहा एका अहवालानुसार भारतात ११५० वृद्धाश्रमे आहेत व या वृद्धाश्रमांत ९७ हजार वृद्ध लोक राहतात. महाराष्ट्रात २४ वृद्धाश्रम मातोश्री वृद्धाश्रम योजने अंतर्गंत विना अनुदान तत्वावर चालवले जातात. स्वत:ला सुसंस्कृत समजले जाणा-या पुण्यात सर्वात जास्त म्हणजे ६५ वृद्धाश्रमे आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. पैकी १ कोटी वृद्ध लोक आहेत. हिंदूंना लाज वाटली पाहिजे की समाजाला वृद्धाश्रमांची का गरज पडली. आई वडिलांना न संभाळण्याची कुवृत्ती समाजात वाढलेली दिसून येते.
या ठिकाणी मुद्दाम नमूद करावे वाटते की, भारतातील सर्वच्या सर्व म्हणजे ११५० वृद्धाश्रमांत एकही मुस्लिम वृद्धाश्रम नाही. अहवालानुसार मुस्लिम समाज आईवडिलांना उत्तम सांभाळतात व त्यांची देखभाल चांगली करतात. कुराणमध्ये अल्लाह नंतर आईवडिलांच्या चरणी जन्नत आहे असं ते समजतात. त्यामुळे मुस्लिम समाजाचा एकही अगदी नावांलाही वृद्धाश्रम नाही. आणि तशी गरजही नाही पडली.
मात्र हिंदू समाजाचे सर्वत्र जिकडे तिकडे अनाथाश्रम व वृद्धाश्रम दिसून येतात. तसेच सरकारलाही वृद्धाश्रम काढण्याची आवशकता भासणे ही अत्यंत लाजीरवाणी व शरमेची बाब आहे. वृद्धाश्रम व अनाथाश्रम हा हिंदू संस्कृतीवरचा कलंक आहे. आपले आई वडील मुलांना जड व्हावेत इतकी नीच वृत्ती समाजात वाढली आहे. पुणे या बाबतीत तर नंबर एक वर आहे. सर्वात जास्त वृद्धाश्रम पुण्यांत आहेत. मा. पंतप्रधान मोदीजींनी १०० जिल्ह्यांत वृद्धाश्रम उघडण्याची घोषणा केली आहे. किती शरमेची ही बाब आहे.. हा विकास असतो का?
वैद्यकिय शास्त्रांतील प्रचंड प्रगतीमुळे नवसंशोधनात्मक उपचारांने वयोमानांत वाढ झाली आहे. पण माणसांतील ओलावा मात्र पार आटला आहे. लोकांच्या घरातील कुत्रे गलेलठ्ठ झाले आहेत आणि मातापिता आठ आठ दिवस उपाशी आहेत. या गाबडयांना यासाठीच का जन्माला घातले होते का त्यांनी?
शांतपणे विचार करा एवढ्या देशांत एकही वृद्धाश्रम मुस्लिमांचा नाही यावरुन काय बोध घ्याल बोला?
कशाला जन्माला घालायची असली अवलाद ? त्यापेक्षा बिन औलादीचे रहा काय हरकत आहे?
सामाजिक जबाबदाऱ्या शिकवल्याच जात नाहीत, आणि एक मुलगा एक मुलगी पॅटर्न आल्याने काय झाले? एकुलता एक म्हणून दिवट्याचे फारच लाड होत आहे, तोच घातक ठरत आहे. आई-वडील एकच दिवटा आहे म्हणून मुलांच्या अनेक चुका नजर अंदाज करत असल्याने ते गाबडं उदंड आणि उनाड होत चालले आहे. जरा आवरा लाडल्याला नसता हा लाडला तुम्हांलाच लावील धक्क्याला. संस्कार द्या तरच वृद्धाश्रम कमी होतील नसता भयानक वास्तव आ वासून येत आहे. लक्षांत ठेवा.
जय शिवराय.”
मुंबई –
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याप्रकरणी भारत सरकारने जगभरातील मुस्लिम समाजाची माफी मागावी या मागणीसाठी हॅकर्सनी ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केली आहे. दरम्यान अल-कायदा या दहशतवादी संघटनेनंही भारतातील वेगवेगळ्या शहरांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
आता देशातील वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी वेबसाईट्सवर याच मुद्द्यावरुन सायबर हल्ले होताना दिसतायत. याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील 50 वेबसाईट्स हॅक झाल्यात. या हॅकर्सने जगभरातील मुस्लीम हॅकर्सला भारतीय वेबसाईटवर सायबर हल्ले करण्यासाठी आवाहनही केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काहींचा समाजात तेढ पसरवण्याचा प्रयत्न सुरु असून या प्रकरणातील कारवाईबाबत पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, “अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या ही वस्तुस्थिती आहे. एडीजी मधुकर पांडे पुढील तपास करत आहे. ठाणे पोलीस कमिशनची वेबसाईट हॅक झाली आहे, परंतु कोणताही महत्त्वाची माहिती लीक झालेली नाही. कोणत्याही कारणावरून समाज- समाजात एक प्रकारे तेढ निर्माण करण्याचे जे काम सुरु आहे त्याचे हे परिणाम आहेत. हॅकर्सनी जगभरातील सर्व हॅकर्सना विनंती केली आहे की, तुम्हीही यात सहभागी व्हा. राज्य सरकारच्या वतीने या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. त्यावर काय उपाय योजना करायच्या आहेत त्यासंदर्भातही यंत्रणा कार्यरत आहेत. तथापी सर्व माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याने त्यामध्ये अधिक माहिती देण्यासाठी माझ्याकडे आता नाही.”
“हॅकर्सची जी मागणी आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात माफी मागितली पाहिजे. ज्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी जे प्रेषित पैगंबर मोहम्मदांबद्दल उद्गार काढले त्याबद्दल अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत कारवाई सुरु आहे. त्याबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत पंतप्रधानांनी स्वत: ठरवले पाहिजे,” अशी मागणीही गृहमंत्र्यांनी केली आहे.
“ही घटना दुर्दैवी आहे. कारण आपल्या देशात समाजा-समाजात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, त्याला प्रतिकार म्हणून प्रतिहल्ला म्हणून अशाप्रकारची कृती समाजातल्या टोकाच्या विचार करणाऱ्या लोकांकडून होत आहे. ही बाब बरोबर नाही कारण शेवटी सगळ्यांना सलोख्याने राहायचे असेल तर अडचणी भावना समजून घेणे गरजेचे आहे. हॅकर्सकडून जे अपील केले जात आहे ज्यामुळे नुकसान सर्वांचे होणार आहे. त्यामुळे अशा गोष्टींपासून सर्वांनी दूर रहावं” अशी विनंती गृहमंत्र्यांनी केली आहे.