पिंपरी, दि. 3 जून – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तेचा गैरवापर करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रत्येक कामांत गैरव्यवहार केल्याने शहराची पुरती अधोगती झाली. गेल्या पाच वर्षांतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. शहराचा पुन्हा विकास राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच होवू शकतो याची खात्री मतदारांना असल्यामुळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप आणि कार्यकर्ता मेळाव्यात अजितभाऊ गव्हाणे बोलत होते. पुढे बोलताना गव्हाणे म्हणाले, गतवेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी शहरवासियांना भूलथापा मारल्या आणि खोटी आश्वासने दिली. महापालिकेत सत्ता आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांपैकी एकही काम ते करू शकले नाहीत. महापालिकेत गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रत्येक कामांत भ्रष्टाचार करण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी केले आहे. भाजपच्या लाचखोरी, खंडणीखोरी आणि भ्रष्टाचारामुळे शहराची पुरती अधोगती झाली. शहरातील तरुणांना त्याची मोठी झळ पोहोचली आहे. शहरातील जनतेलाही विकास आणि भ्रष्टाचाराची जाणिव झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागस्तरावर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. प्रभागरचना आणि आरक्षणही आपल्याला अडचणीचे ठरणार नसल्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील आणि आपलाच महापौर होईल याची खात्री आहे. जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांसह तरुणांना अधिकची संधी दिली जात असल्याने पक्षामध्येही चैतन्य निर्माण झाले आहे. ‘पिंपरी चिंचवडच्या विकासाला हवी, पुन्हा वादळी गती, आपली राष्ट्रवादी’ हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. कार्यकर्त्यांची ताकद आणि मतदारांचा विश्वास यावर महापालिकेत सत्ता येईल, असा विश्वासही गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपकडून भ्रष्टाचाराचा कहर – बहल
गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची अक्षरश: लूट केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे समन्वयक तथा प्रवक्ते योगेश बहल यांनी केला. ते म्हणाले, करोना काळात भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी अक्षरश: महापालिकेची लूट केली. त्यानंतर कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये भ्रष्टाचार केला. शिक्षणमंडळ, आरोग्य, वैद्यकीय विभाग, स्मार्ट सिटी सेंटरसारख्या प्रत्येक प्रकल्पात भ्रष्टाचार केला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना शहरातील जनता यावेळी थारा देणार नसून महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याचा दावाही योगेश बहल यांनी यावेळी केला.
संपूर्ण शहर ‘राष्ट्रवादीमय’
एप्रिल महिन्यात होणारा उपमु ख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड शहर दौरा शुक्रवारी (दि. ३) पार पडला. या दौऱ्याच्या अनुषंगाने शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण तयारी करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांतील राष्ट्रवादीचा हा सर्वांत मोठा यशस्वी कार्यक्रम ठरल्याचे पहावयास मिळाले. खचाखच भरलेल्या रामकृष्ण मोरे सभागृहात त्याची प्रचिती आली. अक्षरश: पाय ठेवायलादेखील जागा सभागृहात शिल्लक राहिली नव्हती. गेल्या पाच वर्षांत या सभागृहात सर्वाधिक गर्दीचा हा कार्यक्रम ठरला. तर दौऱ्यापूर्वी शहरात लावण्यात आलेले फलक, होर्डिंग्जही लक्षवेधक ठरले. शहर पातळीवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षातील एकीचे दर्शनही पहावयास मिळाले. लक्षवेधक फलकबाजी, टिकेपेक्षा शहर विकासावर केलेले भाष्य, खचाखच भरलेला हॉल, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि शहर कार्यकार्यकारणीचे अचून नियोजन यामुळे आजचा कार्यक्रम सर्वाधिक यशस्वी ठरल्याची तसेच ‘राष्ट्रवादीमय शहराची’ चर्चा सगळीकडे रंगली होती.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भाजपवर सडकून टीका
टक्केवारी, भ्रष्टाचारामुळे शहरातील तरुणांचा भाजपकडून भ्रमनिरास
पिंपरी, दि. 3 – पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झाला पाहिजे, असा मनापासून विचार करणारा राज्यात राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षात कोणताही नेता नाही. हे माझे शहर आहे ही भावना असावी लागते, ती भावना केवळ आपल्याकडे आहे. भाजपच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत शहरात येऊन किती प्रकल्पांची माहिती घेतली? नविन किती प्रकल्प आणले, शहराच्या विकासात त्यांचे योगदान काय आहे? याचे उत्तर भाजपच्या नेत्यांनी द्यावे, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज (दि.३) भाजप नेत्यांना दिले. महापालिका निवडणुकीपूर्वी अजितदादांनी भाजपवर सडकून टीका करत महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप आणि कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादा बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमास शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, रविकांत वर्पे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर यांच्यासह तीनही विधानसभेचे अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे आजीमाजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना अजितदादा म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपाची गेली पाच वर्षे सत्ता होती. या पाच वर्षांत भाजपने काय केले. आमच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड शहर देशातील सर्वाधिक वेगाने विकसीत होणारे शहर होते. भाजपच्या नेत्यांनी खोटी आश्वासने देऊन महापालिकेची सत्ता पदरात पाडून घेतली. मात्र गेल्या पाच वर्षांत त्यांचे शहराच्या विकासात काय योगदान आहे. त्यांचा कोणता नेता शहरातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आला? याचे उत्तर भाजपनेत्यांनी शहरवासियांना द्यावे. शहराच्या विकासासाठी वेळ देणारे आणि या शहराच्या प्रगतीसाठी मनापासून विचार करणारे नेतेच त्यांच्याकडे नाहीत. केवळ ऑनलाईन उद्घाटने करून स्टंटबाजी करणारी ही मंडळी आहेत. मात्र, आपणाला या शहराचे सर्व प्रश्न सोडवायचे असून शहरातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवायचा आहे. शहर विकासासोबतच इथल्या तरुणांच्या हाताला काम आणि महिलांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून केले जाईल.
भाजपने गेल्या पाच वर्षांत प्रचंड भ्रष्टाचार केला. ज्या कामांमुळे शहराचा विकास होणार आहे, जनतेचे कल्याण होणार आहे, अशा कामांना भाजपच्या काळात महत्त्व न मिळता ज्या कामांमध्ये भाजपच्या लोकांचा ‘इंट्रेस’ आहे, ज्यामध्ये त्यांना कमिशन मिळाले ती कामे गेल्या पाच वर्षांत करण्याचा प्रकार घडला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी कररुपाने जमा केलेल्या पैशांचा विनियोग विकासकामांसाठी होण्याची गरज होती मात्र तसे झालेले नाही. कुत्र्याच्या नसबंदीमध्ये साडेसहा कोटींचा भ्रष्टाचार हा वेगळाच प्रकार आहे. करोनाकाळात केलेल्या नसबंदीसाठी काय सोन्याची उपकरणे वापरली होती काय? असा प्रश्नही अजितदादांनी यावेळी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, आमच्या सत्ताकाळात शहराचा जो विकासाचा वेग होता त्याला गेल्या पाच वर्षांत खिळ बसली आहे. आपल्याला गेल्या पाच वर्षांत शहराचा जो विकासात जो विकासाचा बॅकलॉग निर्माण झाला आहे, तो भरून काढावयाचा आहे. त्यामुळे आपली महापालिकेत सत्ता नसतानाही पालकमंत्री या नात्याने शहराच्या विकासाला गती देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
महापालिकेत सत्ता आल्यास शहरवासियांना दर्रोज पाणी
‘ज्यांच्या अंगात पाणी नाही, ते शहरवासियांना काय पाणी देणार’ महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचे शंभर नगरसेवक निवडून द्या, दर्रोज पाणीपुरवठ्यासह शहरातील सर्वच्या सर्व सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आम्ही कधीही स्टंटबाजी करत नाही. आमच्यामध्ये प्रश्न सोडविण्याची आणि शहराचा विकास करण्याची धमक असल्यामुळे नागरिकांनी आम्हाला महापालिकेत संधी द्यावी, असे आवाहनही अजितदादांनी यावेळी केले. शहरवासियांना भाजपचे पदाधिकारी गेल्या पाच वर्षांत दररोज पाणीदेखील देऊ शकले नाहीत. टक्केवारी, भ्रष्टाचार यामध्येच या लोकांचा वेळ गेल्याने पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. आमची सत्ता आल्यास आम्ही शहरातील सर्व प्रश्न सोडविण्याबरोबरच दर्रोज पाणी देण्यासाठी कटीबद्ध आहोत. अत्यंत नियोजबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने सत्ता येताच आंद्रा आणि भामाआसखेड धरणातून 265 एमएलडी पाणी उचलले जाईल आणि शहराचा पाणीप्रश्न सोडविला जाईल, असेही अजितदादा यावेळी म्हणाले.
विरोधकांच्या चक्रव्युहात अडकू नका
सध्या देशात, राज्यात आणि शहरात विरोधकांच्या माध्यमातून जाती-धर्मामध्ये भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. मात्र आपल्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकाराकडे दूर्लक्ष केले पाहिजे. शहर विकासाचा अजेंडा आपल्या हाती घेऊन चुकीच्या गोष्टींना थारा न देता विरोधकांच्या चक्रात अडकू नका, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. ते म्हणले, विरोधकांकडून केवळ आश्वासने दिली जातात, लोकप्रिय घोषणा केल्या जातात. सत्ता आली की त्यातील एकही आश्वासन पूर्ण केले जात नाही. आपण असे न करता जे होऊ शकते त्याचा आराखडा तयार करून शहर विकासाला एक नवी दिशा देण्याबाबत काम करायचे आहे. समोरच्यांनी जातीधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करावे मात्र घसरू नये, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.
मतदारराजा जागृत हो
भारतातील मतदारराजाने यापूर्वी ज्यांनी ज्यांनी चुका केल्या त्यांना शिक्षा दिली आहे. इंदिरा गांधी यांनासुद्धा पराभव पहावा लागला होता. आताचे वातावरणही चुकीच्या दिशेने चालले आहे. दुसऱ्याला त्रास देण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिला नाही. मात्र सत्तेच्या जोरावर भलतेच सुरू आहे. देशातील सुजान नागरिकांनी विचार करण्याची आणि जागृत होण्याची वेळ आली आहे. महागाईने नवे उच्चांक केले आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. एका रात्रीत होत्याचे नव्हते होऊ शकते. त्यामुळे देशातील सुजान नागरिकांनी आता खऱ्या अर्थाने विचार करून योग्य आणि जबाबदार व्यक्तींच्या हातीच सत्ता सोपविली पाहिजे, असेही अजितदादा यावेळी म्हणाले.
लबाडा घरचं अवतानं
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्यावर नाव न घेता अजितदादांनी बोचऱ्या शब्दात टिका केली. ते म्हणाले, शहरात सध्या इव्हेंट सुरू आहेत. जेसीबी, मर्सिडीज देत आहेत. यांचे काही खरे नाही. एक वस्तू कितीजणांना दिली ते त्यांना माहित नाही. ते लबाडा घरचे अवतानं आहे. जेवल्याशिवाय कळत नाही, त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा.
विकासाला मत न दिल्याची खंत
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा मोठ्या प्रमाणात विकास केला मात्र गतवेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत आपल्या पक्षाचा पराभव झाला याची खंत असल्याचे अजितदादांनी यावेळी बोलून दाखविले. एवढा मोठा विकास केल्यानंतरही नागरिकांनी विकासकामे करणाऱ्यांना मत न दिल्याबद्दल खंत वाटते, असे अजितदादा म्हणले. खोटा प्रचार, मोदी लाट याचा परिणाम गतवेळी झाला. यावेळी मात्र राष्ट्रवादीने केलेला विकास आणि भाजपने केलेला भ्रष्टाचार याचा विचार करून जनतेने मतदान करावे, असे आवाहनही अजितदादा यांनी यावेळी केले.
0 पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजितदादांचा पुढाकार
0 भाजपच्या सत्ताकाळात मंदावलेल्या विकासकामांना पुन्हा गती
पिंपरी –
राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सत्ता काळात शहरात विकास कामांची गंगा आणली. मात्र, गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत विकास कामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसली होती. भाजपच्या सत्तकाळात शहरात निर्माण झालेला विकासाचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुन्हा शहरात जातीने लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. आज शुक्रवार (दि. 3) रोजी एकाच दिवशी महापालिकेने विकसित केलेल्या आणि विकसित करण्यात येणाऱ्या पावणेदोनशे कोटी रूपयांच्या 10 विकास कामांची उद्घाटने आणि भूमिपूजने उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि विकास हे समिकरण तब्बल पाच वर्षानंतर शहरात पहावयास मिळाले.
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची 15 वर्षे सत्ता होती. शहराचा सर्वांगीन विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रासह राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीच्या माध्यमातून शहरात उच्च दर्जाच्या मुलभूत सुविधा, प्रशस्त रस्ते, अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली उद्याने, खेळासाठी मैदाने, दुमजली उड्डाणपुल, झोपडपट्टीतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मोठे प्रयत्न केले. शहराला मोठा नावलौकीक मिळवून देतानाच देशातील सर्वाधिक वेगाने विकासीत होणे शहर बनविले.
मात्र, 2017 च्या निवडणुकीत मतदार अपप्रचाराला बळी पडल्याने महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता जावून भाजपची सत्ता आली. स्वच्छ कारभाराचा नारा देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी भ्रष्टाचार करून आपली घरे भरण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला. त्यामुळे शहरातील विकास कामांना गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात “खो” बसला आणि शहर विकासाचा वेग मंदावला. शहर विकासाचा मंदावलेला वेग पुन्हा वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी चंग बांधला आहे. विकास कामात कोणतेही राजकारण झाले नाही पाहिजे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री पवार सातत्याने घेत असतात. याच अनुंषगाने महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांना प्रशासकीय राजवटीत विकास कामे थांबायला नकोत, अशा सूचना देऊन विकास कामांचा वेग वाढविण्याचा आदेश दिला आहे.
त्यानुसार, शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शहरातील तब्बल पावणेदोनशे कोटी रूपयांच्या विकास कामांची उद्घाटने आणि भूमिपूजने करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत उद्योग सुविधा कक्षाचे उद्घाटन, पेट्रोलिंगसाठी 50 स्मार्ट मोटार सायकलचे पोलिसांना वाटप, अग्निशमन सेवा देण्यासाठी फायटर मोटार सायकलचे वाटप, कासारवाडी येथील सी.एम.ई. चे आर्मी रोईंग नोड, रोईंग प्रशिक्षणाचे उद्घाटन, नेहरूनगर येथे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयममधील हॉकी ऍकॅडमीचे उद्घाटन, जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी, तळवडे गायरानातील उद्यानाचे लोकार्पण, त्रिवेणीनगर चौकापर्यंत इको ट्रॅकचे भूमिपूजन, थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर ऍकॅडमीच्या पॅव्हेलिअनचे उद्घाटन, वाकड येथील कै. तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानाचे लोकार्पण, पिंपळे सौदागर येथील अखिल भारतीय कबड्डी पंच स्व. बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे लोकार्पण करण्यात आले. याचबरोबर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या 7 हजार 600 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. या सर्व प्रकल्पासाठी सुमारे 178 कोटी 57 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
भोसरीतील पार्किंगची समस्या सुटणार; अत्याधुनिक बहुमजली वाहनतळाचे भूमीपूजन
भोसरी आळंदी रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्न सुटावा आणि पुण्यातील लक्ष्मी रोडवरील बाजारपेठेच्या धर्तीवर भोसरी-आळंदी रस्त्यावरील बाजारपेठेचा विकास व्हावा, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांच्या प्रयत्नातून बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या वाहनतळाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
भोसरी येथील क्रमांक पाच, गवळीनगरमधील नागरिकांना अत्याधुनिक सुविधांसाठी अजित गव्हाणे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच प्रभाग क्रमांक पाचचा झपाट्याने विकास झाला आहे. आतापर्यंत या प्रभागामध्ये सखुबाई गबाजी गवळी उद्यान, स्केटींग ग्राऊंड, ए.पी. फिटनेस जीम, शंकर गवळी बॅडमिंटन हॉल, धोंडिबा फुगे क्रीडा संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर खेळाचे मैदान, राधानगरी उद्यान, गंगोत्री पार्क उद्यान यासारखी अनेक महत्वपूर्ण विकासकामे झाली आहेत. आता प्रभागामध्ये बहुमजली वाहनतळ उभारले जात आहे. हे तीन मजली वाहनतळ आहे. यामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार असून दीडशे दुचाकी आणि 75 चारचाकी वाहनांना पार्किंगची सुविधा असणार आहे. महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी तीन स्वच्छतागृह उभारण्यात येणार असून लिफ्टची सुविधाही देण्यात येणार आहे. शहरातील हे पहिले अत्याधुनिक वाहनतळ ठरणार आहे.
शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या तथा उद्योग समूहाद्वारे प्राप्त होणाऱ्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून शहराच्या विकासात भर घालण्यासाठी समन्वय साधण्याचे कार्य या कक्षामार्फत करण्यात येईल. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण प्रकल्पाद्वारे शहराचा शाश्वत विकासासाठी कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.
शासकीय संस्था आणि उद्योग यांच्यातील संवाद सुनिश्चित करण्याचा उद्योग सुविधा कक्ष पंच तारांकित एक खिडकी सुविधा आहे. पिंपरी चिंचवडमधील व्यापार आणि उद्योगांची वाढ सुलभ करण्यासाठी आणि औद्योगिक प्रतिनिधीत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महापालिकेच्या उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी कक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे. उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि चेंबर ऑफ कॉमर्स आणि मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यात कक्षामुळे मदत होईल.
हे अँड्रॉइड प्रणाली आधारित यंत्र असून डिजिटल पावती, डिजिटल पेमेंट, वाहतूक विभागाच्या वाहन प्रणालीशी सुसंगत आहे. या उपकरणाच्या वापरामुळे दंडाची रक्कम जागेवर प्राप्त होऊन त्याची पावती नागरिकास देण्यात येणार आहे. या उपकरणाचा वापर करणे महापालिकेस सुलभ ठरणार असून कारवाईमध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे.
महापालिका आवारात अजित पवारांच्या हस्ते पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस पेट्रोलिंगसाठी ५० स्मार्ट मोटार सायकल्स हस्तांतरीत करण्यात आल्या. अग्निशमन विभागाला गल्लीबोळांच्या ठिकाणी तातडीने सहजपणे पोहोचून अधिक प्रभावी अग्निशमन सेवा देण्यासाठी फायटर मोटार सायकल्सचे वाटपही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी –
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन ही आपली गरज बनली आहे. आज आपली अनेक महत्त्वाची कामे मोबाईलच्या माध्यमातून सहज होत आहेत. आपली जीवनशैली बदलण्यात त्याचा मोठा वाटा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात लोक चांगला स्मार्टफोन घेण्यास पसंती देत आहेत. मात्र, स्मार्टफोन खरेदी करताना लोक त्याची बॅटरी आणि चार्जिंग क्षमतेचा नक्कीच विचार करतात. त्याच वेळी, स्मार्टफोन काही काळ वापरल्यानंतर, तो खूप हळू चार्ज होऊ लागतो. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. या उपायांचा अवलंब केल्यानंतर, तुमचा फोन पूर्वीपेक्षा वेगाने चार्ज होईल. अशा प्रकारे तुमचा बराच वेळ वाचेल.
० अनेकदा लोकांना अशी सवय असते की ते स्मार्टफोन चार्ज करतानाच वापरतात. जर तुम्हीही ही चूक करत असाल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये चार्जिंगची समस्या उद्भवू शकते. याशिवाय, चार्जिंगच्या वेळी स्मार्टफोनचा वापर केल्यावर ब्लास्ट होण्याची शक्यता देखील लक्षणीय वाढते.
० अनेकजण रात्री फोन चार्जला लावूनच झोपतात. जर तुम्हीही ही चूक करत असाल तर असे केल्याने फोनच्या बॅटरीवर आणि चार्जिंग क्षमतेवर वाईट परिणाम होतो. झोपताना मोबाईल चार्जवर ठेवू नये.
० याशिवाय जर तुमचा फोन स्लो चार्ज होत असेल, तर आपण फ्लाईट मोड वापरला पाहिजे. चार्जिंगला लावताना फ्लाईट मोड चालू केल्यानंतर फोन पूर्वीपेक्षा वेगाने चार्ज होतो.
० जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ, जीपीएस वायफाय चालू केले असेल, तर फोन स्लो चार्ज होतो. त्यामुळे फोन चार्ज करताना ब्लूटूथ, जीपीएस आणि वायफाय बंद ठेवावे.
यावेळी राजेश पाटील म्हणाले की, आंद्रा धरणातून उचलण्यात येणाऱ्या १०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिखली येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. १० ते १२ दिवसांत पाणी शहरवासीयांना मिळणार आहे.