गॅस्ट्रो कॉलिक रिफ्लेक्स हे या समस्येचे कारण असू शकते. हे एक शारीरिक रिफ्लक्स आहे, जे खाल्ल्यानंतर खालच्या जठरोगविषयक मार्गावर नियंत्रण ठेवते. खाल्ल्यानंतर पोटी जाण्याच्या आजारामागे हेच कारण आहे. खाल्ल्यानंतर, कोलनमध्ये एक प्रतिक्रिया सुरू होते आणि यामुळे कोलन आकुंचन होते. अन्न घेतल्यानंतर, हे कोलोनिक आकुंचन शरीरातील पचलेले अन्न मलविसर्जनासाठी गुदाशयाकडे ढकलते. इरिटेबल बोवेल सिंड्रोम असलेल्या लोकांमध्ये गॅस्ट्रो कॉलिक रिफ्लेक्सची समस्या अधिक वेळा दिसून येते. म्हणून, लोकांच्या विचारांच्या विरूद्ध, जेवणानंतर लगेचच स्टूल एक व्यक्ती १-२ दिवस आधी खातो तसाच असतो.गॅस्ट्रो कोलिक रिफ्लेक्सची कारणे
अन्न ऍलर्जी, चिंता, जठराची सूज, तीव्र दाहक आतडी रोग आणि पोटाच्या इतर समस्यांमुळे हे शक्य आहे. त्याच वेळी, हे आतड्यात कमी चांगले बॅक्टेरियामुळे किंवा कोणत्याही संसर्गामुळे होऊ शकते. काहीवेळा हे मसालेदार अन्न, कार्बोनेटेड पेये आणि धूम्रपान, मद्यपान, खराब आहाराच्या सवयी, कमी शारीरिक हालचाली, काही औषधे आणि दुग्धजन्य पदार्थांची संवेदनशीलता यामुळे देखील होते.
पिंपरी –
गिलियन बार सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजारग्रस्त असलेल्या रुग्णावर सूर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी उपचार करून रुग्णास जीवनदान दिले. सचिन आनंदा रणपिसे (वय ३८, रा मोरे वस्ती चिखली) असे या रुग्णाचे नाव आहे. रुग्णास वाचवण्यासाठी चिखली साने चौक येथे असलेल्या सूर्या हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. दत्तात्रय सूर्यवंशी, डॉ मनिषा देवकर, डॉ.शरद धावडे, डॉ विकास आगलावे यांनी अथक परिश्रम घेतले.
डॉ. कुलकर्णी म्हणाले की, जीबीएस हा नसांचा लकवा आहे. घशातील किंवा पोटातील संसर्गामुळे हा आजार होतो. २/३ आठवड्यानंतर या आजाराचे लक्षणे आढळून येतात. हात पायातील ताकद कमी होते. शारीरिक जाणिवा कायम मात्र नसांची कार्यक्षमता कमी होत जाते. उपचार घेण्यास उशीर झाल्यास रुग्णास अन्न गिळायला आणि श्वास घ्यायला त्रास होतो. कालांतराने गुंतागुंत वाढते. त्वरित तपासण्या करून उपचार केल्यास रुग्ण वाचू शकतो.
सर्वसाधारणपणे या आजारामध्ये रुग्ण आपोआप बरे होतात. हा आजार दहा हजारांमध्ये ४/५ रुग्ण आढळून येतात. इतका दुर्मिळ हा आजार आहे. रुग्णाचे बंधू प्रमोद रणपिसे म्हणाले की, रुग्णास सुरुवातीला ताप व खोकला येत होता. कोविड, टीबी तपासण्या करून घेतल्यानंतर सूर्या रुग्णालयात दाखल केले. तातडीने निर्णय घेवून डॉक्टरांनी उत्तम उपचार सुरू केले. उपचारदरम्यान निमोनिया देखील झाला होता. तब्बल ३ महिन्यानंतर रुग्ण बरा झाला आहे.
पिंपरी –
महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभागातील महिला आरक्षण सोडत झाली. यामध्ये काही विद्यमान नगरसेवकांचे वॉर्ड उडाले आहेत. मात्र, पुरूष नसेल तर महिला ही आधीपासूनच आमची मानसिकता होती. त्यामुळे महिलेचे आरक्षण पडल्यामुळे आम्हाला जास्त काही चिंता वाटत नसल्याचेही अजित गव्हाणे म्हणाले.
मुंबई –
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरेंविरोधात मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ‘दिपाली सय्यद यांना घरात घुसून बदडून काढू’ असा इशारा उमा खापरे यांनी दिला होता. दिपाली सय्यद यांनी भाजप नेत्यांवर केलेल्या हल्लाबोलनंतर भाजपकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. भाजप महिला कार्यकर्ता दिपाली सय्यद यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. मात्र उमा खापरेंविरोधात दिपाली सय्यद यांनी तक्रार दाखल केली आहे.
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात उमा खापरेंविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे. त्या पद्धतीने मी चालली आहे. तक्रार केली असून त्याचा परिणाम येत्या काळात दिसेल असे दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
दिपाली सय्यद म्हणाल्या की, भाजपचे लोकं सोशल मीडियावर अश्लील पद्दतीने ट्रोलिंग करतात, खालच्या थराला जाऊन बोलतात. त्यांच्याकडूनच ही सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील जनता सगळं पाहत आहे. मारण्याची धमकी देणाऱ्याच्या पाठीशी भाजपचे लोकं उभे राहतात. राणांच्या बाजूला उभे राहिले. आता माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहेत. किरीट सोमय्यांनासुद्धा पाठिशी घालता. सोमय्यांनी ज्या लोकांवर आरोप केले ते नेते भाजपमध्ये गेल्यावर पवित्र झाले आहेत. सोमय्या आता कुठे आहेत? असा सवालसुद्धा दिपाली सय्यद यांनी केला आहे.
दिपाली सय्यद यांनी ट्विट करुन भाजप नेते किरीट सोमय्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. भाजप नेते किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर नेते भाजपामध्ये जावून पवित्र होतात. त्यानंतर त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही. या नेत्यांना पाठीशी घालणारा असा लुच्चा पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल अशी टीका दिपाली सय्यद यांनी केली होती. यावर उमा खापरेंनी प्रतिक्रिया देताना दिपाली सय्यद यांनी कोणत्याही भाजप नेत्याबद्दल अपशब्द काढले तर त्यांना घरात घुसून बदडून काढू असा इशारा दिला आहे.
पिंपरी –
भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाल्यामुळे आज (गुरूवार) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पिंपरी-चिंचवडमधील जनता, कार्यकर्ते व हितचिंतकांचे प्रेम आणि प्रार्थना तसेच डॉक्टरांचे उपचार यामुळे भाऊंची प्रकृती चांगली झाल्याचे आमदार जगताप यांचे बंधू व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी सांगितले. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच डॉक्टरांनी भाऊंना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. भाऊ लवकरच पुन्हा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरूवात करतील, त्यावेळी ते सर्वांनाच भेटतील. आता त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांना भेटण्यासाठी निवासस्थानी गर्दी करू नये. कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरात जनसेवा अखंड सुरू ठेवावी, असे आवाहनही माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी केले आहे.
आमदार लक्ष्मणभाऊ जगताप हे आजारपणामुळे बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल होते. तेथे त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते. ते रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वपक्षीय नेते धावले होते. आमदार जगताप यांच्या कुटुंबियांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती. भाऊंच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी गेल्या दीड महिन्यांपासून रुग्णालयात ठाण मांडले होते. संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये विविध जाती-धर्माच्या नागरिकांनी लक्ष्मणभाऊंच्या आरोग्यासाठी प्रार्थनास्थळांमध्ये प्रार्थना, होमहवन केले होते. कार्यकर्त्यांचे हे प्रेम आणि प्रार्थना फळाला आली आणि लक्ष्मणभाऊंची तब्येत एक महिन्यानंतर स्थिर झाली.
आता त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना गुरूवारी घरी सोडण्यात आले. यावेळी लक्ष्मणभाऊ यांचे संपूर्ण कुटुंबीय आणि त्यांच्या प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. लक्ष्मणभाऊंना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची बातमी समजल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ते रुग्णालयातून घरी येताच कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत केले.
यासंदर्भात बोलताना माजी नगरसेवक शंकर जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमधील जनता, कार्यकर्ते व हितचिंतकांचे प्रेम आणि प्रार्थनेमुळे भाऊंची प्रकृती उत्तम आहे. ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे भाऊ आज आपल्यात पुन्हा परतले आहेत. या कठीण काळात शहरातील जनता, कार्यकर्ते व हितचिंतकांनी दिलेले प्रेम संपूर्ण जगताप कुटुंबीय कधीच विसरू शकणार नाही. डॉक्टरांनी भाऊंना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. भाऊ लवकरच पुन्हा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरूवात करतील, त्यावेळी ते सर्वांनाच व्यक्तिश: भेटतील. आता त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांना भेटण्यासाठी निवासस्थानी गर्दी करू नये. कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरात जनसेवा अखंड सुरू ठेवावी”, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पिंपरी –
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या आठ दिवसांत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बदलीस पात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या इतर विभागात बदल्या केल्या जाणार आहेत, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधील अनागोंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. याबाबत उच्च न्यायालयाने पिंपरी-चिंचवड पालिकेला अधिकारी आस्थापनेवरील व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत धोरण तयार करण्याचे आदेश दिले होते. त्या प्रमाणे पालिकेने बदली धोरण तयार केले. त्यानुसार एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व सहा वर्षे काम करणारे कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. तीन वर्षानंतर कर्मचाऱ्यांकडील कामकाज विषय विभागातंर्गत बदल करणे अनिवार्य आहे.
यावर्षी एप्रिल महिना उलटून आणि मे महिना अखेर होऊनही धोरणाप्रमाणे बदल्या झालेल्या नाहीत. या संदर्भात आयुक्त पाटील म्हणाले की, बदली धोरणानुसार येत्या आठ दिवसांत आस्थापनेवरील पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या कल्या जातील सर्व बदल्या नियमानुसार केल्या जातील.
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. अनेक अधिकारी, कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत. काही विभागात दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेले कर्मचारीही आहेत. या धोरणानुसार यावर्षी देखील २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रशासनाने विभागप्रमुखांकडून बदलीस पात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार दोनशेंहून अधिक अधिकारी, कर्मचारी बदल्यांसाठी पात्र ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिंपरी –
थेरगाव येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आठ वर्षाच्या मुलाने घरात खेळत असताना बाहुलीला फाशी दिली आणि बहुलीचा जीव गेला असल्याचा समज करून त्याने स्वतः देखील गळफास घेतला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी दोनच्या सुमारास घडली. कमल खेम साउद (वय 8, रा. सोळा नंबर बस स्टॉप, थेरगाव) असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कमल रविवारी त्याच्या खोलीत बाहुलीशी खेळत होता. त्यावेळी त्याची आई घरात काम करत होती, तर वडील बाहेर गेले होते. कमलने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिली. त्यानंतर बाहुली मेली असं त्याला वाटलं. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचा समज होऊन त्याने घरातील खिडकीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. कमलच्या आईने काम करत असताना त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो बाहुलीसोबत खेळत होता. काही वेळाने आईने पाहिले असता कमल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
आईने कमलकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. वाकड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. एखाद्या कैद्याला ज्याप्रमाणे फाशी देतात त्या प्रमाणे बाहुलीच्या तोंडाला कापड गुंडाळले होते. कमल हॉरर फिल्म पाहत असे, त्यातूनच त्याने हे कृत्य केले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
आठ वर्षाच्या मुलाच्या आत्महत्येनं त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या मुलाची आई गृहिणी असून वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.