पिंपरी –
महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभागातील महिला आरक्षण सोडत झाली. यामध्ये काही विद्यमान नगरसेवकांचे वॉर्ड उडाले आहेत. मात्र, पुरूष नसेल तर महिला ही आधीपासूनच आमची मानसिकता होती. त्यामुळे महिलेचे आरक्षण पडल्यामुळे आम्हाला जास्त काही चिंता वाटत नसल्याचेही अजित गव्हाणे म्हणाले.
मुंबई –
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरेंविरोधात मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ‘दिपाली सय्यद यांना घरात घुसून बदडून काढू’ असा इशारा उमा खापरे यांनी दिला होता. दिपाली सय्यद यांनी भाजप नेत्यांवर केलेल्या हल्लाबोलनंतर भाजपकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. भाजप महिला कार्यकर्ता दिपाली सय्यद यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. मात्र उमा खापरेंविरोधात दिपाली सय्यद यांनी तक्रार दाखल केली आहे.
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात उमा खापरेंविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे. त्या पद्धतीने मी चालली आहे. तक्रार केली असून त्याचा परिणाम येत्या काळात दिसेल असे दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
दिपाली सय्यद म्हणाल्या की, भाजपचे लोकं सोशल मीडियावर अश्लील पद्दतीने ट्रोलिंग करतात, खालच्या थराला जाऊन बोलतात. त्यांच्याकडूनच ही सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील जनता सगळं पाहत आहे. मारण्याची धमकी देणाऱ्याच्या पाठीशी भाजपचे लोकं उभे राहतात. राणांच्या बाजूला उभे राहिले. आता माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहेत. किरीट सोमय्यांनासुद्धा पाठिशी घालता. सोमय्यांनी ज्या लोकांवर आरोप केले ते नेते भाजपमध्ये गेल्यावर पवित्र झाले आहेत. सोमय्या आता कुठे आहेत? असा सवालसुद्धा दिपाली सय्यद यांनी केला आहे.
दिपाली सय्यद यांनी ट्विट करुन भाजप नेते किरीट सोमय्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. भाजप नेते किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर नेते भाजपामध्ये जावून पवित्र होतात. त्यानंतर त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही. या नेत्यांना पाठीशी घालणारा असा लुच्चा पंतप्रधान अख्ख्या भारताने पाहिला नसेल अशी टीका दिपाली सय्यद यांनी केली होती. यावर उमा खापरेंनी प्रतिक्रिया देताना दिपाली सय्यद यांनी कोणत्याही भाजप नेत्याबद्दल अपशब्द काढले तर त्यांना घरात घुसून बदडून काढू असा इशारा दिला आहे.
पुणे –
पुणे महापालिका आरक्षण सोडतीत एकूण १७३ जागांपैकी महिलांसाठी ८७ जागा आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये १७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी, १२ जागा अनुसूचित प्रवर्गातील महिलांसाठी तर एक जागा अनूसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे सभागृहात महिलाराज असणार आहे.
प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे –
अनुसूचित जाती महिला आरक्षित प्रभाग
प्रभाग ९ येरवडा, प्रभाग ३- लोहगाव विमाननगर, प्रभाग ४२ रामटेकडी सय्यदनगर , प्रभाग ४७-कोंढवा बुद्रुक , प्रभाग ४९- मार्केटयार्ड महर्षीनगर, प्रभाग ४६- महम्मदवाडी उरळी देवाची, प्रभाग २० पुणे स्टेशन आंबेडकर रोड , प्रभाग २६- वानवडी वैदुवाडी, प्रभाग -२१ कोरेगाव पार्क मुंढवा , प्रभाग ४८ – अप्पर इंदिरानगर, प्रभाग-१० शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी, प्रभाग-४ खराडी वाघोली.
अनुसूचित खुले प्रभाग
प्रभाग ८ – अ, प्रभाग – ७ अ, प्रभाग- ५० अ, प्रभाग – ३७ अ, प्रभाग २७ अ, प्रभाग – २२ अ, प्रभाग – १ अ, प्रभाग – १९ अ, प्रभाग – १२ अ, प्रभाग ११ अ
अनुसूचित जमाती
प्रभाग १ क्र. १ ब महिला
प्रभाग १४ अ – एसटी खुला
महिला आरक्षित अ व ब जागा
प्रभाग – 2 अ, 3 ब, 4 ब, 5 अ, 6 अ, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 ब, 12 ब, 14 ब, 15 अ , 16 अ, 17 अ, 18 अ, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 ब, 23 अ, 24 अ, 25 अ, 26 ब, 27 ब, 28 अ, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 33 अ, 34 अ, 35 अ, 36 अ, 37 ब, 38 ब, 39 ब, 40 अ, 41 अ, 42 ब, 43 अ, 44 अ, 45 अ, 46 ब, 47 ब, 48 ब, 49 अ, 50 ब , 51 अ, 52 अ, 53 अ, 54 अ, 55 अ, 56 अ, 57 अ, 58 अ, 29 ब, 49 ब, 36 ब, 43 ब, 25 ब, 23 ब, 57 ब, 55 ब, 17 ब, 32 ब, 2 ब, 35 ब, 56 ब, 40 ब, 53 ब, 24 ब, 52 ब,
सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले प्रभाग
प्रभाग – 6 ब, 5 ब, 58 ब, 54 ब, 51 ब, 45 ब, 44 ब, 41 ब, 34 ब, 33 ब, 31 ब, 30 ब, 28 ब, 18 ब, 16 ब, 15 ब, 13 ब, 1 क, 2 क, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 क, 11 क , 12 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 क, 32 क, 33 क, 34 क, 35 क, 36 क, 37 क, 38 क, 39 क, 40 क, 41 क, 42 क, 43 क, 44 क, 45 क, 46 क, 47 क, 48 क, 49 क, 50 क, 51 क, 52 क, 53 क, 54 क, 55 क, 56 क, 57 क व 58 क.
प्रभाग क्रमांक १: तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर (१. महिला, २. महिला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक २ : चिखली गावठाण-मोरेवस्ती-कुदळवाडी (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३ : मोशी, बोन्हाडेवाडी-जाधववाडी (१. महिला, २.खुला ३.खुला)
प्रभाग क्रमांक ४ : मोशी गावठाण-गंधर्वनगरी-डुडूळगाव (१. महिला, २.खुला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक ५ : चहोली-चोविसावाडी-वडमुखवाडी (१. महिला, २.खुला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक ६ : दिघी-बोपखेल (१. एसटी, २.महिला,३.खुला)
प्रभाग क्रमांक ७ : भोसरी सॅण्डविक कॉलनी (१.महिला, २. महिला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक ८ : भोसरी गावठाण-गवळीनगर-शितलबाग (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ९ : भोसरी, धावडेवस्ती-चक्रपाणी वसाहत (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १० : भोसरी, इंद्रायणीनगर-लांडेवाडी-गव्हाणेवस्ती (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ११ : भोसरी, बालाजीनगर-लांडेवाडी-स्पाइन रस्ता (१. एससी महिला, २. महिला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक १२ : चिखली,घरकुल-नेवाळेवस्ती (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १३ : चिखली, मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १४ : निगडी, यमुनानगर (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १५ : संभाजीनगर-पूर्णानगर-शाहूनगर (१. महिला, २.खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १६ : नेहरूनगर-विठ्ठलनगर-यशवंतनगर (१. एससी,२. महिला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक १७ : संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १८ : मोरवाडी-अजमेरा कॉलनी-गांधीनगर-खराळवाडी (१.एससी महिला, २.महिला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक १९ : चिंचवड स्टेशन-मोहननगर-आनंदनगर (१. एससी महिला, २. महिला ३. खुला)
प्रभाग क्रमांक २० : काळभोरनगर-रामनगर-अजंठानगर (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक २१: आकुर्डी गावठाण-दत्तवाडी (१.महिला २.महिला ३.खुला)
प्रभाग क्रमांक २२ : निगडी गावठाण-ओटास्किम (१.एससी,२. महिला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक २३ : निगडी, भक्ती शक्ती-वाहतूकनगरी (१. महिला, २.खुला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक २४ : रावेत-किवळे-मामुर्डी (१.एससी महिला,२.महिला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक २५ : वाल्हेकरवाडी (१.एससी, २.महिला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक २६ : चिंचवडेनगर-बिजलीनगर-दळवीनगर (१.महिला, २.खुला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक २७ : उद्योनगर-रामकृष्ण मोरे सभागृह (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक २८ : चिंचवड, केशवनगर-श्रीधरनगर (१. महिला, २.खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक २९ : भाटनगर-पिंपरी कॅम्प-मिलिंनदगर (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३० : पिंपरीगाव-वैभवनगर (१. महिला, २.महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३१ : काळेवाडी-विजयनगर-नढेनगर (१. महिला, २. महिला,३. खुला)
प्रभाग क्रमांक ३२ : काळेवाडी, तापकीरनगर-ज्योतीबानगर (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३३ : रहाटणी-तापकीरनगर (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३४ : थेरगाव, बापुजीबुवानगर-शिवतीर्थनगर (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३५ : थेरगाव, बेलठिकानगर-पडवळनगर-पवारनगर (१. एससी महिला, २. महिला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक ३६ : थेरगाव, गणेशनगर-संतोषनगर-पद्मजी पेपर मिल (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३७ : ताथवडे-पुनावळे (१. एससी महिला, २. महिलाला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३८ : वाकड (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३९ : पिंपळे निलख-वाकड (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४० : पिंपळे सौदागर (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४१ : पिंपळेगुरव गावठाण-वैदुवस्ती-जवळकरनगर (१. एससी महिला, २. एसटी महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४२ : कासारवाडी-फुगेवाडी (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४३ : दापोडी (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४४ : पिंपळेगुरव-काशिदनगर-मोरया पार्क (१. एससी, २. एसटी महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४५ : नवी सांगवी (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४६ : जुनी सांगवी (१. एससी, २. महिला, ३. महिला, खुला)
ठाणे –
संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी घरात बसून स्वयंपाक करावा; आरक्षण द्या नाहीतर मसणात जा, अशी टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला. यावेळी ‘चंपाकली मुर्दाबाद’ अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
बुधवारी राष्ट्रवादीच्या ओबीसी परिषदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राची फसवणूक झाली असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना, ‘खासदार आहात ना, समजत नसेल तर घरात बसा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा मसणात जा; पण, आरक्षण द्या,’ अशी खालच्या दर्जाची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याविरोधात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चं’पाकली हाय हाय’, ‘चंद्रकांत पाटील मुर्दाबाद’, ‘आरक्षणासह निवडणूक झाल्याच पाहिजेत’, अशा घोषणा दिल्या. सर्वात जास्त वेळा संसदरत्न बहुमानाने सुप्रिया यांना सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, ज्यांना स्वतःच्या गावातील उमेदवारी वाचविता येत नाही. संन्यास घेण्याची घोषणा करून पराभवानंतरही तोंड वर करून काहीही बरळत आहेत त्या चंद्रकांत पाटील यांना मनोविकारतज्ज्ञांकडे नेण्याची गरज आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. तर चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला कुंकू, नथीचे चित्र काढून त्यास जोडे मारले. यावेळी चंद्रकांत पाटील यांचा पुतळाही जाळण्यात आला.
याप्रसंगी आनंद परांजपे म्हणाले की, हा महाराष्ट्र जिजाऊ, अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले यांचा आहे. त्यांचा वारसा अतिशय सक्षमपणे सुप्रियाताई चालवित आहेत. याची जाण तमाम महाराष्ट्राला आहे. तरीही, चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताई यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला देऊन देशातील तमाम मायभगिनींचा अवमान केला आहे. 21 व्या शतकात देशातील महिलांनी ‘चूल मूल’ ही संकल्पनाच मोडीत काढून सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. त्या महिलांना पुन्हा चूलमूल या संकल्पनेत अडकाविण्याची चंद्रकांत पाटील यांची मनुवादी विचारसरणी पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आली आहे.
“शूद्र, पशू और नारी; सब है ताडण के अधिकारी” अशी मानसिकता भाजपची आहे. त्याच मानसिकतेतून चंद्रकांत पाटील यांनी सुप्रियाताई सुळे यांच्याबाबतीत हे विधान केले आहे. यातून चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे, हे स्पष्ट झाले आहे. म्हणून त्यांना ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात पाठवा. त्यांच्यासाठी आम्ही एक बेड आरक्षित करीत आहोत. तसेच ते ठाण्यात आल्यावर त्यांना साडीही देऊ, अशी टीकाही परांजपे यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा घेतला समाचार
पिंपरी – चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अभद्र भाषेत टीका करून आपल्या सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. सुप्रिया सुळे यांचे यशस्वी राजकारण पाटील यांना खूपत असल्यानेच त्यांनी ही टीका केली असून महिलांचा अवमान करणे ही भाजपची संस्कृतीच आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवरून ते मनोरुग्ण बनले असून त्यांच्या मेंदूची तपासणी करण्याची गरज असल्याचा सणसणीत टोला, राष्ट्रवादीचे माजी महापौर तथा मुख्य प्रवक्ते योगेश बहल यांनी लगावला आहे.
ओबीसी आरक्षणावरून भाजपने काढलेल्या मोर्चादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘घरी जा आणि स्वयंपाक करा, दिल्लीत जा नाहीतर मसणात जा’ अशा अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. त्यावर आता राज्यभरातून प्रतिक्रीया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश बहल यांनीही चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, सुप्रिया सुळे या तीनवेळच्या खासदार आहेत. महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू नेतृत्त्व म्हणून त्या पुढे आल्या आहेत. त्यांना आतापर्यंत आठवेळा संसदरत्न म्हणून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न त्या तळमळीने मांडत असल्याने त्यांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आणि हिच बाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना खूपत आली आहे.
एका सुसंस्कृत आणि यशस्वी राजकारणी महिलेवर चंद्रकांत पाटील यांनी खालच्या शब्दात टीका करून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. भाजपाची मनोवृत्तीच महिलांविरोधी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शरद पवार यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्याचा रागही भाजपला आहे. महिलांचे राजकारणातील नेतृत्त्व भाजप नेत्यांना मान्य नसल्याचेच यावरून अधोरेखीत होत आहे. खालच्या भाषेत टीका करणार्या चंद्रकांत पाटील हे मनोरुग्ण बनले असून त्यांच्या मेंदूची तपासणी करणे गरजेचे बनले असल्याचा टोलाही बहल यांनी लगावला आहे.
एका महिलेच्या हक्काची जागा बळाकावून चंद्रकांत पाटील हे आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना महिलांप्रति आदर असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी केलेले हे वक्तव्य शुद्धीत केले की नशापाणी करून केले हे देखील तपासण्याची गरज आहे. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या मेहनती आणि यशस्वी महिलेबाबत विधान करणारे चंद्रकांत पाटील यांचे सर्वसामान्य महिलांबाबतचे मत किती दळभद्री असू शकते. त्यामुळे सुळे यांच्यावर टीका करून संपूर्ण महिलांचा अवमान करणार्या चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी, असेही योगेश बहल यांनी या पत्रकात म्हटले आहे.
शरद पवार आरक्षणाचे पाठिराखे
शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने देशभर पोहोचविणारे शरद पवार हेच खरे आरक्षणाचे पाठिराखे असल्याचे त्यांनी आपल्या कर्तुत्त्वातून अनेकदा सिद्ध केले आहे. मंडल आयोगाने ओबीसी समाजाला दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी शरद पवार यांनी देशात सर्वांत प्रथम महाराष्ट्रात केली होती. शरद पवार हेच ओबीसी समाजाला आरक्षण पुन्हा मिळवून देऊ शकतात, याची सर्वांना खात्री आहे. मात्र आरक्षणाचे केवळ राजकारण करून लोकांना भ्रमीत करणाऱ्या आणि आरक्षणविरोधी मानसिकता असलेल्या भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने चंद्रकांत पाटील अभद्र टीका करत आहेत. तसेच शरद पवार यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्याचा रागही भाजपला असल्यानेच भाजपनेते महिलांवर खालच्या भाषेत टीका करत असल्याचा आरोपही बहल यांनी केला आहे.
मुंबई –
आज सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश राज्यसरकारला ओबीसी अरक्षणासहित निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून महाराष्ट्राला देखील मध्यप्रदेश प्रमाणेच न्याय मिळेल असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. येत्या महिन्याभरात राज्य सरकारने नेमलेल्या आयोगाकडून डेटा सादर केला जाणार असून आरक्षणासोबतच निवडणुका होतील, असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.
मध्यप्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा संपूर्ण देशातील ओबीसींसाठी फायद्याचा ठरणार आहे. मध्य प्रदेश सरकारच्या बाजूने भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता २-३ दिवस किल्ला लढवत होते. शेवटी त्यांना मान्यता देण्यात आली. ५० टक्क्यांपर्यंत ओबीसीसहित आरक्षण द्यावं, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, असं भुजबळ म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल सगळ्या देशाला लागू होईल. म्हणजेच आपल्यालाही तो लागू होईल. म्हणजेच, महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका होतील हे आता सिद्ध झालं आहे, असं देखील छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
राज्य सरकारने माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित ओबीसी आयोगाची स्थापना करून ओबीसींचा इंपिरकल डाटा जमा करण्याचे काम चालू केले आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही त्यांची भेट घेऊन लवकरात लवकर डाटा देण्याची मागणी केली. काल निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सप्टेंबर- ऑक्टोबर पर्यंत निवडणुका होऊ शकत नाही त्यामुळे या दरम्यान इंपिरकल डाटा जमा करून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण पूर्ववत होईल असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
पुणे –
काल पुण्यातील एका कार्यक्रमासाठी भाजपच्या नेत्या व मंत्री स्मृती इराणी आल्या होत्या. त्या वेळी कार्यक्रमस्थळी महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झाले होते. महागाईच्या मुद्द्यावरुन भर कार्यक्रमातच स्मृती इराणी यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली व नंतर सभागृहाबाहेर हाकलून दिले. आज याप्रकरणी भाजपच्या 3 कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भस्मराज तिकोने, प्रमोद कोंढरे व मयूर गांधी या भाजपच्या 3 कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण व त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इराणी ज्या हॉटेलमध्ये थांबल्या त्याबाहेरच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. हॉटेलबाहेर इंधनदरवाढीचे पोस्ट घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींविरोधात घोषणा दिल्या. या गोंधळामुळे स्मृती इराणी यांना काही काळ हॉटेलबाहेरही निघता आले नव्हते. यावेळी आंदोलकांनी हॉटेलमध्येही शिरण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर स्मृती इराणी बाहेर आल्या.
दुसरा गोंधळ बालगंधर्व सभागृहात झाला. येथे केंद्रीय मंत्र्यांचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. याला विरोध करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची भाजप कार्यकर्त्यांशी हाणामारी झाली. हाणामारीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. स्मृती इराणी यांचा सत्कार समारंभ चालू असतानाच ही घटना झाली.
राज्यात आपल्या पक्षाचे गृहमंत्री असल्यानेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असा गोंधळ घालू शकले. या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर कारवाई न केल्यास जशास तसे प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चूक असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणे ही अतिशय आक्षेपार्ह बाब आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध जी कारवाई करायची असेल ती होईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. याबाबत पोलीस आयुक्त निर्णय घेणार आहेत. दुसऱ्या बाजूचे लोक दोषी असतील तर त्याच्यावरही कारवाई होईल, असेही गृहमंत्री म्हणाले.
पुणे –
येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकूण जागांपैकी २७ टक्के जागांवर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी व्यक्तींना उमेदवारी देणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.
केवळ राष्ट्रवादीच नाही तर सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत ओबीसी समाजातील व्यक्तींना पूर्वीच्या प्रमाणात स्वतःहुन किमान २७ टक्के जागांवर उमेदवारी दिली पाहिजे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीसाठी रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणाची कसर भरून निघू शकेल,अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले. यासाठी खास कायदा तयार केला. पण सर्वोच्च न्यायालयाने या सर्वांना स्थगिती दिली आहे.