लखनौ- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आादित्यनाथ यांची छायात्रित्रे कचर्याच्या गहाडीतून नेल्यामुळे एका कचरावेचकाच्या नोकरीवर गदा आली. दरम्यान या प्रकरणात आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य पर्यवेक्षक यांना कचरावेचकांनाा मान्यवर आणि लोकप्रतिनिधी यांच्या प्रतीमांच्या हाताळखणीबाबत माहिती न दिल्याबद्दल नोटीस बजाचण्यात आली आहे.
आपण अशिक्षीत असल्याने आणि छायावित्रे ओळखू न शकल्याने हा प्रकार घडला, असे या कचरावेचकाने सांगितल्याचे महापालिकेतील अधिकार्याने सांगितले. मथूराचे महापालिका आयुक्त अनुनय झा यांनी सांगितले की, या प्रकरणात सत्यशोधन समिती नेमण्यात आली आहे. या समितीला ४८ तासांत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आला आहे. हा अहवाल आल्यानंतरच अंतीम निर्णय घेण्यात येईल.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरा संकलन केंद्रातून बॉबी हा कचरा घेऊन जात होता. त्या कचर्याच्या गाडीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे होती. बॉबीला राजस्थानमधून आलेल्या दोघांनी अडवले. कचरावाहक वाहनातून ही छायाचित्रे काढून त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे सहज ओळखता येतात. त्यामुळे बॉबीला निलंबीत करण्यात आले मात्र त्याच्या नुकसानभरपाईबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेण्यात येईल.
पिंपरी –
देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थान संस्थान राज्य सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. देहू नगरीमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात भाजप पदाधिकार्यांनी राजकीय रंग दिला याला देहू संस्थान विश्वस्तांनी मूक संमती दिली. धार्मिक कार्यक्रम असताना राज्य सरकारचे प्रतिनिधी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांना भाषण करून दिले नाही. तसेच मावळचे माजी आमदार बाळा भेगडे व देहू संस्थांचे पदाधिकारी यांनी स्थानिक आमदार सुनील शेळके व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना निमंत्रण न दिल्याचे दिसून आले.
काल झालेल्या धार्मिक कार्यक्रमात देहू संस्थानने राजकारण केले. कार्यक्रमाच्या स्टेजवरती ठराविक नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दोन नंबरचे स्थान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे होते. तसा ट्रू कॉल दिल्ली मधून पंतप्रधान कार्यालयातून संस्थांनाला मिळाला होता. कार्यक्रम ठिकाणी स्वागत भाषण राज्याचे विरोधी पक्षनेते व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. या नंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले.
यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगूनही कार्यक्रमात अजित पवार यांना भाषणासाठी बोलू दिले नाही. देव संस्थानच्या वतीने संबंध नसतानाही नागपूरच्या आमदारांना भाषण करण्याचा मान दिला. मात्र पुण्यातील भूमिपुत्र असणाऱ्या उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना मात्र डावलल्याने भूमीपुत्रांचा अपमान झाला असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी बोलताना व्यक्त केले.
मुंबई –
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याप्रकरणी भारत सरकारने जगभरातील मुस्लिम समाजाची माफी मागावी या मागणीसाठी हॅकर्सनी ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केली आहे. दरम्यान अल-कायदा या दहशतवादी संघटनेनंही भारतातील वेगवेगळ्या शहरांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
आता देशातील वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी वेबसाईट्सवर याच मुद्द्यावरुन सायबर हल्ले होताना दिसतायत. याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील 50 वेबसाईट्स हॅक झाल्यात. या हॅकर्सने जगभरातील मुस्लीम हॅकर्सला भारतीय वेबसाईटवर सायबर हल्ले करण्यासाठी आवाहनही केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काहींचा समाजात तेढ पसरवण्याचा प्रयत्न सुरु असून या प्रकरणातील कारवाईबाबत पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, “अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या ही वस्तुस्थिती आहे. एडीजी मधुकर पांडे पुढील तपास करत आहे. ठाणे पोलीस कमिशनची वेबसाईट हॅक झाली आहे, परंतु कोणताही महत्त्वाची माहिती लीक झालेली नाही. कोणत्याही कारणावरून समाज- समाजात एक प्रकारे तेढ निर्माण करण्याचे जे काम सुरु आहे त्याचे हे परिणाम आहेत. हॅकर्सनी जगभरातील सर्व हॅकर्सना विनंती केली आहे की, तुम्हीही यात सहभागी व्हा. राज्य सरकारच्या वतीने या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. त्यावर काय उपाय योजना करायच्या आहेत त्यासंदर्भातही यंत्रणा कार्यरत आहेत. तथापी सर्व माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याने त्यामध्ये अधिक माहिती देण्यासाठी माझ्याकडे आता नाही.”
“हॅकर्सची जी मागणी आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात माफी मागितली पाहिजे. ज्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी जे प्रेषित पैगंबर मोहम्मदांबद्दल उद्गार काढले त्याबद्दल अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत कारवाई सुरु आहे. त्याबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत पंतप्रधानांनी स्वत: ठरवले पाहिजे,” अशी मागणीही गृहमंत्र्यांनी केली आहे.
“ही घटना दुर्दैवी आहे. कारण आपल्या देशात समाजा-समाजात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, त्याला प्रतिकार म्हणून प्रतिहल्ला म्हणून अशाप्रकारची कृती समाजातल्या टोकाच्या विचार करणाऱ्या लोकांकडून होत आहे. ही बाब बरोबर नाही कारण शेवटी सगळ्यांना सलोख्याने राहायचे असेल तर अडचणी भावना समजून घेणे गरजेचे आहे. हॅकर्सकडून जे अपील केले जात आहे ज्यामुळे नुकसान सर्वांचे होणार आहे. त्यामुळे अशा गोष्टींपासून सर्वांनी दूर रहावं” अशी विनंती गृहमंत्र्यांनी केली आहे.
पिंपरी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथे उद्या (14 जून) येत आहेत. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या या दौऱ्याला चक्क भाजप युवा मोर्चाचा विरोध असल्याचं समजतंय. पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा जनताचे उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी मोदींच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
सचिन काळभोर यांच्या विरोधाबाबत त्यांनी सांगितले की, रेड झोन एरिया कमी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू असून, आंदोलन व मोर्चे काढण्यात आले आहेत. देहू गाव, देहरोड, चिखली, तळवडे, मोशी, दिघी, निगडी, बोपखेल ह्या गावातील सर्व जमीन रेड झोन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा म्हणून पुणे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे बांधकाम परवाना मिळत नाही तसेच इतर मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. गटारं, रस्ता, पाणी, लाईट इत्यादी सुविधा नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेड झोन एरिया क्षेत्र कमी करून स्थानिक भूमी पुत्र यांना न्याय मिळवून द्यावा. त्यानंतरच संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहावे अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची मागणी मान्य न केल्यास त्यांच्या दौऱ्याच्या वेळेस रास्ता रोको करण्यात येईल तसेच काळे झेंडेही दाखवण्यात येणार आहेत असे सचिन काळभोर यांनी सांगितले.
आता सचिन काळभोर यांची भाजपा नेते समजूत काढणार की त्यांचे आदोलन मोडून काढणार हे पाहावे लागेल.
नॅशनल हेराल्ड काय आहे ?
देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी 20 नोव्हेंबर 1937 रोजी असोसिएटेड जर्नल लिमिटेड (AJL) ची स्थापना केली. विविध भाषांमध्ये वर्तमानपत्रे प्रकाशित करणे हा त्याचा उद्देश होता. त्यानंतर इंग्रजीमध्ये ‘नॅशनल हेराल्ड’, हिंदीमध्ये ‘नवजीवन’ आणि उर्दूमध्ये ‘कौमी आवाज’ ही वृत्तपत्रे एजेएल अंतर्गत प्रकाशित झाली.एजेएलच्या निर्मितीमध्ये पं. जवाहरलाल नेहरू यांची भूमिका होती, परंतु ते कधीही त्यांच्या मालकीचे नव्हते. कारण, 5000 स्वातंत्र्यसैनिक या कंपनीला पाठिंबा देत होते आणि ते तिचे शेअर होल्डरही होते. 90 च्या दशकात ही वृत्तपत्रे तोट्यात जाऊ लागली. 2008 पर्यंत एजेएलवर 90 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज होते. मग AJL ने निर्णय घेतला की यापुढे वर्तमानपत्र प्रकाशित केले जाणार नाहीत. AJL वृत्तपत्रांचे प्रकाशन बंद केल्यानंतर ते मालमत्ता व्यवसायात उतरले.
वादाची सुरुवात कुठून झाली?
2010 मध्ये एजेएलचे 1057 भागधारक होते. नुकसान होत असताना, त्याचे ‘होल्डिंग यंग इंडिया लिमिटेड’ अर्थात YIL कडे हस्तांतरित करण्यात आले. यंग इंडिया लिमिटेडची स्थापना त्याच वर्षी म्हणजे 2010 मध्ये झाली. यामध्ये काँग्रेस पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस राहुल गांधी संचालक म्हणून सामील झाले. राहुल गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी यांची कंपनीत 76 टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित 24 टक्के काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस (दोघांचेही निधन झाले आहे) यांच्याकडे होते.
.. मग गुन्हा दाखल झाला
2012 मध्ये, भाजप नेते आणि देशातील प्रसिद्ध वकील सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार होते.सुब्रमण्यम स्वामी यांनी दावा केला की YIL ने 2,000 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता आणि नफा मिळविण्यासाठी निष्क्रिय प्रिंट मीडिया आऊटलेट्सची मालमत्ता ‘चुकीच्या’ पद्धतीने अधिग्रहित केली.
AJL ने काँग्रेस पक्षाला दिलेले 90.25 कोटी रुपये वसूल करण्याचे अधिकार मिळवण्यासाठी YIL ने फक्त 50 लाख रुपये दिले, असा आरोपही स्वामी यांनी केला. ही रक्कम पूर्वी वृत्तपत्र सुरू करण्यासाठी कर्ज म्हणून दिली होती. एजेएलला दिलेले कर्ज बेकायदेशीर होते, कारण ते पक्षाच्या निधीतून घेतले होते, असा आरोपही त्यांनी केला.
ईडीची चौकशी, कोर्टाने केला सोनिया-राहुलला जामीन मंजूर
2014 मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. त्यामुळे दोघेही कोर्टात पोहोचले. याप्रकरणी 19 डिसेंबर 2015 रोजी ट्रायल कोर्टाने दोघांनाही जामीन मंजूर केला होता. 2016 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील पाचही आरोपींना (सोनिया, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दुबे) वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट दिली होती, त्यांच्याविरुद्धची कार्यवाही रद्द करण्यास नकार दिला होता.
शासनाची कारवाईही ठरली
2018 मध्ये केंद्र सरकारने 56 वर्षे जुनी कायमस्वरूपी लीज संपवण्याचा निर्णय घेतला. पुढे, एजेएल कोणतीही छपाई किंवा प्रकाशन क्रियाकलाप करत नसल्याच्या कारणावरून हेराल्ड हाऊसच्या परिसरातून एजेएलला बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या कामासाठी इमारत 1962 मध्ये देण्यात आली होती. तथापि, 5 एप्रिल 2019 रोजी, सुप्रीम कोर्टाने पुढील सूचना येईपर्यंत सार्वजनिक परिसर (अनधिकृत रहिवाशांचे निष्कासन) कायदा, 1971 अंतर्गत AJL विरुद्धच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्याचा आदेश दिला. आता या प्रकरणी ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
राहुल गांधींना अटक होऊ शकते का?
सर्वोच्च न्यायालयाचे वकील चंद्र प्रकाश पांडे म्हणाले, ‘सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेही नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. अशा परिस्थितीत, चौकशीदरम्यान, जर ईडीला राहुल तपासात सहकार्य करत नाही असे वाटत असेल तर ते त्याला ताब्यात घेऊ शकतात. यानंतर राहुलला न्यायालयात हजर केले जाईल, तेथून त्याला ईडीच्या कोठडीत पाठवायचे की न्यायालयीन कोठडीत याचा निर्णय घेतला जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी –
राष्ट्रवादी काँग्रेसला आज स्थापन होऊन 22 वर्षे पुर्ण झाली आहेत. 23 व्या वर्षांत पदार्पण करत असताना आम्हाला गेल्या 22 वर्षांत पक्षाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी घेतलेले निर्णय, विकासाची कामे व सर्वसधर्म समभावाची जोपासना करत केलेल्या वाटचालीचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले. वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भरगच्च कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना अजित गव्हाणे म्हणाले, 1999 साली राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य व्यक्तीचा विकास ही भूमिका पक्षाच्या स्थापनेपासून जोपासण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात राज्याचा विकास, नवनविन संकल्पना राबवितानाच शेतकर्यांच्या विकासाला महत्त्व दिले आहे. तर पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा केवळ राष्ट्रवादीतील नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे झाला आहे. महापालिकेतील पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात शहराची दैदिप्यमान वाटचाल झाली. रस्ते, उड्डाणपूल, उद्याने, स्वच्छता, पर्यावरण या बाबींना महत्त्व देतानाच सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे प्रश्न सोडविण्यात आम्हाला यश आले.
राज्यपातळीवर काम करताना पक्षाच्या माध्यमातून अनेक निर्णय घेण्यात आले. शरद पवार यांच्या नेतृत्त्वामुळे महाराष्ट्राला देशातील महत्त्वाचे विकसीत राज्य म्हणून दर्जा मिळवून देण्यात राष्ट्रवादीचाच मोठा हातभार आहे. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे करोनावर मात करणे शक्य झाल्याचेही अजित गव्हाणे म्हणाले. एका बाजूला सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष नागरिकांसाठी कार्यरत असतानाही राष्ट्रवादी वलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून फेसशिल्ड, सॅनिटायझर, मास्क वाटप, पालकत्व हरपलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे, सामाजिक संस्थांना अॅम्ब्युलन्स वाटप, गरजूंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप यासारखे उपक्रम घेऊन समाजातील शेवटच्या घटकाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न पक्षाने केला.
करोना काळात मदत करताना ट्रस्टच्या माध्यमातून अतिवृष्टी, दुष्काळामुळे खचलेल्या शेतकर्यांनाही मदत करण्यात आली. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना संगणक वाटपासारखे उपक्रम राबवून तरुणांना शैक्षणिकदृष्ट्या सबल करण्यात आल्याचे गव्हाणे म्हणाले.
आगामी काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून नियोजबद्ध कार्यक्रम हाती घेऊन शासनाच्या माध्यमातून जलद गतीने विकासकामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून सर्वसामान्यांचा विकास हाच धागा पकडून राष्ट्रवादीची वाटचाल कायम राहणार असल्याचेही गव्हाणे म्हणाले.
आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीला सर्वाधिक यश
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पवार यांच्याकडील दुरदृष्टी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेली कामांची धउाडी याद्वारेच विकास साध्य होऊ शकतो, याची खात्री आता सर्वांना पटली आहे. येत्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीलाच सर्वाधिक यश मिळेल, असा दावाही गव्हाणे यांनी यावेळी बोलताना केला. ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असल्याने येत्या महापालिका निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होतील, याबाबत आपल्याला खात्री आहे.
महागाईवरून केंद्रावर टीका
सध्या संपूर्ण देशभर महागाईचा भडका उडाला आहे. मात्र केंद्रातील सत्ताधारी व राज्यातील विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून जाती-धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलीत करण्याच्या हेतून असे मुद्दे निर्माण केले जात असल्याचा आरोप गव्हाणे यांनी यावेळी केला. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असून या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम
राष्ट्रवादीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी झेंडावंदन करण्यात आले. तसेच शहरातील 46 प्रभागांमध्ये प्रत्येक घरावर झेंडा व स्टिकर लावण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, पर्यावरण विषयक जागृती, नितीन बानगुडे यांचे व्याख्यान, महिला सेलच्या माध्यमातून महिला बचत गट योजना व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे 10 व 12 वीच्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन शिबिर, सुशिक्षित बेरोजगार अभियान, डांगे चौक येथे महागाई विरोधात आंदोलन, तीनही विधानसभा मतदारसंघात रक्तदान शिबिर, 46 प्रभागांमध्ये डोळे तपासणी शिबर तसेच छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तीनही विधानसभा मतदारसंघात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तसेच दि. 9 जून ते 23 जून या कालावधीत सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती अजित गव्हाणे यांनी यावेळी दिली.