पाकिस्तानातील पत्रकारांचाच अन्सारींवर आरोप करणार्यावर अविश्वास
नवी दिल्ली – पाकिस्तानी पत्रकाराला माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी भेटले आणि नंतर या पत्रकाराने पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयला माहिती हस्तांतरीत केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने समाज माध्यमाद्वारे केल्यानंतर खळबळ उडाली होती. प्रत्यक्षात पाकिस्तानातील पत्रकारीतेत या पत्रकाराची ओळख आढ्यताखोर, प्रसिध्दीलोलूप आणि कटाचे काहीतरी कल्पोकल्पीत सिध्दांत मांडणारा अशी आहे. त्याच्या वक्तव्यावर पाकिस्तानातील पत्रकारांचा विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे. या पत्रकराने २००५ मध्ये झालेला भूकंप आणि २०११ मध्ये जपान मध्ये आलेली सुनामी ही अमेरिकेने घडवलेला कट होता अशी मांडणी करून खळबळ माजवून दिली होती.
नुसरत मिर्झा हे काराचीस्थित पत्रकार नवा इ वक्त आणि जंग या दैनिकात स्तंभलेखन करतात. सध्या ते एका टिव्ही चॅनेलवर एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी या मिर्झाला हमीद अन्सारी यांनी निमंत्रीत केले आणि गोपनीय माहिती हस्तांतरीत केल्याचा आरोप समाजमाध्यमांतून केला. अन्सारी यांनी हे आरोप फेटाळून लावत हा खोडसाळपणा आणि खोटारडेपणा असल्याचे स्पष्ट केले होते.
भाटीया यांनी पाकिस्तानी युट्यबर शकील चौधरी यांनी मिर्झा यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा उल्लेख केला. त्या मुलाखतीत मिर्झा यांनी अन्सारी यांचा दोनदा ओझरता उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी अन्सारी यांच्याशी कोठेेही संवाद साधल्याचाा उल्लेख केला नाही. पहिल्या उल्लेखात मिर्झा म्हणतात, २०१० मध्ये मी दहशतवादावरील परिषदेसाठी भारतात गेलो. त्यावेळी हमीद अन्सारी हे उपराष्ट्रपती होते असे म्हटले आहे.
त्यावरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक हल्ला चढवला. त्याला उत्तर देताना अन्सारी म्हणाले, आंतराराष्ट्रीय दहशतवाद आणि मानवी हक्क यांवरील न्यायाधिशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्धाटन मी केले होते. त्यावेळी निमंत्रीतांची यादी आयोजकांनी बनवली होती. आपण मिर्झाला निमंत्रितही केले नाही अथवा त्याला भेटलोही नाही.
आपल्या मुलाखतीत दुसर्यांदा अन्सारी यांचा उल्लेख करताना, मी अन्सारी यांच्यासह अनेक काँग्रे्रस नेत्यांना भेटलो. पण यातही त्याने अन्सारी यांच्याशी चर्चा केल्याचा कोणत्याही तपशीलाचा उल्लेख केला नाही. मिर्झा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी केलेल्या फोनकॉलला कोणताही प्रतीसाद दिला नाही, असे इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटले आहे.
या मुुलाखतीत मिर्झाने स्वत:चा उल्लेख भारतविषयक तज्ज्ञ असा केला आहे. २००५ आणि २००६ मध्ये भाारताला दिलेल्या भेटीत आपण अनेक शहरांना भेट दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या ५० मिनिटांच्या मुलाखतीत मिर्झाने आपल्या भाारत विषयक माहिती आणि अनुभवाला पाकिस्तानात कोणीही गांभीर्याने घेतले नाही आणि तरीही त्याकाळात सामरिक बाबतीत आपण महत्वाची कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. पाकिस्तानला भारतापासून सध्या धोका असताना पाकिस्तानात कोणी भारतविषयक तज्ज्ञ का नाही? या प्रश्नावर मिर्झाा म्हणताात आपल्याला भारताविषयी, भारतीय मुस्लीमांविषयी माहिती आहे. त्यातील काही आपले चांगले मित्रही आहेत. २००६ नध्ये आपण भारतातील अनेक शहरांना भेट दिल्यानंतर त्यावेळचे पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसौरी यांनी आपल्याला सात देशांचा व्हिसा मिळवून दिला. (त्यावेळि पाकिस्तानी पर्यटकांना अधिकाधिक तीन शहरांसाठी व्हिसा मिळत असे) कसौरी यांनी मला आयएसआयचे महासंचालक अशफाक परवेझ कयानी यांना भेटण्यास सांगितले होते.
मी सांगितले, मी कयानींना भेटण्यास जाणाार नाही. तुम्हीच त्यांना ते करण्यास सांगा. त्यानंतर काही दिवसांनी एका ब्रिगेडीयरचा मला फोन आला. तुमच्याकडे काही अधिक माहिती आहे का? असे त्याने विचारले. मी म्हणालो, माझ्याकडे अतिरिक्त माहिती नाही. मी पुरेशी माहिती दिली आहे त्यावर काम करा.
पाकिस्तानला भारत चांगला माहिती आहे. कारण आपण मुगलांचे वंशज आहोत. आपण त्यांच्यावर राज्य केल आहे.
पाकिस्तानातील पत्रकार मात्र कसौरी हे मिर्झा सारख्या व्यक्तीशी चर्चा करत असल्याबद्दल अविश्वास दाखवतात. कसौरी यांच्या खास मर्जीतील पत्रकारांनी मिर्झा अथवा कसौरी यांनी एकमेकांविषयी कधीही काहीही बोलल्याचे आठवत नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचे हे कथानक येथेच खोटे असल्याचे स्पष्ट होते, असे पाकिस्तानातील एका अनुभवी आणि अभ्यासू पत्रकाराने सांगितले. मिर्झा यांचे नाव हल्ली पत्रकारांमध्ये फाारसे घेतलेही जात नाही. त्यामूले त्यांनी केलेल्या कामापेक्षा अधिक वाढवून आणि चढवून ही कथा रंगवली असावी, असे मत अन्य एका पत्रकाराने व्यक्त केले.
मुंबई – शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावरील मनी लाँड्रीगच्या आरोपांच्या चौकशीची तपासणी करण्यासाठी एक केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. त्यांनी परब यांच्या रिसॉर्टचे बांधकाम करत असताना सागरी सीमा सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याचीही तपासणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी न्यूज मेट्रोला सांगितले. या घटनेचे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
परब यांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दापोली (जि. रत्नागिरी) येथील त्यांच्या रिसॉर्टच्या बांधकामाप्रकरणी अंमलबजावणी संचनालयाने सलग तीन दिवस चौकशी केली होती. त्यानंतर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांना केंद्रीय पथकाकडून लक्ष्य बनवले जात असल्याची जोरदार टीका राजकीय वर्तुळात झाली होती. यापुर्वी ठाकरे यांचे विश्वासू निकटवर्तीय संजय राऊत यांचीही अंमलबजावणी संचनालयाने चौकशी केली होती.
अंमलबजावणी संचनालयाच्या दबावापाोटीच महाराष्ट्रातील आघाडी सरकार कोसळले. त्यामागे केंद्रीय यंत्रणांचा वापर करूनब घेत असल्याची टीका होत होती. त्याला उत्तर देताना शिंदेसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असल्याची कोपरखळी मारली होती.
मुंबई –
राज्यात कोकणात मान्सूनला सुरूवात झाली असली तरी तो राज्यातील इतर भागात पोहोचण्यासाठी विलंब लागत आहे. दरम्यान, कालपासून नंदूरबार, जळगाव, परभणी या परिसरात मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली आहे. मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याचे आयएमडीकडून सांगण्यात आले आहे. परंतु कोकणानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात मान्सूनला सुरूवात होते. यंदा मात्र मान्सूनचा पाऊस या भागात झाला नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकरी खरिपाची पेरणी करण्यासाठी थांबला आहे. तर हवामान खात्याच्या माहितीनुसार 75 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
10 जूनला कोकणात पोहोचलेला मॉन्सून 11 जून रोजी बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात डेरेदाखल झाला. तर सोमवारी मॉन्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठला.
निम्म्या महाराष्ट्रासह दक्षिण गुजरात, कर्नाटकचा बहुतांश भाग तेलंगाणा, रायलसीमाचा काही भाग आणि तमिळनाडूच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने चाल केल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. शुक्रवारपर्यंत (ता. 17) गुजरातच्या आणखी काही भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक तामिळनाडूसह विदर्भाच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगालच्या आणखी काही भागासह झारखंड, ओडिशा, बिहार काही भागातही मॉन्सून प्रगती करण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.
नवी दिल्ली –
जगातील सर्वात मोठ्या विषारी सापाला किंग कोब्रा म्हणतात. किंग कोब्राची लांबी सुमारे 13 फूट असू शकते, ज्याची ओळख मोठा फणा आहे. किंग कोब्राचे साम्राज्य भारतापासून इंडोनेशियापर्यंत विस्तारले आहे. यापैकी चार प्रजाती संपूर्ण जगावर राज्य करतात, जे किंग कोब्राच्या प्रजातींचे राजेशाही वंशज आहेत. या एकमेव सापाची चार वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. संकरित प्रजननानंतर, किंग कोब्राचे स्वरूप वेगळे, भयावह आणि विषारी असते.
जगात आढळणाऱ्या किंग कोब्राच्या चार प्रजातींना अद्याप अधिकृत नाव मिळालेले नाही. परंतु ते नैऋत्य भारतातील पश्चिम घाट वंश, भारत आणि मलेशियातील इंडो-मल्यायन वंश, पश्चिम चीन आणि इंडोनेशियातील इंडो-चायनीज वंश आणि फिलीपिन्समध्ये आढळणारे लुझोन बेट वंश या नावांनी ओळखले जातात. चला जाणून घेऊया किंग कोब्राबद्दलचे धक्कादायक खुलासे…
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे उत्क्रांतीवादी पर्यावरणशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे संशोधक कार्तिक शंकर म्हणतात की किंग कोब्राच्या अनेक प्रजाती आहेत हे आश्चर्यकारक आहे. कारण त्या सर्व सारख्याच दिसतात. ते परिसरानुसार वागतात, असे अभ्यासात म्हटले आहे.
समानता असूनही, ते मोठ्या भौगोलिक क्षेत्रात राहतात. उदाहरणार्थ, फिलीपिन्समध्ये आढळणाऱ्या कोब्राच्या शरीरावर पांढर्या रंगाचे वर्तुळ असतात, तर थायलंडमध्ये आढळणाऱ्या कोब्राचे शरीर सफेद रंगाचे असते.
कोब्रा हा एक असा साप आहे जो आजूबाजूच्या वस्तू गोळा करतो आणि आपले घरटे बनवतो ज्यामध्ये तो अंडी घालतो. त्यांची अंड्यांबद्दलची वागणूक देशानुसार बदलते. अनेक भागात, मादी किंग कोब्रा अंडी उबवतात तर काही ठिकाणी ते तसेच सोडतात.
संशोधक किंग कोब्राचे वर्तन आणि शारीरिक फरक तसेच चार प्रजातींमधील अनुवांशिक फरक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्नाटकातील कलिंगा सेंटर फॉर रेन फॉरेस्ट इकोलॉजीचे जीवशास्त्रज्ञ पी. गौरीशंकर म्हणतात, किंग कोब्राच्या आनुवंशिकतेचा अभ्यास करणे कठीण काम आहे. त्यांना धरून त्यावर संशोधन करणे धोकादायक ठरू शकते.
किंग कोब्राचा अभ्यास करण्यात अडचणी येत असल्याचे ते सांगतात. त्यांनी सांगितले की किंग कोब्रामधील अनुवांशिक फरक समजून घेण्यासाठी त्यांच्या टीमने 62 किंग कोब्राचे डीएनए नमुने गोळा केले आहे.
संशोधकांनी प्रथम मायटोकाँड्रियल जनुकांचा अभ्यास केला. ही जनुके आईकडून मुलाकडे हस्तांतरित केल्यामुळे हे केले गेले आहे. यामध्ये चार वेगवेगळ्या प्रजातींची माहिती मिळाली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते कोणत्याही एका स्थानिक प्रजातीशी संबंधित नाहीत आणि त्यांच्याशी संबंधित नाहीत. अनुवांशिकदृष्ट्या देखील ते भिन्न आढळले आहेत.
छत्तीसगड –
छत्तीसगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका विवाहित तरुणाला आणि त्याच्या मैत्रिणीला नग्न करून संपूर्ण गावात फिरवण्यात आले आहे. ही अत्यंत संवेदनशील बाब समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या भीषण कृत्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे.
ही घटना कोंडागाव जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या एका तरुणाला त्याच्या पत्नीने तिच्या मैत्रिणीसोबत एका खोलीत पकडले. यानंतर महिलेने आरडाओरडा करून ग्रामस्थांना तेथे बोलावले. यानंतर गावकऱ्यांनीच तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला.
या शिक्षेअंतर्गत प्रथम विवाहित तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला मारहाण करण्यात आली. यानंतर त्यांना विवस्त्र करून गावात फिरवले. ही घटना शनिवारी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्याचा व्हिडिओ आता समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आतापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
गुगलचे प्रवक्ते ब्रायन गॅब्रिएल यांनी बीबीसीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की लॅमडा संवेदनशील असल्याचा कोणताही पुरावा नाही. दुसरीकडे अभियंता ब्लेक लेमोइन, ज्याने ते विकसित केले आहे, त्याला असा विश्वास आहे की लॅमडाच्या प्रभावी शाब्दिक कौशल्यामागे संवेदनशील मेंदूदेखील असू शकतो. ब्लेक लेमोइननेच चॅटबॉटसह चॅटिंग लीक केली होती.
सध्या अनेक कंपन्या आपली सेवा किंवा ग्राहक सेवा केवळ चॅटबॉट्सद्वारे चालवित आहेत, परंतु सध्याच्या चॅटबॉट्सची स्वतःची व्याप्ती आहे, ज्यामुळे ग्राहकांना समस्या निर्माण होतात. विद्यमान चॅटबॉट्स एका सेट पॅटर्ननुसार लोकांना प्रतिसाद देऊ शकतात, परंतु जर लॅमडा यशस्वी झाला, तर त्याला येणाऱ्या काळात ग्राहक समर्थन सेवेचा सर्वाधिक फायदा मिळेल. शाळेपासून ते लहान-मोठ्या उद्योगधंद्यांपर्यंत त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
मुंबई –
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याप्रकरणी भारत सरकारने जगभरातील मुस्लिम समाजाची माफी मागावी या मागणीसाठी हॅकर्सनी ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केली आहे. दरम्यान अल-कायदा या दहशतवादी संघटनेनंही भारतातील वेगवेगळ्या शहरांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
आता देशातील वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी वेबसाईट्सवर याच मुद्द्यावरुन सायबर हल्ले होताना दिसतायत. याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील 50 वेबसाईट्स हॅक झाल्यात. या हॅकर्सने जगभरातील मुस्लीम हॅकर्सला भारतीय वेबसाईटवर सायबर हल्ले करण्यासाठी आवाहनही केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काहींचा समाजात तेढ पसरवण्याचा प्रयत्न सुरु असून या प्रकरणातील कारवाईबाबत पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, “अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या ही वस्तुस्थिती आहे. एडीजी मधुकर पांडे पुढील तपास करत आहे. ठाणे पोलीस कमिशनची वेबसाईट हॅक झाली आहे, परंतु कोणताही महत्त्वाची माहिती लीक झालेली नाही. कोणत्याही कारणावरून समाज- समाजात एक प्रकारे तेढ निर्माण करण्याचे जे काम सुरु आहे त्याचे हे परिणाम आहेत. हॅकर्सनी जगभरातील सर्व हॅकर्सना विनंती केली आहे की, तुम्हीही यात सहभागी व्हा. राज्य सरकारच्या वतीने या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. त्यावर काय उपाय योजना करायच्या आहेत त्यासंदर्भातही यंत्रणा कार्यरत आहेत. तथापी सर्व माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याने त्यामध्ये अधिक माहिती देण्यासाठी माझ्याकडे आता नाही.”
“हॅकर्सची जी मागणी आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात माफी मागितली पाहिजे. ज्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी जे प्रेषित पैगंबर मोहम्मदांबद्दल उद्गार काढले त्याबद्दल अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत कारवाई सुरु आहे. त्याबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत पंतप्रधानांनी स्वत: ठरवले पाहिजे,” अशी मागणीही गृहमंत्र्यांनी केली आहे.
“ही घटना दुर्दैवी आहे. कारण आपल्या देशात समाजा-समाजात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, त्याला प्रतिकार म्हणून प्रतिहल्ला म्हणून अशाप्रकारची कृती समाजातल्या टोकाच्या विचार करणाऱ्या लोकांकडून होत आहे. ही बाब बरोबर नाही कारण शेवटी सगळ्यांना सलोख्याने राहायचे असेल तर अडचणी भावना समजून घेणे गरजेचे आहे. हॅकर्सकडून जे अपील केले जात आहे ज्यामुळे नुकसान सर्वांचे होणार आहे. त्यामुळे अशा गोष्टींपासून सर्वांनी दूर रहावं” अशी विनंती गृहमंत्र्यांनी केली आहे.