प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. तर चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येल स्टार फिल्म्स, लाईट विदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पाहुयात, या फक्कड ‘सवाल-जवाब’ची झलक !
मुंबई-
गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे सातत्याने चर्चेत आहे. त्यांच्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच ‘शेर शिवराज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट शिवाजीला पकडण्यासाठी विजापूर सल्तनतने पाठवलेल्या सेनापती अफझलखानाच्या शिवाजीच्या प्रसिद्ध वधाची शौर्यकथा सांगेल.छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे ‘शेर शिवराज’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.शिवाजीने अफझलखानाला आपल्या मुठीतील वाघनखे काढून त्याच्या पोटात घुसवून त्याच्या आतड्याचं बाहेर काढल्या आणि त्याला ठार केले हे आपण इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचा बराच वेळा वाचत आलो आहोत. पण आता हे सर्व आता प्रेक्षक मोठ्या पडद्यावर पाहू शकतील.
दरम्यान अफजलखानाची भूमिका या चित्रपटात कोण साकरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या चित्रपटात अफजलखानाचा पहिला लूक नुकताच समोर आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी याच अष्टकामधील चौथा चित्रपट शेर शिवराज हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिनेता चिन्मय मांडेलकरने नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरद्वारे अफजलखानाचा पहिला लूक समोर आला आहे.
‘श्री शिवराज अष्टक’ मधील इतर चित्रपटाप्रमाणे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकर साकारत आहे. तर नजरेत विखार असणाऱ्या अफजलखानाची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील विविध खलनायकांची नाव यासाठी चर्चेत होती. पण अफजल खानाची भूमिका यातील नेमके कोण साकारणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचे उत्तर अखेर समोर आले आहे.
चिन्मय मांडलेकरने शेअर केलेल्या या नव्या पोस्टरमध्ये स्वत: चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसत आहे. त्यासोबतच जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या मृणाल कुलकर्णी दिसत आहेत. तसेच या नव्या पोस्टरमध्ये अफजल खानाची झलक पाहायला मिळत आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूड अभिनेता मुकेश ऋषी आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात त्याने खलनायकांच्या भूमिका साकारल्या आहेत.
विशेष म्हणजे या चित्रपटातील ‘साक्षात शिव – शंभूचा अवतार, मावळ देशीचा शिवमल्हार..शिवबा आमचा तारणहार या गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. चिन्मयने हे पोस्टर शेअर करताना अहोरात्र अन्याय-अत्याचार सहन करत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला.दाही दिशा थरथरल्या, काळ पुरुषाच्याही कानठळ्या बसल्या आणि प्रचंड गर्जना करत प्रकटला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह ‘शेर शिवराज’ २२ एप्रिल २०२२, असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान चिन्मयची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
नागराज मंजुळे हे कमी कालावधीत अत्यंत गाजलेले नाव आहे. मंजुळे यांनी चित्रपट क्षेत्रात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा दिलेल्या विविध योगदानाबद्दल डी वाय पाटील विद्यापीठानं नागराज मंजुळे यांना सन्मानाची डॉक्टरेट (D. Litt) ही पदवी दिली आहे. त्यामुळे ते आता ‘डॉक्टर नागराज मंजुळे’ या नावानेही ओळखले जातील.
‘पिस्तुल्या’, ‘फॅंड्री’, ‘सैराट’ आणि आता ‘झुंड’ असे एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट देऊन प्रेक्षक आणि रसिकांच्या मनात घर करणाऱ्या नागराज मंजूळे यांचा डी वाय पाटील विद्यापीठाकडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. डी वाय पाटील विद्यापीठानं नागराज मंजुळे यांना सन्मानाची डॉक्टरेट पदवी दिली आहे. नागराज मंजुळे यांनी चित्रपट क्षेत्रात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा दिलेल्या विविध योगदानाबद्दल त्यांचा सन्मान केल्याचं विद्यापीठानं म्हटलं आहे.
नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा. हनुमंत लोखंडे यांनी ही माहिती फेसबुकवर दिली आहे. नागराज मंजुळे यांचे डॉक्टरेट पदवी स्वीकारतानाचे फोटो शेअर करत प्रा. लोखंडे यांनी मंजुळेंना उद्देशून म्हटलं आहे की, ‘संघर्षाच्या काळात आपण एम.फिल किंवा सेट अथवा नेट व्हावे अशी आपली इच्छा होती. त्यासाठी आपण पुणे विद्यापीठात चकरा मारतानाचे दिवस आजही मला आठवतात. आपला डॉक्टर ऑफ लेटर्स पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. याचा साक्षीदार होणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.’
चित्रपट क्षेत्रात पदार्पण केल्यापासूनच नागराज मंजुळे यांनी वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविण्यावर भर दिला. ‘पिस्तुल्या’, ‘फॅंड्री’, ‘सैराट’ आणि आता ‘झुंड’ असे त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. ‘सैराट’ हा मराठी भाषेत निर्मिती झालेला प्रादेशिक चित्रपट असूनही या चित्रपटाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा धंदा केला. या चित्रपटापूर्वी आलेला नागराज मजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटाचीही जोरदार चर्चा झाली. या चित्रपटालाही अनेक विविध पुरस्कार मिळाले आहेत.
पुणे –
२५० पेक्षा जास्त मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करणाऱ्या व चित्रपटसृष्टीत आपल्या कामाने अजरामर झालेल्या निळू फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले –थत्ते यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गार्गी फुले यांनी नुकतंच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना वडीलांच्या बायोपिकविषयी विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देत गार्गी म्हणाल्या, ‘चित्रपटाची स्क्रीप्ट अद्याप तयार करण्यात आलेली नाही. आम्ही एक उत्तम लेखकाच्या शोधात आहोत. या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या प्रसाद ओकने प्राथमिक माहिती गोळा केली आहे. त्याने माझ्या वडिलांसोबत बराच वेळ घालवला आहे आणि त्यांच्यावर चित्रपट करण्यासाठी तो उत्सुक आहे. माझ्या वडिलांची भूमिका पडद्यावर साकारणाऱ्या अभिनेत्याला फायनल करणे हे खूप आव्हानात्मक काम असेल. या वर्षाच्या अखेरीस हा प्रोजेक्ट पूर्णत्वास जाईल अशी आशा आहे.’