पिंपरी –
पिंपरीतील कॅम्प येथील बाजारपेठेतील जे दुकानदार कॅरी बॅग वापरतात त्यांच्यावर महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू झाली आहे. यावरून दुकानदार आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगीही झाली. मात्र एके ठिकाणी दुकानदाराने दंड भरण्याची क्षमता नसल्याचे सांगताच अधिकाऱ्याने ‘दंड भरता येत नसेल तर विष प्या’ असे सुनावल्याचे समजते. त्यावरून दुकानदार व महापालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली.
पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी बाजारपेठेत पसरली, आणि दुकानदार संतप्त झाले. सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पिंपरीमधील कॅम्प बाजार हा पिंपरी व पुण्यातही प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणावर मोबाईल व कपड्यांची दुकाने आहेत. वाजवी भावात वस्तू मिळते असा नागरिकांचा समज असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
गेल्या काही तासांपासून कॅम्प मार्केट बंद असून, काही नेते मंडळी व अधिकारी हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांना दुकाने चालू करण्याची विनंती करीत आहेत.
नवी दिल्ली –
पिंपरी –
सध्या पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या आदशावरून शहरातील अनधिकृत पत्राशेड, हातगाड्या आणि टपर्यांवर धडाकेबाज कारवाई सुरू झाली आहे. मात्र, ‘लेकी बोले सुने लागे’च्या धर्तीवर छोट्या व्यावसायिकांच्या कमाईचा ‘मलिदा’ खाणाऱ्यांच्या पोटाला भीतीचा गोळा उठल्याचे चित्र दिसत आहे. महापालिकेच्या जागेसह मिळेल तिथे टपर्या उभारणार्यांमध्ये पालिकेच्या धडक कारवाईमुळे चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. छोट्या व्यवसायिकांचा खोटा पुळका बाळगणाऱ्यांचे सोंग यामुळे उघडे पडले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाने शहरातील अनधिकृत टपर्या, हातगाडे आणि पत्राशेडवर कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या पाच वर्षांत शहरातील प्रमुख रस्त्यासह आरक्षित जागांवर शेकडोंच्या संख्येने टपर्या उभारल्या गेल्या आहेत. शहरात रोजी-रोटीसाठी आलेल्या गोर-गरिबांना या टपर्या भाड्याने देऊन त्यांच्याकडून अव्याहतपणे हप्तेखोरी सुरू होती. पाच वर्षांपासून या टपर्यांचा उच्छाद शहरात सुरू होता. जागा मिळेल तिथे टपरी आणि रस्त्यावरही पार्किंचा व्यवसाय थाटून याद्वारे लाखोंचा मलिदा गोळा करणारे निर्माण झाले होते. मात्र, महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपताच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी बेकायदा बोकाळलेला हा व्यवसाय मोडीत काढण्याचा निर्णय घेत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शहराच्या संपूर्ण भागात एकाच वेळी ही कारवाई करत राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेतून स्वागत होत असले तरी ‘हप्तेखोरी’ गोळा करणार्यांचे मात्र धाबे दणाणल्याने त्यांनी या कारवाईला विरोध करताना गोर-गरिबांचा व्यवसाय चिरडला जात असल्याचा आव आणत त्याला विरोध करण्याचा पवित्रा घेतल्याचे पहावयास मिळाले.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत उभारण्यात आलेल्या आणि भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या टपर्या कोणाच्या आहेत, याची चौकशी केल्यास बरेच काही बाहेर पडण्याची शक्यता आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या टपर्या उभारणार्यांनी शहराचीच नव्हे तर प्रभागाची आणि रस्त्यांची वाटणी करून टपर्यांचा संसार थाटला आहे. हातगाडे, टपरी आणि पर्किंगच्या नावाखाली सुरू असलेली ही हप्तेखोरी एकदाची समुळ बंद करून हप्तेखोरांचा नायनाट होणे गरजेचे आहे.
वर्षानुवर्षे टपरीधारकांकडून भाडे वसूल करणार्या महापालिकेच्या कारवाई दरम्यान अचानक नॉट रिचेबल झाल्याचे पहावयास मिळाले. कारवाई होणार हे माहिती असतानाही छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना आश्वस्त करणारे अचानक गायब झाल्यामुळे गोरगरीब व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीला जबाबदार कोण ? असाही आता प्रश्न विचारला जात आहे.
भाजपच्या सत्ताकाळात गेल्या पाच वर्षांत अनधिकृत टपऱ्यांची संख्या वाढल्याचा आरोप होत आहे. सत्तेच्या जोरावर अनेक लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या वॉर्डात मिळेल त्या जागी टपर्या ठोकून पाच वर्षांपासून भाडेवसुलीच्या माध्यमातून लाखोंचा मलिदा गोळा केला. न्यायालयाचा निर्णय असतानादेखील महापालिकेत असलेल्या सत्तेच्या जोरावर भाजपच्या नेत्यांनी एकाही टपरीवर कारवाई होऊ दिली नाही. महापालिकेत प्रशासकराज येताच सुरू झालेली कारवाई भाजपच्या नेत्यांना का झोंबत आहे? हा संशोधनाचा भाग असल्याची चर्चा आहे.
नवी दिल्ली –
आपल्या देशात असे अनेक आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी आपल्या कार्याने देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. आयएएस होणे ही काही सोपी गोष्ट नाही, रात्रंदिवस मेहनत आणि अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अनेक परीक्षा दिल्या जातात. यानंतरच एखादा आयएएस अधिकारी होतो आणि त्याला देशसेवेची संधी मिळते. याशिवाय अनेक आयएएस अधिकारीही त्यांच्या अनेक कामांमुळे चर्चेत असतात. झारखंड केडरच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने टाकलेल्या छाप्यापासून प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. मात्र, याआधीही त्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आल्या आहेत. चला तर मग आम्ही तुम्हाला पूजा सिंघलच्या लाइफस्टाइलबद्दल सांगतो. चला, जाणून घेऊ या.
पूजा सिंघल चर्चेत का आहेत ?
सध्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल चर्चेत आहेत कारण रांची येथील त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमारच्या घरातील छाप्यांमध्ये २० कोटींहून अधिक रोख जप्त करण्यात आली आहे.
सिंघल यांच्या लग्नाचीही जोरदार चर्चा
आयएएस अधिकारी पूजा सिंघल त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आल्या होत्या. वास्तविक, त्यांचे लग्न झारखंड कॅडरआयएएस राहुल पुरवार यांच्याशी झाले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि नंतर पूजा सिंघलने एका व्यावसायिक रुग्णालयाचे मालक अभिषेक झांसोबत लग्नगाठ बांधली.
हे नाव आधीच घोटाळ्याशी जोडले गेले आहे
पूजा सिंघलची पोस्टिंग १६ फेब्रुवारी २००९ ते १४ जुलै २०१० पर्यंत खुंटी येथे होती. यादरम्यान त्यांच्यावर १८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. यामध्ये २०२० मध्ये राम विनोद सिन्हा याला अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये पूजा सिंघलचे नावही तपासादरम्यान समोर आले होते.
अगदी लहान वयात बनल्या आयएएस
पूजा सिंघलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्या २००० च्या बॅचच्या आयएएस अधिकारी झाल्या. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले होते. तरुण वयात आयएएस अधिकारी झाल्याबद्दल त्यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही नोंदवले गेले. पण सध्या IAS अधिकारी पूजा सिंघल यांच्यावरील आरोपांमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पुन्हा एकदा त्यांची कारकीर्द पूर्वीप्रमाणेच वादात अडकताना दिसत आहे.
जर आपण IAS अधिकारी पूजा सिंघलच्या कार कलेक्शनबद्दल बोललो, तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या सरकारी वाहनच वापरतात. पण याशिवाय त्यांच्याकडे टोयोटा कंपनीची कार आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस अधिकारी पूजा सिंघलच्या नेट वर्थबद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची नेट वर्थ 20-50 लाख इतकी आहे.
नवी दिल्ली –
जगातील वैज्ञानिक शोधात आपल्या पुढे असतील, पण देसी जुगाडात ते आपल्या जवळही उभे राहू शकत नाहीत. भारतीय लोक जुगाडच्या आधारे काय बनवत नाहीत? उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येक ऋतूत भारतीय लोक काही ना काही जुगाड शोधतात. उन्हाळ्यात स्वदेशी बनवलेले कुलर असो की हिवाळ्यात स्वदेशी गीझर असो, भारतीय लोक प्रत्येक गोष्टीत पारंगत आहेत. असाच एक भन्नाट जुगाड पुन्हा एकदा समोर आला आहे, ज्यात लग्नसमारंभात होणारा उकाडा दूर करण्यासाठी चक्क थ्रेशर मशीनचा वापर करण्यात आला होता.
“थ्रेशर” की हवा से बारातियों का स्वागत. ग़ज़ब का आइडिया. pic.twitter.com/ewV1XeVZqG
— Awanish Sharan (@AwanishSharan) May 10, 2022
उत्तर भारतातील बहुतांश भाग कडक उन्हाचा सामना करत आहेत. अनेक ठिकाणी पारा ४० अंशांच्या वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत लग्नसराईच्या काळात उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येकजण नवनवीन मार्ग अवलंबत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. छत्तीसगड केडरचे आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिले आहे की थ्रेशरचा वारा मिरवणुकांचे स्वागत करतो, अद्भुत कल्पना. या व्हिडिओमध्ये मंडपाच्या प्रवेशद्वारावर थ्रेशर मशीन लावण्यात आले आहे. त्याखाली पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून हवा थंड होईल. अनेकजण थ्रेशर मशीनसमोर सेल्फी घेतानाही दिसतात. पहा हा जुगाडू व्हिडीओ !