Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022
नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात अत्यंत गंभीर आरोप केले होते. त्यात त्यांनी नमूद केलं की, ‘पोलिसांनी मला २३ तारखेला अटक केली. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. त्यावेळी मी अनेक वेळा पिण्यासाठी पाणी मागितलं. तरी मला रात्रभर पाणी दिलं नाही. मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं. हा सरसरळ माझा जातीवरुन केलेला अपमान आहे. मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली. अनुसुचित जातीच्या लोकांना आम्ही आमचं बाथरुम वापरु देत नाही असंही सांगितलं,’ असा दावा नवनीत राणा यांनी पत्रात केला आहे.
नवनीत राणा यांच्या अटकेप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राज्य सरकारकडून सविस्तर माहिती मागवली आहे. ओम बिर्ला यांनी २४ तासात ही माहिती सोपवण्यास सांगितलं आहे. नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांकडून अमानवीय वागणूक दिली जात असल्याची तक्रार करणारं पत्र लिहिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ही माहिती मागवली आहे. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाच्या मार्फत ही माहिती मागवण्यात आली आहे.
नवनीत राणा यांच्या तक्रारीत वस्तुस्थिती नाही – गृहमंत्री
खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी केली असून त्यामध्ये वस्तुस्थिती नाही तरीसुद्धा लोकसभा अध्यक्षांनी माहिती मागवली आहे तर ती माहिती राज्य सरकार देईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
विविधांगी भूमिका आणि आपल्या अतरंगी कृत्यांमुळे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा नेहमीच चर्चेत असतो. नुकताच रणवीरच्या ‘जयेशभाई जोरदार’ या नव्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाची प्रचंड चर्चा होत आहे. त्यात आता ‘जयेशभाई जोरदार’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तो नावाप्रमाणेच ‘जोरदार’ व्हायरल होतो आहे.
‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाचा ट्रेलर हा २ मिनिटे ५७ सेकंदाचा आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. ‘जयेशभाई’ ही भूमिका रणवीरने साकारली आहे. जयेश ही भूमिका समाजावर असलेल्या पितृसत्ताक दृष्टिकोनावर भाष्य करणारी आहे. त्याच्या कुटुंबात एक मुलगा असलाच पाहिजे असा अट्टाहास असतो. पण त्याला मुलगा होत नसल्याने त्याच्या घरचे दुसरं लग्न करण्याचा आग्रह धरतात. या सगळ्यात जयेशभाई समाजाच्या विरोधात जातो. तो त्याची पत्नी आणि मुलीसोबत पळून जातो. आता तो यात यशस्वी होईल की सामाजिक नियमांना बळी पडेल? हा प्रश्न ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना पडला आहे.