राज्य मुद्रांक विभागाने 12 जुलै 2021 पासून जमीन तुकडाबंदी नियम लागू केले होते. त्यात एन ए 44 जमीन वगळता इतर सर्व घरे, प्लॉट रजिस्ट्री बंद होती.
जमिनीचे तुकडे करुनही विकता येत नव्हते. त्याची रजिस्ट्री बंद होती. यासाठी महाराष्ट्र नोंदणी नियम क्रमांक 44 (1) (ई) हा नियम ठेवला होता. त्यामुळं अशा घर आणि जमिनीची विक्री खरेदी व्यवहार नाईलाजानं बॉण्ड पेपरवर व्हायला लागली होती. या विरोधात काही लोकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती त्यावर औरंगाबाद खंडपीठानं हा निर्णय दिलाय. त्यामुळं आता तुकडा बंदीमुळे होणारा त्रास संपणार आहे.
जमिनीचा पट्टा 1 एकर असेल तर त्याचे तुकडे करुन त्यातील 1 ते 2 गुंठे जमीन विकता येत नव्हती, त्याचे रजिस्ट्री होत नव्हते. जमिनीचे ले आऊट केले तरच रजिस्ट्रेशनची मुभा होती, अथवा जिल्हाधिकारी परवानगीने रजिस्ट्रेशन होऊ शकत असे.
महाराष्ट्र सैनिकांसाठी… pic.twitter.com/zNxanlUVpg
— Raj Thackeray (@RajThackeray) May 2, 2022
केवळ महाराष्ट्रात नाही तर देशातील भोंगे हटविले पाहिजेत असे बजावताना, सरळ सांगून करत नसतील त्यांना आता एकदा महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, हे दाखवूनच द्या असे आव्हान राज यांनी औरंगाबादच्या सभेत केले होते. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी अक्षय्य तृतीयेनिमित्त आरत्या आणि पूजा आयोजित केल्या होत्या. मात्र अशाप्रकारचे कोणतेही कार्यक्रम ईदच्या दिवशी करु नका असं राज यांनी आता कार्यकर्त्यांना सांगितलंय.
राज्य चालवायचे असेल राज्याचे भविष्य लोकांचे भविष्य उत्तम व्हायचे असेल तर पुढच्या काळाचा विचार करावा लागतो. देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधिमंडळात लोकांनी मला एकही दिवस सुट्टी दिली नाही. त्या लोकांच्या भविष्याचा विचार करायची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही मला काय द्यायचं ठेवलं नाही. चार वेळा मुख्यमंत्री म्हणून ५२ वर्षांपासून निवडून देताय, पुढील काळ लोकांच्या जीवन आणि गावं समृद्ध करण्यासाठी देणार आहे, असं शरद पवार म्हणाले. ‘पदावर बसलेले लोक तारतम्य बाळगत नाहीत’
कधी कधी पदावर बसलेल्या लोकांना पदाचे तारतम्य राहत नाही. लोक मला विचारतात यांचं काय करायचं? मी सोडून द्या म्हणतो, असं भाष्य शरद पवार यांनी राज्यपालांसदर्भात केलं. राज्य पुढे नेण्यासाठी कोणाचा आदर्श ठेवायचं हे ठरवायला हवं. ज्या छत्रपतींचा उल्लेख आपण केला त्या शिवछत्रपतींचं आयुष्य जिजाऊंनी घडवलं. कृतत्वांचा वसा पुरुषांनी नाही तर स्त्रियांनी जपला. सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे ठाम उभ्या राहिलेल्या रमाबाईंचंही कर्तृत्व महत्त्वाचं आहे, असं शरद पवार म्हणाले.
माझ्या दृष्टीने येथील पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. जयंत पाटील यांना आत्ता फोन करून उस्मानाबाद जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नाचं काय झालं असं विचारलं. कोरोना काळात हजारो लोक मृत्युमुखी पडले, संकट ग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याच काम टोपेंनी केलं. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी जीवाचे रान करून महाराष्ट्रातील लोकांना बाहेर काढलं.
‘मी पुन्हा येऊ दिलं नाही!’
संकट काळात राजकारण आणायचं नसतं. काही लोकांना जमत नाही,ते कुठेही राजकारण करतात. निकाला आधीच मी येणार अस सांगत होते, पण मी येऊ दिल नाही, असा मिश्कील टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ही आघाडी यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करतेय, असं शरद पवार म्हणाले.