पॉचेफ्स्ट्रूम-
मुमताज खान,लालरिंदिकी तसेच संगीता कुमारीयांनी आपल्या सर्वोत्तम खेळीतून भारतीय महिला हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. याच खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने शुक्रवारी एफआयएचच्या ज्युनियर वर्ल्डकपची सेमीफायनल गाठली. सलिमा टेटेच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व सामन्यात दोन वेळच्या चॅम्पियन कोरियाला धूळ चारली.
भारतीय महिला संघाने दक्षिण कोरियाला 3-0 असे नामोहरम केले आणि ‘एफआयएच’ कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेची दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली. यासह २०१३ मधील कांस्यपदक विजेता भारतीय युवा महिला संघ ९ वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.आणि वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित करणारा भारत हा पहिला महिला युवा संघ ठरला.
कोरियाविरुद्ध उपांत्यपूर्व सामन्यात भारताकडून मुमताज खान, लालिरडिकी आणि संगीता कुमारी यांनी गोल केले.त्यामुळे भारतीय संघाच्या सर्वोत्तम कामगिरीसमाेर बलाढ्य दक्षिण कोरियाचे खेळाडू फ्लाॅप ठरले. त्यामुळे शेवटच्या मिनिटांपर्यंत कोरियाला एकही गाेल करता आला नाही.
भारतीय संघाची युवा खेळाडू मुमताजने स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला. तिने आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांत ६ गाेल केले आहे. यातून ती सध्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गाेल करणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरली. यापूर्वी २००१ मध्ये केरकेट्टा आणि २००९ मध्ये राणी देवीने प्रत्येकी ७ गाेल केले आहेत.
आणि आता नेदरलँड्सशी भारताची रविवारी उपांत्य फेरी होईल.त्यामुळे आता सर्वांचे लक्ष्य येणाऱ्या रविवारच्या खेळावर टिकुन आहे.
सातारा-
महाराष्ट्र केसरी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटात बाला रफीक शेख, माऊली जमदाडे, सिकंदर शेख यांनी नेत्रदीपक विजय मिळवून तिसरी फेरी गाठली.
तर गादी गटात हर्षवर्धन सदगीर, साताऱ्याचा दिग्विजय जाधव, कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील, कौतुक डाफळे यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने रत्नागिरीच्या संतोष दोरवडला चीतपट करीत सर्वानाच धक्का दिला.
मुंबई शहरचा विशाल बनकर आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील लढत रंगतदार ठरली.
तसेच दुसऱ्या फेरीत बनकरने एकेरी पटाचे पकड करीत गुणफलक हलता ठेवून बलदंड ताकदीच्या मोहोळचे तगडे आव्हान परतून लावले.
महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखने लातूरच्या भारत कराडला सुरुवातीपासून वरचढ ठरू दिले नाही.
एकेरी पट आणि दुहेरी पट यासारख्या अस्त्रांचा वापर करून तांत्रिक गुणांवर भारतला पराभूत केले.
सुनचॅन-
ऑल इंग्लंड उपविजेता लक्ष्य सेन आणि मालविका बनसोडचे कोरिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील आव्हान गुरुवारी संपुष्टात आले.
परंतु पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
लक्ष्यने क्रमवारीत 24व्या क्रमांकावरील शेसार हिरेन ऱ्हुस्टाव्हिटोविरुद्ध 20-22, 9-21 अशी हार पत्करली.
उदयोन्मुख मालविकाने थायलंडच्या पोन्रपावी चोचूवाँगकडून 8-21, 14-21 असा पराभव पत्करला.
सिंधूने जपानच्या अया ओहोरीवर 21-15, 21-10 असा दमदार विजय मिळवला.
जागतिक रौप्यपदक विजेत्या श्रीकांतने इस्रायलच्या मिशा झिल्बरमनचा 21-18, 21-6 असा पराभव केला.
मुंबई-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातला हा
३५० वा टी-२० सामना होता.
तर हा सामना 54 धावांनी गमावल्यानंतर चेन्नई संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
दरम्यान, चेन्नईने सामना गमावला असला तरी माजी कर्णधार आणि चेन्नईचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात नवा विक्रम रचलाय.
तसेच या सामन्यात पंजाबचा विजय झालेला असला तरी पराभूत झालेल्या संघातील धोनीचीच सगळीकडे चर्चा होत आहे.
माही च्या नावावर नवा विक्रम;
महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत एकदीवसीय, टी-20 तसेच अनेक कसोटी सामने खेळले आहेत.
दरम्यान, तो भारतीय संघाकडून सर्वात जास्त टी-20 सामने खेळणारा क्रमांक दोनचा फलंदाज ठरला आहे.
रोहित शर्माने भारताकडून आतापर्यंत सर्वाधक म्हणजेच 372 सामने खेळलेले असून तो या विक्रमामध्ये प्रथमस्थानी आहे.
तर या विक्रमामध्ये महेंद्रसिंह धोनीनंतर मिस्टर आयपीएल म्हणून ओळख असलेला सुरेश रैना तिसऱ्या क्रमांवर आहे.
ख्राईस्टचर्च-रविवारी-दि.(३ एप्रिल)-
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने रविवारी ख्रिस्टचर्च येथे इंग्लंडला 71 धावांनी पराभूत करत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकावर विक्रमी सातव्यांदा नाव कोरलं.आजपर्यंत सातवेळा यापूर्वी कोणत्याच संघाला विश्वविजेतेपद जिंकता आले नव्हते. विशेष म्हणजे आत्तापर्यंत १२ वेळा महिला विश्वचषक खेळवण्यात आला आहे. यातील सातवेळा तर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व दिसले आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाने १९७८, १९८२, १९८८, १९९७, २००५, २०१३ आणि २०२२ या वर्षी महिला विश्वचषकावर नाव कोरले आहे.ऑस्ट्रेलियानंतर सर्वाधिकवेळा इंग्लंड महिला संघाने हा महिला विश्वचषक आपल्या नावावर केला आहे.
तर या यादीत न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी आहे.तर दुसरीकडे भारतीय महिला संघाबद्दल सांगायचे झाले तर २००५ आणि २०१७ साली भारताने मिताली राजच्या नेतृत्त्वाखाली अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. पण दोन्ही वेळा भारताला अपयशाचा सामना करावा लागला आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतीय संघ २०२२ महिला विश्वचषकातही मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळला. पण, या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीतही स्थान मिळवू शकला नाही.
या खेळामध्ये,ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करत 50 षटकात 356 धावांचा डोंगर उभा केला.
तर 357 धावांच्या लक्षाचा पाठलाग करायला आलेला इंग्लंडचा संघ मात्र 44 व्या षटकातच तंबुत परतला.
एलिसा हिलीला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं.
एलिसा हिलीने शतक झळकावत विक्रम केला. यासह एलिसा विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत शतक झळकावणारी पहिली खेळाडू ठरली.
नवी दिल्ली-
उपकर्णधार हरप्रीत सिंगची हॅट्ट्रिक आणि कर्णधार मनप्रीत सिंगच्या गोलच्या जोरावर भारतीय पुरुष संघाने रविवारी ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीच्या चुरशीच्या सामन्यात इंग्लंडवर 4-3 अशी मात केली.
तर हा भारताचा इंग्लंडवर दोन दिवसांत सलग दुसरा विजय ठरला.
भारताने शनिवारी 3-3 अशा नियमित वेळेतील बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडवर 3-2 अशी सरशी साधली.
तसेच त्यांनी रविवारीही अप्रतिम खेळ सुरू ठेवताना पुन्हा एकदा आपल्या विजयाची नोंद केली.
या खेळामध्ये,लियाम सॅन्फोर्डने सहाव्या मिनिटाला गोल करत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु आक्रमण फळीच्या दमदार खेळामुळे भारताला दमदार पुनरागमन करण्यात यश आले.
त्यानंतर १५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार मनप्रीतने केलेल्या गोलमुळे भारताने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतरही भारताने हा खेळ टिकवून ठेवला. महत्वाचे म्हणजे उपकर्णधार हरमनप्रीतने २५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरच्या साहाय्याने दोन गोल झळकावत भारताला मध्यांतराला ३-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.
पण त्यानंतर मात्र उत्तरार्धात इंग्लंडने आक्रमणाचा वेग वाढवत भारताच्या बचाव फळीवर दडपण टाकले आणि ३८व्या मिनिटाला डेव्हिड कॉन्डोनने इंग्लंडचा दुसरा गोल केला.
मात्र, पुन्हा हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर अचूक वेध साधत गोल वैयक्तिक हॅट्ट्रिक पूर्ण करताना भारताला ४-२ अशी आघाडी मिळवून दिली. परंतु पुढच्याच मिनिटाला सॅम वॉर्डने केलेल्या गोलमुळे इंग्लंडने पुन्हा भारताची आघाडी कमी केली. त्यांनी १५ मिनिटांच्या अखेरच्या सत्रातही गोल करण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र, या संपूर्ण स्पर्धेत लौकिकाला साजेसा खेळ न केलेल्या भारताच्या बचाव फळीने अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे इंग्लंडला चौथा करण्यात अपयश आले.
विशेष म्हणजे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या भारतीय संघाने यंदा प्रो लीग हॉकीमध्ये सातत्यपूर्ण खेळ केला आहे. त्यांचा हा दहा सामन्यांतील सहावा विजय ठरला असून हा संघ २१ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावरील जर्मनीच्या खात्यावर १७ गुण असून त्यांनी भारतापेक्षा दोन सामने कमी खेळले आहेत.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या 15 व्या हंगामाला सुरुवात झालेली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात या हंगामातील पहिला सामना रंगला.या रोमहर्षक लढतीमध्ये चेन्नईच्या फलंदाजांकडून निराशाजनक कामिगिरी केली असली तरी, महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये एक नवा इतिहास रचला आहे तो म्हणजे;
धोनी आयपीएलमध्ये पन्नास धावा म्हणजेच अर्धशतक करणारा सर्वात जास्त वय असलेला भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.तसेच धोनीने 38 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या.धोनीच्या खेळीमुळे सीएसकेचा संघ कोलकाता नाईट रायडर्ससमोर १३१ धावा करू शकला.
धोनीपूर्वी, आयपीएलमध्ये सर्वात वयस्कर म्हणून अर्धशतकं झळकावणाऱ्यांमध्ये गिलख्रिस्ट आणि ख्रिस गेल आहेत.
तसेच आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या सर्वाधिक वय असणाऱ्या अव्वल ५ खेळाडूंवर नजर टाकली तर ५ पैकी ३ खेळाडू हे भारतीय आहेत. धोनीनंतर राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी देखील अधिक वयात आयपीएलमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. राहुल द्रविडने वयाच्या ४० वर्षे ११६ दिवसांत अर्धशतक केले, तर सचिन तेंडुलकरने वयाच्या ३९ वर्षे ३६२ दिवसांत अर्धशतक झळकावले होते.
या पाच खेळाडूंपैकी आता फक्त महेंद्रसिंह धोनी आयपीएल खेळत आहे तसेच धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते, असेही सांगितले जात आहे.
शनिवारी ‘आयपीएल’च्या सलामीच्या लढतीपूर्वी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने (बीसीसीआय) सत्कार करण्यात आला’.
सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला एक कोटी रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला होता.
तसेच कांस्यपदक विजेती बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोहेनला 25 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
तसेच टोक्यो ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाला एकत्रित एक कोटी रुपये देण्यात आले या संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या हस्ते धनादेश स्वीकारला. यावेळी ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ, ‘आयपीएल’च्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
न्यूझीलंड-दिनांक २८ मार्च-गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील निराशाजनक कामगिरीचा भारतीय महिला क्रिकेट संघाला फटका बसला आहे कारण
रविवारी पार पडलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताला चांगलाच पराभव पत्करावा लागल्याने ,भारताचे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.या पराभवाबरोबरच भारतीय महिला क्रिकेट संघाचं सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न देखील भंग पावलं. दक्षिण आफ्रिकेने भारताला तीन विकेटने हरवलं. ज्याचा फायदा वेस्ट इंडिजच्या महिला संघाला झाला. भारताच्या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं 275 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. क्राइस्टचर्चमध्ये खेळलेल्या रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या चेंडूवर विजय साकारला. अशा प्रकारे भारताचं वर्ल्ड कप मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. 275 धावांचा यशस्वी पाठलाग करुन दक्षिण आफ्रिकेने भारताविरोधात नवीन रेकॉर्ड बनवला आहे. भारताविरोधात त्यांनी केलेला धावांचा हा सर्वात मोठा पाठलाग आहे. याआधी त्यांनी भारताविरोधात 267 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
आफ्रिकेला विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूंवर तीन धावांची आवश्यकता असताना भारताची ऑफ-स्पिनर दीप्ती शर्माने मिग्नन डूप्रीझला बाद केले; पण चेंडू टाकण्यापूर्वी दीप्तीचा पाय क्रीजच्या पुढील रेषेबाहेर गेल्याने तो ‘नो-बॉल’ ठरवण्यात आला.
त्यानंतरच्या दोन चेंडूंवर दोन धावा काढत आफ्रिकेने हा सामना तीन गडी राखून जिंकला अशाप्रकारे नो-बॉलमुळे भारताला मोठी किंमत मोजावी लागली आणि शेवटी, संघ स्पर्धेतून बाद झाला.
आफ्रिकेसह ऑस्ट्रेलिया, गतविजेते इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सध्या सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे चार संघ पात्र ठरले आहेत. बुधवारी ऑस्ट्रेलियाचा सामना वेस्ट इंडिजशी होईल तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेचा सामना इंग्लंडशी होईल.
स्वित्झर्लंड,दिनांक-२८ मार्च-भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू आणि दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही.सिंधू हिने स्विस ओपन सुपर ३०० ही स्पर्धा जिंकली.स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे.
सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या सिंधूने चौथ्या मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानला 21-16, 21-8 अशी सरळ गेममध्ये धूळ चारली आणि जेतेपदाला गवसणी घातली.आणि तिचा बुसाननवरील हा 17 सामन्यांतील 16वा विजय ठरला.
रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य आणि टोकियो ऑलिंपिकमधये कांस्य पदक जिंकलेल्या सिंधूने ओंगबामरुंगफान विरुद्धचे १७ पैकी १६ सामने जिंकण्याची किमया करून दाखवली. सिंधू ओंगबामरुंगफान विरुद्ध फक्त २०१९च्या हाँगकाँग ओपन स्पर्धेत हरली होती. यंदा मात्र दुसऱ्या मानांकित सिंधूने खेळ उंचावत जेतेपदाला गवसणी घातली.
पी.व्ही.सिंधू हिचा इतिहास पाहता;
2013 आणि 2014 मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली.
२०१६ – रिओ ऑलिम्पिक मध्ये ,भारतीय बॅडमिंटन खेळाच्या इतिहासात पहिल्यांदा सिल्व्हर पदक जिंकणारी सिंधू पहिली खेळाडू ठरली.
२०१७-२०१८ मध्ये तिने गोल्ड कोस्टमध्ये २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आणि मिश्र सांघिक स्पर्धेत तीने सुवर्ण जिंकले आणि एकेरी स्पर्धेत रौप्य पदक पटकावले.
कांस्य पदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या बिंग जिआओ हिचा पराभव करत देशाला दुसरे पदक जिंकून दिले. सिंधूचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक ठरले. याआधी तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते, अशी कामगिरी करणारी ती पहिली बॅडमिंटनपटू ठरली आहे.आणि आता;
२०२१ मध्ये स्विस ओपनमध्ये १८ महिन्यांत पहिल्यांदा सिंधूने अंतिम फेरी गाठली, तिला कॅरोलिना मारिनविरुद्ध १२-२१, ५-२१ ने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर तिला थायलंडच्या पोर्नपावी चोचुवॉंगने ऑल इंग्लंड ओपनच्या उपांत्य फेरीत १७-२१, ९-२१ मध्ये सरळ गेममध्ये पराभूत केले. मे महिन्यात, ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ‘बिलीव्ह इन स्पोर्ट’ या मोहिमेत बॅडमिंटनमधील दोन राजदूत म्हणून निवडली गेली.
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ,चीनी ताइपेच्या खेळाडू विरुद्ध सेमीफायनलचा सामना गमावत सुवर्णपदकासह रौप्य पदक मिळवण्याची संधीही गमावली होती. मात्र तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात सिंधूने दमदार पुनरागमन करत सामना दोन सरळ सेट्समध्ये जिंकला. तिने जगातील सध्या 9 व्या क्रमांकावर असणाऱ्या ही बिंगजियाओ हिला पहिल्या सेटमध्ये १३-२१ आणि दुसऱ्या सेटमध्ये १५-२१ ने नमवत कांस्य पदक पटकावलं.
पी व्ही सिंधूयांना पुढील पुरस्कार मिळाले आहेत;
पीव्ही सिंधूला त्यांच्या खेळाच्या प्रतिभाबद्दल;
2013 साली पीव्ही सिंधू यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2015 साली पीव्ही सिंधूला तिच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2016 मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
2018 मध्ये पीव्ही सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून भारताला अभिमानाने गौरविले.
सिंधूने जागतिक बॅडमिंटनवर कायम वर्चस्व राखले आणि 2019 मध्ये तिने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
अशाप्रकारे पी व्ही सिंधूने त्यांच्या कारकीर्दीत वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप, राष्ट्रकुल व ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतरही कधीही धैर्य गमावले नाही.आपल्या परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर विश्वविजेतेपदी त्याने आपल्या यशाने एक सुवर्ण इतिहासच निर्माण केला नाही तर अन्य खेळाडूंसाठीही एक आदर्श ठेवला आहे.