नवी दिल्ली –
“मी इन्स्टाग्रामवर आज एक फोटो बघितला. माझ्या पत्नीने मला पाठवला होता. माझे शब्द लक्षात ठेवा, येणाऱ्या काही वर्षात फॅशन आणि ट्रेंडच्या नावावर लोक न्यूड फोटो पोस्ट करायला लागतील. पुरावा म्हणून हे ट्विट जपून ठेवा,” असं राहुल वैद्यने म्हटलं आहे.
I saw a photo today on Instagram. My wife sent it to me. And mark my words “In the coming years people will start posting nudes in the name of fashion or trend”! Save this tweet for evidence. 🐒 God bless us
— RAHUL VAIDYA RKV (@rahulvaidya23) May 11, 2022
राहुल वैद्यच्या ट्विटची चर्चा सुरू झाली असली, तरी त्याने नेमकं हे ट्विट कुणाला उद्देशून केलं असावं, याबद्दलही कयास लावले जात आहेत. अनेक लोकांना असं वाटतंय की, राहुल वैद्यच्या बोलण्याचा रोख उर्फी जावेदच्या दिशेनं असावा. कारण उर्फी जावेदने नवीन फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने न्यूड रंगातील अंतर्वस्त्र घातलेलं आहे.
फॅशन जगतात दररोज नवंनवे ट्रेंड येत आहेत. ट्रेंडी लूकच्या लाटेत लोकांच्या वेशभूषेतही अनेक बदल होत आहेत. पण, ग्लॅमरस आणि फॅशनच्या जगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक जण मर्यादा पार करताना दिसत आहे. फॅशनच्या नावाखाली तोकडे कपडे घालण्यावरून राहुल वैद्यने मत मांडलं आहे.
नवी दिल्ली –
आपल्या देशात असे अनेक आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी आपल्या कार्याने देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. आयएएस होणे ही काही सोपी गोष्ट नाही, रात्रंदिवस मेहनत आणि अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अनेक परीक्षा दिल्या जातात. यानंतरच एखादा आयएएस अधिकारी होतो आणि त्याला देशसेवेची संधी मिळते. याशिवाय अनेक आयएएस अधिकारीही त्यांच्या अनेक कामांमुळे चर्चेत असतात. झारखंड केडरच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने टाकलेल्या छाप्यापासून प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. मात्र, याआधीही त्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आल्या आहेत. चला तर मग आम्ही तुम्हाला पूजा सिंघलच्या लाइफस्टाइलबद्दल सांगतो. चला, जाणून घेऊ या.
पूजा सिंघल चर्चेत का आहेत ?
सध्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल चर्चेत आहेत कारण रांची येथील त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमारच्या घरातील छाप्यांमध्ये २० कोटींहून अधिक रोख जप्त करण्यात आली आहे.
सिंघल यांच्या लग्नाचीही जोरदार चर्चा
आयएएस अधिकारी पूजा सिंघल त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आल्या होत्या. वास्तविक, त्यांचे लग्न झारखंड कॅडरआयएएस राहुल पुरवार यांच्याशी झाले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि नंतर पूजा सिंघलने एका व्यावसायिक रुग्णालयाचे मालक अभिषेक झांसोबत लग्नगाठ बांधली.
हे नाव आधीच घोटाळ्याशी जोडले गेले आहे
पूजा सिंघलची पोस्टिंग १६ फेब्रुवारी २००९ ते १४ जुलै २०१० पर्यंत खुंटी येथे होती. यादरम्यान त्यांच्यावर १८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. यामध्ये २०२० मध्ये राम विनोद सिन्हा याला अटक करण्यात आली होती, ज्यामध्ये पूजा सिंघलचे नावही तपासादरम्यान समोर आले होते.
अगदी लहान वयात बनल्या आयएएस
पूजा सिंघलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्या २००० च्या बॅचच्या आयएएस अधिकारी झाल्या. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले होते. तरुण वयात आयएएस अधिकारी झाल्याबद्दल त्यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही नोंदवले गेले. पण सध्या IAS अधिकारी पूजा सिंघल यांच्यावरील आरोपांमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पुन्हा एकदा त्यांची कारकीर्द पूर्वीप्रमाणेच वादात अडकताना दिसत आहे.
जर आपण IAS अधिकारी पूजा सिंघलच्या कार कलेक्शनबद्दल बोललो, तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या सरकारी वाहनच वापरतात. पण याशिवाय त्यांच्याकडे टोयोटा कंपनीची कार आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस अधिकारी पूजा सिंघलच्या नेट वर्थबद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची नेट वर्थ 20-50 लाख इतकी आहे.
मुंबई –
साधारणपणे असे बरेच लोक आहेत जे ४०-४५ वय ओलांडल्याबरोबर स्वत:ला म्हाताऱ्यांच्या श्रेणीत मोजू लागतात. अशा लोकांनी वयाची साठी ओलांडल्यानंतरही तंदुरुस्त असलेल्या बॉलिवूड कलाकारांकडून प्रेरणा घ्यावी. बॉलिवूडमध्ये स्वत:ला फिट ठेवण्यासाठी कलाकार खूप मेहनत घेतात. हे कलाकार स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळतात आणि फिटनेसच्या बाबतीत तरुण कलाकारांना मात देतात. आज आम्ही तुम्हाला ७० आणि ८० च्या दशकातील अशा कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना पाहून तुम्ही त्यांच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.
१. अनिल कपूर
अभिनेते अनिल कपूर ६५ वर्षांचे झाले आहेत. पण त्यांचा फिटनेस पाहता असे अजिबात वाटत नाही. ते त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दररोज वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. ज्यावरून ते स्वत:ला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेतात हे कळते. अनिल कपूर तंदुरुस्त राहण्यासाठी सायकलिंग, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग आणि वेट लिफ्टिंग करतात.
२. सुनील शेट्टी
फिटनेसच्या बाबतीत अण्णा म्हणजेच सुनील शेट्टीही मागे नाहीत. ते त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांचे फोटोही शेअर करत असतात. ज्यावरून ते स्वत:ला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेतात हे स्पष्टपणे दिसून येते. सुनील शेट्टी ६० वर्षांचे झाले आहेत आणि त्यांच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी काटेकोर आहाराचे पालन करतात. यासोबतच ते योगा आणि जिममध्येही खूप घाम गाळतात.
३. शरत सक्सेना
अभिनेता शरद सक्सेना त्यांच्या फिटनेसमुळे चर्चेत राहतात. त्यांनी नुकतीच इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये ते त्यांचे बायसेप्स दाखवताना दिसत आहे. याशिवाय ते बॅक, शोल्डर, ट्रायसेप्स आणि चेस्ट ट्रेंड करताना दिसले. ७१ वर्षीय शरत सक्सेना यांनी सांगितले की, या वयात स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ते रोज २ तास व्यायाम करतात. मला स्वत:ला ५०-५५ वर्षांचे दिसावे लागेल, अन्यथा मला काम मिळणार नाही, असे ते म्हणाले.
४. संजय दत्त
संजय दत्त ६२ वर्षांचे असून ते त्यांच्या फिटनेसची खूप काळजी घेतात. अभिनेता तुरुंगात असताना पाण्याच्या बादल्या भरून व्यायाम करत असे. असे करून त्यांनी जेलमध्येच सिक्स पॅक ऍब्ज बनवले होते. त्याचवेळी, आता उपचारानंतर ते पुन्हा त्यांच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांच्या व्यायामाच्या दिनचर्येबद्दल बोलताना, ते कार्डिओ-व्हस्क्युलर बाइक, डंबेल, क्रंच आणि एरोबिक व्यायाम करतात. याशिवाय ते काटेकोर आहारही पाळतात.
५. सनी देओल
सनी देओलचा ‘ढाई किलो हाताचा’ डायलॉग तुम्हाला आठवत असेलच. त्यावेळी सनी देओल आजच्याइतकेच फिट होते. ६५ वर्षीय सनी तंदुरुस्त राहण्यासाठी सकाळी आणि दुपारी स्पोर्ट्स ग्राउंडमध्ये वेटलिफ्टिंग करतात. अभिनेत्याने म्हटले होते की फिटनेस हे त्यांच्यासाठी एक व्यसन आहे आणि जर त्यांनी एक दिवस व्यायाम केला नाही तर त्यांना संपूर्ण दिवस फ्रेश वाटत नाही.
६. अनुपम खेर
अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या फिजिकल चेंजेसचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्यांचा फिटनेस पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. यासोबतच त्यांनी फिटनेसचे महत्व तसेच जीवनशैलीबद्दल सांगितले. या वयातही चाहत्यांनी त्याच्या फिटनेसचे खूप कौतुक केले.
नवी दिल्ली –
पत्रकारितेकडे पूर्वी चांगला कमाईचा व्यवसाय म्हणून पाहिले जात नव्हते. पण आता असे नाही आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, प्रसिद्ध समालोचकही पत्रकारितेच्या क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहेत. चला तर, जाणून घेऊया भारतातील टॉप सात सर्वाधिक मानधन घेणारे न्यूज अँकर कोण आहेत ते.
१. अर्णब गोस्वामी
अर्णब रंजन गोस्वामी हे रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संपादक आहेत. अर्णब गोस्वामी हे भारतातील हायेस्ट पेड न्यूज अँकर आहेत आणि त्यांचा वार्षिक पगार सुमारे १२ कोटी आहे. ४७ वर्षीय अर्णब गोस्वामी मूळचे गुवाहाटीचे आहेत. ते एक स्पष्टवक्ते पत्रकार म्हणून ओळखले जातात आणि बातम्या सांगण्याची करण्याची त्यांची शैली खूप आगळी आहे. “द नेशन वॉन्ट्स टू नो” आणि “पुछता है भारत” सारख्या शोमध्ये त्यांची चमकदार पत्रकारिता पाहिली आहे.
२. राजदीप सरदेसाई
भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या पत्रकारांच्या यादीत राजदीप सरदेसाई दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा वार्षिक पगार १० कोटी रुपये आहे. त्यांची अप्रतिम संवादशैली आणि तर्क मांडण्याची कला त्यांना एक वेगळी ओळख देते. कधीकधी, ते ग्राउंड लेव्हल रिपोर्टिंग देखील कव्हर करतात. ते सध्या इंडिया टुडे ग्रुपचे सल्लागार संपादक आहेत, तसेच इंडिया टुडे टेलिव्हिजनचे अँकर आहेत.
३. निधी राजदान
निधी राजदान भारतातील टॉप हायेस्ट पेड न्यूज अँकरच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या त्या एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ संपादक आणि लोकप्रिय न्यूज अँकर आहेत. त्या ‘एनडीटीव्ही 24×7 न्यूज शो’ आणि ‘लेफ्ट, राइट अँड सेंटर’ या कार्यक्रमाच्या मुख्य अँकर आहेत. त्यांनी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून पत्रकारितेची पदवी घेतली आहे. त्यांचा वार्षिक पगार सुमारे ४ कोटी रुपये आहे.
४. रजत शर्मा
हायेस्ट पेड न्यूज अँकरमध्ये पुढचे नाव आहे रजत शर्मा यांचे. जे इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक आहेत. त्यांचा टीव्ही शो ‘आप की अदालत’ खूप लोकप्रिय आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचा वार्षिक पगार ३.६ कोटी रुपये आहे.
५. श्वेता सिंग
भारतातील हायेस्ट पेड न्यूज अँकरच्या यादीत श्वेता सिंगचाही समावेश आहे. त्या एक सुप्रसिद्ध न्यूज अँकर तसेच ‘आजतक’मधील विशेष कार्यक्रमांच्या कार्यकारी संपादक आहे. खेळाशी संबंधित बातम्या कव्हर करण्याच्या कौशल्यासाठी त्या प्रसिद्ध आहे. याशिवाय त्या ग्राउंड रिपोर्टिंगही करतात. त्यांना वर्षाला सुमारे ३.४ कोटी रुपये मानधन मिळते.
६. सुधीर चौधरी
सुधीर चौधरी सध्या ‘झी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आहेत. ते ‘डेली न्यूज अँडऍनालिसिस’ या वृत्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. त्यांना २०१३ साली “हिंदी प्रसारण” या श्रेणीतील उत्कृष्ट पत्रकारितेसाठी रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा वार्षिक पगार सुमारे ३ कोटी रुपये आहे.
७. रवीश कुमार
‘एनडीटीव्ही इंडिया’चे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार हे हायेस्ट पेड न्यूज अँकर आहेत. बातम्या मांडण्याची त्यांची खास पद्धत आहे.ते अनेक लोकप्रिय कार्यक्रम होस्ट करतात. त्यापैकी प्रमुख कार्यक्रम म्हणजे ‘प्राइम टाइम’, ‘रवीश की रिपोर्ट’ आणि ‘देश की बात’. त्यांचा वार्षिक पगार सुमारे २.४ कोटी आहे.
हाँगकाँगमध्ये जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याचा लिलाव करण्यात आला आहे. याचा लिलाव फाइन आर्ट्स कंपनी सोथबीजने केला आहे. कंपनीने म्हटले आहे की १५.१० कॅरेट स्टेप कट रत्न आहे ज्याला ‘द डी बियर्स कलिनन ब्लू’ असे नाव देण्यात आले आहे. या हिऱ्याचा लिलाव आठ मिनिटे चालला. हा हिरा खरेदी करण्यासाठी चार जणांनी बोली लावली होती. चला जाणून घेऊया जगातील सर्वात मोठा हिरा कोणी विकत घेतला?
या बोलीमध्ये चार जणांचा सहभाग होता, मात्र एका अज्ञात व्यक्तीने ही बोली जिंकली. एका अज्ञात व्यक्तीने हिरा खरेदी करण्यासाठी ४८ दशलक्ष डॉलर म्हणजेच तब्ब्ल ४.४ अब्जची सर्वाधिक बोली लावली.
हा दुर्मिळ हिरा २०२१ साली सापडला होता. दक्षिण आफ्रिकेतील कुलीनन खाणीत सापडलेल्या या हिऱ्याला रंगीत हिऱ्यांमध्ये सर्वोच्च स्थान मिळाले आहे. अमेरिकेच्या जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटने या हिऱ्याला ‘फॅन्सी व्हिव्हिड ब्लू’ म्हणून वर्गीकृत केल्याचे सोथेबीजने नोंदवले आहे.संस्थेला आतापर्यंत पाठवलेल्या सर्व निळ्या हिऱ्यांमध्ये त्याची रंगीत प्रतवारी सर्वोच्च पातळीवर आहे. आतापर्यंत फक्त एक टक्का हिऱ्यांची प्रतवारी सर्वोच्च आहे. सोथबीजने नोंदवले आहे हा हिरा विलक्षण दुर्मिळ आहेत.
आतापर्यंत १० कॅरेटपेक्षा जास्त आकाराच्या पाच रत्नांचा लिलाव झाल्याचे सांगण्यात आले आहे. कधीही, कोणतेही रत्न १५ कॅरेटपेक्षा जास्त नसतो. या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घटना म्हणजे या सर्वात मोठ्या हिऱ्याचा लिलाव.
सर्वात महागडा हिरा होण्याचा विक्रम चुकला !
जगातील सर्वात महागड्या हिर्याचे नाव ‘ओपेनहाइमर ब्लू’ असून तो 14.62 कॅरेटचा आहे. या हिऱ्याचा 2016 मध्ये $57,541,779 (4,404,218,780 रुपये) लिलाव झाला होता. डी बियर्स कलिनन ब्लू डायमंडचा लिलाव $57,471,960 किंवा 4.4 अब्ज रुपयांना झाला आहे. या हिऱ्याच्या लिलावात आणखी 70,000 डॉलर्सची भर पडली असती तर जगातील सर्वात महागडा हिरा होण्याचा विक्रम केला असता.
पिंपरी –
देशातील अनेक राज्यांमध्ये मागील काळात तापमान वाढीबरोबरच जोरदार उष्ण वाऱ्यांमुळे उष्णता वाढली आहे. उन्हाळ्यात ही काही नवीन गोष्ट नाही. सध्या देशाच्या अनेक भागात तापमान ४० अंश किंवा त्याहून अधिक आहे. हवामानातील ही तापमानवाढ म्हणजे आपल्या माणसांमुळे पर्यावरणाची होणारी हानी आणि वाढते प्रदूषण यांचाही परिणाम आहे. मात्र, हवामान कोणतेही असो, तापमान कितीही जास्त असो, नियमित ऑफिसला जाणाऱ्या किंवा कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना रणरणत्या उन्हामुळे विविध समस्या, व्याधींना सामोरे जावे लागते. उष्माघात ही एक सामान्य समस्या वाटत असली तरी या प्रकरणात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काळजी न घेतल्यास ही समस्या जीवघेणीही ठरू शकते.
उष्माघाताचा धोका
उष्माघात म्हणजे शरीर जास्त गरम होते. बहुतेकदा हे अशा लोकांना होते जे दीर्घकाळ तीव्र सूर्यप्रकाश आणि उच्च तापमानाच्या थेट संपर्कात असतात. यामुळे, शरीराचे तापमान 104 अंश फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा जास्त होऊ शकते. या स्थितीमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात, ज्याबद्दल लोकांनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे.
उष्माघाताचा मेंदूवरही परिणाम होतो
वाढलेल्या तापमानाचा वाईट परिणाम शरीराच्या इतर भागासह मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे, मनाची स्थिती आणि वर्तनात असंतुलन देखील उद्भवू शकते. बोलता बोलता तोतरेपणा, चिडचिड, गोंधळ, अस्वस्थता ही लक्षणे सामान्य आहेत. अशा परिस्थितीत त्वरित प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. मानसिक स्थितीवर लक्ष ठेवण्यासोबतच इतर लक्षणेही लक्षात ठेवा. जसे शरीराचे तापमान वाढणे, शरीरातील कमी आर्द्रता आणि कोरडी त्वचा, घाम येणे कमी होणे, अस्वस्थता आणि उलट्या होणे, त्वचा लाल होणे, जलद श्वास घेणे आणि हृदयाचे ठोके वाढणे आणि डोकेदुखीच्या समस्येवर या दिवसात विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
उष्माघात झाल्यास काय करावे?
उष्माघाताची लक्षणे दिसू लागताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. उपचार मिळेपर्यंत रुग्णाला घरामध्ये किंवा सावलीच्या ठिकाणी ठेवा. शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करा. पाण्याने भरलेल्या टबमध्ये किंवा शॉवरखाली उभे राहा. रुग्णाच्या कपाळावर, मानेवर, काखेत ओले टॉवेल, बर्फाचे पॅक इत्यादी ठेवा. या उपायांनी शरीराचे तापमान नियंत्रित करता येते.
या गोष्टी देखील लक्षात ठेवा :
. उष्णतेमुळे शरीरावर अनेक प्रकारे दुष्परिणाम होऊ शकतात, सतत संरक्षण करणे आवश्यक आहे.
. उन्हाळ्यात जास्त कपडे घालून घराबाहेर पडू नका. तुम्ही साध्या सुती कपड्यांवर उन्हाळी कोट किंवा सुती कापडाचा पातळ थर देखील घालू शकता.
. स्वतःला हायड्रेटेड ठेवा. पाणी, नारळपाणी, ताक इत्यादी प्यायला ठेवा.
. दारू आणि सिगारेटपासून दूर राहा.
. काही औषधे तुमच्या शरीरातील ओलावा टिकवून ठेवण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणू शकतात. त्यामुळे तुम्ही सतत कोणतेही औषध घेत असाल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
पिंपरी –
सडपातळ किंवा स्लिम दिसण्याची इच्छा प्रत्येकाला असते. पण जिम आणि व्यायामाशिवाय हे शक्य नाही. त्याने चरबी हळूहळू कमी होईल. पण जर तुम्हाला स्वतःला स्लिम आणि परफेक्ट लूकमध्ये दाखवायचे असेल, तर त्यासाठी काही ऍक्सेसेरीज आणि कपड्यांची मदत घेऊ शकता. योग्य ड्रेसिंग स्टाईल तुम्हाला सडपातळ दाखवण्यात खूप मदत करते. चला तर मग जाणून घेऊ या ऍक्सेसेरीजचा तुमच्या लुकवर कसा परिणाम होतो.
० दागिने
दागिने केवळ महिलांना सुंदर लुक देत नाहीत, तर त्याच्या मदतीने, आपण बारीक देखील दिसू शकता. ज्या महिलांची कंबर रुंद असते. त्यांनी असा नेकलेस निवडावा जो शरीराच्या वरच्या भागाकडे लक्ष वेधून घेतो. जर हार मोठा बटबटीत असेल तर कंबरेच्या भागावर लक्ष कमी असेल. यासोबतच जर तुमची बस्ट एरिया जास्त असेल तर तुम्ही गळ्यात लांब साखळ्या आणि पेंडेंट असलेले नेकलेस निवडा. जेणेकरून लोक बस्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत नाहीत आणि तुम्ही सडपातळ दिसता.
० काचेच्या बांगड्या
जर तुमचे हात लहान आणि जाड असतील तर तुम्ही क्वचितच बांगड्या किंवा ब्रेसलेट घालाव्यात. अशा हातांसाठी, फक्त पातळ डिझाइनच्या बांगड्या योग्य आहेत. नाहीतर सगळ्यांचे लक्ष हाताकडे जाते. दुसरीकडे, जर तुमचे हात लांब आणि जाड असतील तर तुम्ही भरपूर बांगड्या घालू शकता.
० बेल्ट
जर तुम्ही कर्वी फिगरच्या मालकीण असाल, तर बेल्ट या प्रकारच्या शरीराला एक ओव्हरग्लॉस बॉडी बनविण्यासाठी मदत करेल. रुंद कंबर सडपातळ दिसण्यासाठी गडद रंगाचा पातळ पट्टा काम करतो. त्याच वेळी, रुंद बेल्टच्या मदतीने, ते सडपातळ देखील दर्शविले जाऊ शकते.
० श्रग लेयरिंग
लोक म्हणतात की कोणत्याही ड्रेसवर जाकीट किंवा श्रग घातल्यास लठ्ठपणा अधिक दिसतो. पण तसे नाही. जर तुम्ही टी-शर्ट, टॉप किंवा कुर्ता घातलात, तर या सर्वांसह श्रग लेयरिंग करून तुम्ही हुशारीने लूक स्लिम बनवू शकता. ही एक अतिशय उपयुक्त कृती आहे.
० शेपवेअर
यासोबत योग्य शेपवेअर सोबत ठेवा. ज्याच्या मदतीने तुम्ही एक्सट्रा इंच कमी करू शकता. शेपवेअर मांड्या, कंबर आणि बस्ट भागांसह पोटाची चरबी लपवतात.
पिंपरी –
‘इंडस्ट्रियल स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून मोशी येथे आयोजित करण्यात आलेल्या “ज्योती इंडस्ट्रियल मॅरेथॉन’ ला पिंपरी-चिंचवाडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मॅरेथॉनमध्ये सुमारे अडीच हजार कामगार सहभागी झाले होते.
कामगारांच्या स्वास्थ्य जनजागृतीसाठी हे उद्दिष्ट ठेऊन आयोजित केलेल्या या स्पर्धेला मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे सकाळी ५:३० ला प्रारंभ झाला. त्या पाठोपाठ १० किमी व ५ किमी स्पर्धा चालू झाल्या. ह्या स्पर्धेत महिला, पुरुष, ४५+ महिला व ४५+ पुरुष असे विविध गट होते.
२१ किमी पुरुष गटात अभिषेक सोनी तर महिला गटात रेश्मा कावते यांनी प्रथम क्रमांक पटकावला. १० किमी गटात करण शर्मा तर महिला गटात प्रियांका चावरकर हे विजेते ठरले. ५ किमी गटात गौरव भोसले व महिलांमध्ये विनया मालुसरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ४५+ पुरुष गटात दीपक वाच्छानी, संजीव कुमार व अविनाश माने हे अनुक्रमे २१किमी, १०किमी व ५ किमी गटात विजेते ठरले. तसेच ४५+ महिला गटात मनीषा अगरवाल व प्रमोदिनी गडकरी ह्यांनी १०किमी व ५ किमी गटात विजेते पद पटकावले. बाल धावपटू काव्या देशमुख( वय ८) हिचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
ब्रिजस्टोन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते यांच्या हस्ते झेंडा दाखवून या मॅरेथॉनला प्रारंभ झाला. यावेळी मुख्य आयोजक क्रिएटिव्ह कंपोनंटचे संचालक सुभाष जयसिंघानी, रवी हिरेमठ, गुलमोहरचे संचालक अंकाजी पाटील, ज्योती सोल्यूशन्स वर्क्सचे संचालक नित्यानंद थेवर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा दरवर्षी कामगार दिनी भरवण्याचा निश्चय इंडस्ट्रिअल स्पोर्टस् असोसिएशनचे नित्यानंद थेवर यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी ही स्पर्धा अनेक शहरांमध्ये भरवण्याचे प्रयोजन असल्याचे त्यांनी नमूद केले.