पिंपरी-
आपल्या शरीरामध्ये 70 टक्के पाणी असते. हे पाणी आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असते. त्यामुळे आपण कोणत्या धातूच्या भांड्यातून पाणी पितो हे तेवढेच महत्त्वाचे असते. जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा आपण पाणी पिण्यासाठी वेगवेगळ्या धातूचे ग्लास किंवा पेल्याचा वापर करतो. काही लोक तांब्याच्या भांड्यात ओतून पाणी पितात, काही लोक मातीच्या भांड्यातून पाणी पितात, तर काही लोक काचेच्या भांड्यातून देखील पाणी पितात आणि काही लोक अजूनही स्टीलच्या भांड्यातून पाणी पितात. पण खरोखर ह्या गोष्टीने फरक पडतो का? शारीरिक मजबूती साठी कशातले पाणी पिणे योग्य? कोणत्या भांड्यातले पाणी आरोग्यासाठी असते वरदान? असे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतात. चला तर मग जाणून घेऊया या वेगवेगळ्या धातूंच्या भांड्यातून पाणी प्यायल्यास आपल्या शरीरावर काय आणि कसे परिणाम होतात. आणि कोणत्या भांड्यातून पाणी पिल्यास ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते.
मातीचे भांडे
मातीच्या भांड्यामध्ये एक खास गोष्ट असते. कारण मातीचा आणि पाण्याचा संबंध हा खूप जुना आहे, जसे की नदी, तलाव, समुद्र कुठे ना कुठे या दोघांचा मेळ पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे मातीमध्ये कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, पहिल्यापासूनच खूप जास्त प्रमाणात असते. हे मडके देखील मातीने भरलेले असल्यामुळे जी पोषकतत्वे मातीमध्ये आहेत ती सर्व पोषकतत्वे पाण्यामध्ये येतात. ते पुढे जाऊन आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरते. जर आपण मातीच्या मडक्याचे निरीक्षण केले तर आपल्याला एक गोष्ट दिसून येते की मातीचे मडके हे थोडे खडबडीत असते.
या मडक्याला छोटी-छोटी छिद्रे दिसून येतात. याच कारणामुळे हे मातीचे मडके नैसर्गिक फ्रीज म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे फ्रिजमध्ये थंड केलेले पाणी आणि मडक्यामध्ये थंड केलेले पाणी हे समान प्रमाणात थंड असते. फ्रिजच्या तुलनेत मडक्यातील थंड पाणी आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू देत नाही. तांब्याचे भांडे

आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की खरंच तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला काही फायदे होत असतील का? तांब्याला इंग्रजी मध्ये कॉपर या नावाने ओळखले जाते. जसे की कॅल्शियम आणि आयरन आपल्या शरीरासाठी मुख्य घटक आहेत. त्याचप्रमाणे कॉपर देखील आपल्या शरीरासाठी एक पोषक तत्व आहे. पण जर आपण रोज तांब्याच्या भांड्यात ओतून पाणी पीत असू तर तांब्याच्या भांड्यातील गुणधर्म आपोआप पाण्यामध्ये येतात. त्यानंतर हे पाणी शरीरामध्ये जाऊन आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो तसेच अनेक आजारांशी लढायचे काम करते.त्याचप्रमाणे जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवतो तेव्हा पाण्यातील छोटे छोटे किटाणू, बॅक्टेरिया मरून जातात आणि आपल्याला स्वच्छ पाणी मिळते. आठ ते बारा तास आपण तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी साठवून ठेवू शकतो. आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. मात्र तांब्याच्या भांड्यामध्ये कधीच लिंबू किंवा विनेगर टाकू नये कारण यामध्ये एसिडीक तत्त्वे असतात आणि ही तत्वे पाण्यात मिसळल्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातून आपल्याला साधे पाणी प्यायचे आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून फ्रीजमध्ये ठेवू नका. यामुळे तांब्याचे भांडे लवकर फुटण्याची शक्यता असते. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही दररोज तांब्याच्या भांड्यात पाणी पीत असाल तर कधीतरी एक महिना किंवा एक आठवडा यामध्ये गँप ठेवणे गरजेचे आहे कारण चांगल्या गोष्टी देखील जास्त प्रमाणात घेणे धोकादायक असते. जर आपल्या शरीरामध्ये कॉपरची मात्रा वाढल्यामुळे आपल्या शरीराला दुसरे आजार होऊ शकतात.
काचेचे आणि स्टिलचे भांडे
हे दोन्ही प्रकारचे धातू पाण्यामध्ये लवकर मिसळत नाहीत. त्यामुळे तुम्ही या भांड्यांमध्ये गरम पाणी टाकून ते तुम्ही पिऊ शकता. म्हणजेच तुम्ही या दोन्ही धातूंच्या भांड्यांमध्ये जसे पाणी टाकाल तसेच पाणी तुम्हाला प्यायला मिळते. त्यामुळे आपण जर सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यात ओतून पाणी प्यायले तर ते जास्त फायदेशीर ठरते. आणि गरमीच्या दिवसांमध्ये तुम्ही मातीच्या भांड्यातील पाणी प्यायले तर ते जास्त फायदेशीर ठरते.