मुंबई –
साधारणपणे असे बरेच लोक आहेत जे ४०-४५ वय ओलांडल्याबरोबर स्वत:ला म्हाताऱ्यांच्या श्रेणीत मोजू लागतात. अशा लोकांनी वयाची साठी ओलांडल्यानंतरही तंदुरुस्त असलेल्या बॉलिवूड कलाकारांकडून प्रेरणा घ्यावी. बॉलिवूडमध्ये स्वत:ला फिट ठेवण्यासाठी कलाकार खूप मेहनत घेतात. हे कलाकार स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळतात आणि फिटनेसच्या बाबतीत तरुण कलाकारांना मात देतात. आज आम्ही तुम्हाला ७० आणि ८० च्या दशकातील अशा कलाकारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना पाहून तुम्ही त्यांच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.
१. अनिल कपूर
अभिनेते अनिल कपूर ६५ वर्षांचे झाले आहेत. पण त्यांचा फिटनेस पाहता असे अजिबात वाटत नाही. ते त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दररोज वर्कआउटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. ज्यावरून ते स्वत:ला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेतात हे कळते. अनिल कपूर तंदुरुस्त राहण्यासाठी सायकलिंग, हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग आणि वेट लिफ्टिंग करतात.
२. सुनील शेट्टी
फिटनेसच्या बाबतीत अण्णा म्हणजेच सुनील शेट्टीही मागे नाहीत. ते त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांचे फोटोही शेअर करत असतात. ज्यावरून ते स्वत:ला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेतात हे स्पष्टपणे दिसून येते. सुनील शेट्टी ६० वर्षांचे झाले आहेत आणि त्यांच्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी काटेकोर आहाराचे पालन करतात. यासोबतच ते योगा आणि जिममध्येही खूप घाम गाळतात.
३. शरत सक्सेना
अभिनेता शरद सक्सेना त्यांच्या फिटनेसमुळे चर्चेत राहतात. त्यांनी नुकतीच इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये ते त्यांचे बायसेप्स दाखवताना दिसत आहे. याशिवाय ते बॅक, शोल्डर, ट्रायसेप्स आणि चेस्ट ट्रेंड करताना दिसले. ७१ वर्षीय शरत सक्सेना यांनी सांगितले की, या वयात स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ते रोज २ तास व्यायाम करतात. मला स्वत:ला ५०-५५ वर्षांचे दिसावे लागेल, अन्यथा मला काम मिळणार नाही, असे ते म्हणाले.
४. संजय दत्त
संजय दत्त ६२ वर्षांचे असून ते त्यांच्या फिटनेसची खूप काळजी घेतात. अभिनेता तुरुंगात असताना पाण्याच्या बादल्या भरून व्यायाम करत असे. असे करून त्यांनी जेलमध्येच सिक्स पॅक ऍब्ज बनवले होते. त्याचवेळी, आता उपचारानंतर ते पुन्हा त्यांच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांच्या व्यायामाच्या दिनचर्येबद्दल बोलताना, ते कार्डिओ-व्हस्क्युलर बाइक, डंबेल, क्रंच आणि एरोबिक व्यायाम करतात. याशिवाय ते काटेकोर आहारही पाळतात.
५. सनी देओल
सनी देओलचा ‘ढाई किलो हाताचा’ डायलॉग तुम्हाला आठवत असेलच. त्यावेळी सनी देओल आजच्याइतकेच फिट होते. ६५ वर्षीय सनी तंदुरुस्त राहण्यासाठी सकाळी आणि दुपारी स्पोर्ट्स ग्राउंडमध्ये वेटलिफ्टिंग करतात. अभिनेत्याने म्हटले होते की फिटनेस हे त्यांच्यासाठी एक व्यसन आहे आणि जर त्यांनी एक दिवस व्यायाम केला नाही तर त्यांना संपूर्ण दिवस फ्रेश वाटत नाही.
६. अनुपम खेर
अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या फिजिकल चेंजेसचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये त्यांचा फिटनेस पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. यासोबतच त्यांनी फिटनेसचे महत्व तसेच जीवनशैलीबद्दल सांगितले. या वयातही चाहत्यांनी त्याच्या फिटनेसचे खूप कौतुक केले.