“मी इन्स्टाग्रामवर आज एक फोटो बघितला. माझ्या पत्नीने मला पाठवला होता. माझे शब्द लक्षात ठेवा, येणाऱ्या काही वर्षात फॅशन आणि ट्रेंडच्या नावावर लोक न्यूड फोटो पोस्ट करायला लागतील. पुरावा म्हणून हे ट्विट जपून ठेवा,” असं राहुल वैद्यने म्हटलं आहे.
I saw a photo today on Instagram. My wife sent it to me. And mark my words “In the coming years people will start posting nudes in the name of fashion or trend”! Save this tweet for evidence. 🐒 God bless us
— RAHUL VAIDYA RKV (@rahulvaidya23) May 11, 2022
राहुल वैद्यच्या ट्विटची चर्चा सुरू झाली असली, तरी त्याने नेमकं हे ट्विट कुणाला उद्देशून केलं असावं, याबद्दलही कयास लावले जात आहेत. अनेक लोकांना असं वाटतंय की, राहुल वैद्यच्या बोलण्याचा रोख उर्फी जावेदच्या दिशेनं असावा. कारण उर्फी जावेदने नवीन फोटो शेअर केले आहेत. त्यात तिने न्यूड रंगातील अंतर्वस्त्र घातलेलं आहे.
फॅशन जगतात दररोज नवंनवे ट्रेंड येत आहेत. ट्रेंडी लूकच्या लाटेत लोकांच्या वेशभूषेतही अनेक बदल होत आहेत. पण, ग्लॅमरस आणि फॅशनच्या जगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक जण मर्यादा पार करताना दिसत आहे. फॅशनच्या नावाखाली तोकडे कपडे घालण्यावरून राहुल वैद्यने मत मांडलं आहे.