पिंपरी –
देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थान संस्थान राज्य सरकारने ताब्यात घ्यावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. देहू नगरीमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात भाजप पदाधिकार्यांनी राजकीय रंग दिला याला देहू संस्थान विश्वस्तांनी मूक संमती दिली. धार्मिक कार्यक्रम असताना राज्य सरकारचे प्रतिनिधी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांना भाषण करून दिले नाही. तसेच मावळचे माजी आमदार बाळा भेगडे व देहू संस्थांचे पदाधिकारी यांनी स्थानिक आमदार सुनील शेळके व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना निमंत्रण न दिल्याचे दिसून आले.
काल झालेल्या धार्मिक कार्यक्रमात देहू संस्थानने राजकारण केले. कार्यक्रमाच्या स्टेजवरती ठराविक नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दोन नंबरचे स्थान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे होते. तसा ट्रू कॉल दिल्ली मधून पंतप्रधान कार्यालयातून संस्थांनाला मिळाला होता. कार्यक्रम ठिकाणी स्वागत भाषण राज्याचे विरोधी पक्षनेते व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. या नंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले.
यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगूनही कार्यक्रमात अजित पवार यांना भाषणासाठी बोलू दिले नाही. देव संस्थानच्या वतीने संबंध नसतानाही नागपूरच्या आमदारांना भाषण करण्याचा मान दिला. मात्र पुण्यातील भूमिपुत्र असणाऱ्या उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना मात्र डावलल्याने भूमीपुत्रांचा अपमान झाला असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी बोलताना व्यक्त केले.