आत्महत्या कलेल्या मयतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) आदींचा समावेश आहे.
माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घऱात राहत होते. दोघांनी आपल्या कुटुंबासह एकाच वेळी आत्महत्या केली. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार वनमोरे यांच्या डोक्यावर आर्थिक बोजा होता म्हणूनच सर्व कुटुंबाने विष प्राशन करून आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे.
माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे हे पुढील चाैकशी करत आहेत.