पुणे –
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शेफ विष्णु मनोहर आयोजित ट्रान्सकुक कुकरी कॉम्पिटिशन फॉर तृतीयपंथी महिला थाटा माटात साजरी झाली. पुण्यातून सहा तृतीयपंथीयांनी स्वतःला सिद्ध करत शेफ ही पदवी मिळवली. जिल्हास्तरावर संपन्न झालेल्या या कुकरी कॉम्पिटिशनमध्ये पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर अशा पाच शहरातून तृतीयपंथी यांनी सहभाग घेतला होता. पुण्याच्या टीमचे नेतृत्व कादंबरी यांनी केलं होतं.
प्रथम क्रमांकावर दीड तासात तब्बल 12 डिश बनविण्याचा विक्रमी रेकॉर्ड पुण्याच्या टीम निगार शेख आणि निकीता मुख्यदल यांनी पटकाविला. तर पुण्याच्या संतोषी कदम आणि तलाश ठाकूर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मोनिका राजपूत आणि शायना खुडे यांनी लज्जतदार पदार्थ बनवून परीक्षकांची मन जिंकली.
विष्णु जी की रसोई (पुणे – नागपूर) प्रस्तुत ह्या कॉम्पिटीशन चे पार्टनर स्व. मोरूभाऊ सातपुते होते, (स्मृती बहुउद्देशीय संस्था नागपूर), एम. जी. एम. युनिव्हर्सिटी – शेफ्स अनलिमिटेड तृतीयपंथी यांचा आवाज ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथी महिला कादंबरी (पुणे), यांची मोलाची साथ लाभली. तृतीया फाऊंडेशन हडपसर, आणि मंगलमुखी कीन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणेच्या सभासद असून तृतीयपंथी यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा तसेच विविध उपक्रमातून रोजगार, संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे अखंडित काम सुरू आहे.
विजेत्यांना शेफचा ड्रेस, सर्टिफिकेट आणि रोख रकमेचे बक्षिस देण्यात आले. तृतीयपंथीयांसाठी रोजगार हमी आणि आवड जोपासण्यासाठी विविध कुकरी उपक्रम करण्याचे आश्वासन विष्णु मनोहर यांनी दिले.