कधीकधी आकाशात विचित्र घटना घडताना दिसतात. आता याच दरम्यान चीनच्या आकाशात अशी घटना घडली आहे ज्याने लोक हैराण झाले आहेत. चीनच्या झौशान शहरात आकाशाचा रंग लाल झाला आहे. ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे शहर कोरोनाने त्रस्त असलेल्या शांघायच्या जवळ आहे.आकाशात रक्तासारखा लाल रंग पाहून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. पुढे मोठा अनर्थ होणार आहे का? लोक सर्व प्रकारच्या गोष्टींचा अंदाज लावत आहेत. आता लाल आकाशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शनिवारी चीनमधील संपूर्ण झौशान शहरात आकाश लाल दिसू लागले. हा व्हिडिओ चीनमधील एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. अनेक लोक या घटनेला अशुभ म्हणत आहेत. चला जाणून घेऊया चीनमधील लाल आकाशामागील कारण काय आहे?
आता लोक या नैसर्गिक चमत्काराला कोरोना व्हायरसशी जोडून पाहत आहेत. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने विचारले आहे की कोणता तरी मोठा विध्वंस येणार आहे का? अनेक वापरकर्त्यांनी लाल आकाशाचे कारण विचारले आहे. अनेक लोक याला काही येऊ घातलेल्या धोक्याशी जोडून पाहत आहेत.
सोशल मीडियावर एका यूजरने म्हटले आहे की, सात दिवसांत भूकंप होणार आहे. तर दुसर्या वापरकर्त्याने म्हटले आहे की जग संपणार आहे आणि लवकरच होलोकॉस्ट येऊ शकेल. तर अनेकांनी त्याचे वर्णन समृद्धीचे प्रतीक म्हणून केले आहे.
जाणून घ्या लाल रंगाच्या आकाशाचे सत्य काय आहे?
चीनच्या स्थानिक माध्यमांनी आकाशाच्या लाल रंगाबाबतच्या अफवांचे खंडन केले आहे. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे हा प्रकार घडल्याचे चिनी माध्यमांकडून सांगण्यात येत आहे. चीनच्या सरकारी मीडियाने म्हटले आहे की, चांगल्या हवामानामुळे वातावरणात असलेल्या अतिरिक्त पाण्यापासून एरोसोल तयार होतात. यामुळे, मासेमारी नौकांचा प्रकाश विखुरलेला आणि अपवर्तित होतो, ज्यामुळे आकाश लाल दिसते. चला तर, हा व्हिडिओ पाहुयात.
A red sky appears near Shanghai China pic.twitter.com/sdUCm42ECs
— RawNews1st🎥📰 (@Raw_News1st) May 7, 2022