मुख्य सरन्यायाधिशांची खंत, जबाबदारीने वागण्याचा सल्ला
रांची – ज्येष्ठ न्यायाधिशांना निर्णय घेणे अवघड असणार्या अनेक प्रकरणात माध्यमे ‘अनधिकृत न्यायालये’ चालवत असल्याची खंत देशाचे सरन्यायाधिश एन. व्ही. रमणा यांनी व्यक्त केली.
रांची येथील एका कार्यक्रमात शुक्रवारी बोलताना न्या. रमणा यांनी, न्यायालयीन कामकाजावरील माध्यमांमध्ये होणारी सुनावणी आणि समाज माध्यमांमध्ये न्यायाधिशांविरूध्द होणारा प्रचार याबद्दल चिंता व्यक्त केली. न्यायाधिशांच्या ‘आरामदायी जीवना’विषयी फूगवून काही गोष्टी पसरवल्या जात असतात. त्यावेळी न्याय करणे ही सोपी आणि सहज गोष्ट रहात नाही, असे ते म्हणाले.
न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणाबाबत माध्यमांमध्ये माहिती नसताना, एकतर्फी आणि ठरवून घडवलेल्या चर्चांमुळे न्यायदानावर परिणाम होत आहे. माध्यमांच्या नव्या प्रकारात विकसित होण्याची प्रचंड क्षनता आाहे. मात्र, सध्या त्यांमध्ये चुक किंवा बरोबर, चांगले किंवा वाईट आणि सत्य किंवा असत्य यातील फरक ओळखण्याची क्षमता नसल्याचे दिसून येते, असेही निरीक्षण रमणा यांनी नोंदवले.
मुद्रीत माध्यमांमध्ये अद्याप काही उत्तरदायित्वाची भावना आहे. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये शून्य उत्तरदायित्व असते. जणू ते काही दाखवतात ते हवेतच विरून जात असते. वारंवार होणारे उल्लंघन आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक अस्वास्थ्य यामुळे माध्यामांवर अधिक कडक नियम आणि आचारसंहितेची मागनी होत आहे. मात्र माध्यामांनीच शब्द जपून वापरावेत आणि स्वत:च बंधने घालून घ्यावीत, हे त्यांच्यासाठी योग्य राहील, असा सल्लाही त्यांनी दिला.
न्यायधिश कदाचित तातडीने व्यक्त होत नसतील, पण ही त्यांची कमजोरी किंवा असहायता समजू नका, जेंव्हा स्वातंत्र्याचा वापर जबाबदारी केला जातो त्यावेळी बाह्य निर्बंधाची गरज नसते अशा शब्दात त्यांनी माध्यमांना उपदेश केला.