पत्रकार परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी नवाब मलिक यांच्या रिमाड कॉपीवर आक्षेप घेतला. ‘नवाब मलिक यांच्या रिमांड कॉपीमध्ये ते महसूलमंत्री असताना हा घोटाळा झाल्याचा उल्लेख केला आहे. नवाब मलिक पाच वेळा मंत्री होते. पण ते महसूल मंत्री कधीच नव्हते. महाराष्ट्राच्या जनतेला हे कळलं पाहिजे की कशा प्रकारे विरोधकांचा गळा घोटला जातो. जो माणूस त्या पदावरच नव्हता, त्याला त्या पदावर दाखवण्याची चूक एवढी मोठी तपास यंत्रणा करते, हे खेदजनक आहे’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीनं ‘असं’ राजकारण कधीच पाहिलं नाही !
रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजाराला हादरा बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2702 अंकांच्या घसरणीसह 54,530 वर बंद झाला आणि या वर्षातील आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाचीही दिवसभर खराब स्थिती होती. निफ्टी 815 अंकांच्या मजबूत घसरणीसह 16,227 वर बंद झाला.
० लाल चिन्हावर सुरुवात केली
तत्पूर्वी, सेन्सेक्सने 1850 अंकांच्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात केली. तथापि, काही काळानंतर त्यात काही सुधारणा दिसून आली आणि घसरण 1430 अंकांवर आली. पण रशिया आणि युक्रेनच्या बातम्या समोर आल्याने बाजारातील घसरण तीव्र झाली. एकेकाळी बीएसई सेन्सेक्स 2800 अंकांनी घसरला होता. आज या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे नऊ लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले आहेत. दुसरीकडे, युद्धाचा परिणाम निफ्टीवरही दिसून येत असून तो 414 अंकांच्या घसरणीसह 16,648 च्या नीचांकी पातळीवर उघडला आणि दिवसभर लाल चिन्हावर व्यवहार करत राहिला.
० सलग सहा दिवस घट
गुरुवारी बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की बुधवारी, शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजाराने हिरव्या चिन्हावर सुरुवात केली, परंतु बाजार सुरुवातीच्या रॅलीमध्ये टिकू शकला नाही आणि लाल चिन्हावर बंद झाला. 30 शेअर्सचा सेन्सेक्स 68 अंकांनी घसरून 57,232 वर बंद झाला, तर निफ्टी 29 अंकांनी घसरून 17,063 वर बंद झाला. गेल्या सहा दिवसांपासून बाजार सतत लाल चिन्हावर बंद होत आहे.
मुंबई –
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून नवाब मलिक हे नाव चांगलंच चर्चेत आलं. पण हे नाव महाराष्ट्राला नवं नाही. अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या राजकारण नवाब मलिकांचं नाव घेतलं गेलं. गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे त्यांना एकदा तर आपलं मंत्रिपदही सोडावं लागलं होतं. ऐन तारुण्यात लोकसभा निवडणूक लढवलेल्या नवाब यांच्या आयुष्याचा प्रवास अतिशय रोचक आहे. नवाब मलिक नेमके कोण आहेत? एक भंगारवाला ते महाराष्ट्राचे मंत्री हा एवढा मोठा टप्पा त्यांनी कसा गाठला ? सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील महत्त्वाचा चेहरा असलेल्या नवाब मलिक यांच्याबाबतीत ‘या’ गोष्टी जाणून घेऊया !
. नवाब मलिकांचं मूळ उत्तर प्रदेशात, पण त्यांच्या जन्माआधीपासून नवाब मलिकांचे वडील मुंबईत स्थायिक, पण काही कारणास्तव पुन्हा उत्तर प्रदेशात गेले. 20 जून 1959 रोजी उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातल्या उतरौला तालुक्यातील दुसवा गावात नवाब मलिक यांचा जन्म झाला.
. मलिक कुटुंबीयांचा पहिल्यापासूनच भंगारचा व्यवसाय होता. मुंबईतील डोंगरी परिसरात मलिक कुटुंब वास्तव्यास होते. 21व्या वर्षी मलिकांचा मेहजबीन यांच्याशी विवाह झाला. नवाब मलिक यांना फराज, आमीर दोन मुलं, तर निलोफर आणि सना या दोन मुली.
. विद्यार्थी आंदोलनापासून नवाब मलिक सक्रिय होते. मुंबई विद्यापिठाच्या फीवाढीविरोधातील आंदोलनापासून राजकारणात रुची निर्माण झाली.
. नवाब यांनी वयाच्या 25 व्या वर्षी 1984 साली पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. गुरुदास कामत यांच्याविरोधात उभे राहिलेल्या मलिकांना 1984च्या लोकसभा निवडणुकीत अवघी 2620 मतं मिळाली.
. 1996 फेरनिवडणुकीत मात्र साडेसहा हजार मतांच्या फरकानं मलिकांचा विजय झाला आणि विधानसभेत प्रवेश झाला. 1999 साली पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला. त्यानंतर गृहनिर्माण राज्यमंत्रिपदावरही त्यांची वर्णी लागली.
. समाजवादी पक्षातील अंतर्गत मतभेदांना कंटाळून मलिक यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आणि 2001 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
. 2008 साली नवाब मलिक पुन्हा एकदा मंत्रिपदावर आले.
मुंबई –
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. सकाळी ६ वाजता नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ‘पीएमएलए’ अर्थात मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायदा, २००२ अंतर्गत ईडीने अटक केली आहे.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आले आहेत. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीची टीम नवाब मलिक यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती.
‘देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू’ असा इशारा नवाब मलिक यांनी या अगोदर दिला होता.
‘आम्ही लढू आणि जिंकू !’- नवाब मलिक
‘अटक केली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू,’ अशी प्रतिक्रिया दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आठ तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयाबाहेर आल्यावर दिली. मलिक कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यालयाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. नवाब मलिकांना जेजे रूग्णालयाकडे नेण्यात आलं आहे.
‘अनिल देशमुख यांच्यानंतर मलिक आणि नंतर अनिल परब. उद्धव ठाकरे सरकारच्या सर्व घोटाळेबाजांना हिशोब द्यावा लागेल.’ अशा शब्दांमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नवाब मलिक यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावरून नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई – माजिद मेमन
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत येण्याची घाई लागल्यामुळे केवळ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवाब मलिक यांच्यावर त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले आणि त्या आरोपांच्या आधारावर ईडी कारवाई करत आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार माजिद मेमन यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच, नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन घेतल्याचे प्रकरण १७ वर्षानंतर जर बाहेर काढले जात असेल तर न्यायाधीशांकडूनही हा प्रश्न विचारला जाईल. न्यायालय तपास अधिकाऱ्यांचे कान धरतील, असेही माजिद मेमन यावेळी म्हणाले.
निसार खान यांची क्राइम पेट्रोलमधील सर्वोत्तम पोलिस अधिकाऱ्यांमध्ये गणना होते. निसार खान एका एपिसोडसाठी 1.5 लाखांपर्यंत शुल्क आकारतात.
संजीव त्यागी
संजीव त्यागी यांनी क्राइम पेट्रोलच्या 200 हून अधिक भागांमध्ये काम केले आहे. एका एपिसोडसाठी ते 1 लाखांपर्यंत शुल्क आकारतात.
मनीष राज शर्मा
मनीष राज शर्मा क्राइम पेट्रोलमध्येही खूप लोकप्रिय आहे. मनीष एका एपिसोडसाठी 80 हजार रुपये आकारतो.
गीतांजली मिश्रा
क्राईम पेट्रोलमध्ये गीतांजली मिश्रा अधिकतर बोल्ड पात्रे साकारते आणि त्यासाठी ती मोठी रक्कम घेते. तिने शोमध्ये सर्व प्रकारची पात्रे साकारली आहेत.ती नकारात्मक पात्रांसाठी 1.5 लाखांपर्यंत शुल्क आकारते.
देविका शर्मा
देविका शर्माची गणना क्राईम पेट्रोलच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. देविकाला एका एपिसोडसाठी 1 लाखपर्यंत मानधन मिळते.
शाश्विता शर्मा
क्राईम पेट्रोलमध्ये शश्विता शर्मा लेडी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसत आहे. ती एका एपिसोडसाठी 1.2 लाख रुपये घेते.
मुंबई –
बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डचे नाते नेहमीच जवळचे राहिले आहे. अनेक नायिका अंडरवर्ल्डच्या लोकांशी मैत्री करत आहेत. त्यामुळे अनेकवेळा त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक नायिकांच्या करिअरला ग्रहण लागले जेव्हा त्यांचे अंडरवर्ल्ड गुंडांशी मैत्रीचे किस्से प्रसिद्ध झाले. चला एक नजर टाकूया बॉलिवूडच्या अशा सुंदरींवर, ज्यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन फिदा होते.
० मंदाकिनी- दाऊद इब्राहिम
‘राम तेरी गंगा मैली’मध्ये धबधब्याखाली आंघोळ करून चर्चेत आलेली मंदाकिनी दाऊदच्या खूप जवळ होती. दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. मात्र, मंदाकिनीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचा दाऊदशी कोणताही संबंध नाही. दाऊदसोबतच्या अफेअरनंतर मंदाकिनीचे फिल्मी करिअरही संपुष्टात आले.
० ममता कुलकर्णी- छोटा राजन
ममता कुलकर्णी ही दाऊदचा साथीदार डॉन छोटा राजनची गर्लफ्रेंड होती, त्यामुळे तिला बॉलिवूडमध्ये पाय रोवणे सोपे झाले. बॉलीवूडमध्ये एक बोल्ड अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या ममताने चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले, मात्र तितक्याच जलद कारकिर्दीचा शेवट केला. इतकेच नाही तर ड्रग माफिया विकी गोस्वामीसोबत तिची जवळीक वाढू लागली आणि त्यानंतर दोघांनी लग्नही केले. 2016 मध्ये, ममता कुलकर्णी आणि पती विकी गोस्वामी यांना केनिया विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी ममताची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
० अनिता अयुब – दाऊद इब्राहिम
पाकिस्तानी अभिनेत्री अनिता अयुबने बॉलिवूडमध्ये विशेष काही केले नाही पण ती दाऊद इब्राहिमच्या खूप जवळ होती. अनिता अयुबला प्रसिद्ध निर्माते जावेद सिद्दीकी यांनी आपल्या चित्रपटात कास्ट करण्यास नकार दिल्याने दाऊदने जावेदची हत्या केल्याचे सांगितले जाते.
० मोनिका बेदी – अबू सालेम
मोनिका बेदी तिच्या चित्रपटांपेक्षा दाऊदचा उजवा हात म्हटल्या जाणार्या अबू सालेमवरील प्रेमामुळे चर्चेत राहिली. त्याने मोनिकालाही चित्रपटात काम मिळवून दिले. दोघे पोर्तुगालमध्ये अनेक वर्षे एकत्र राहिले. या प्रेमापोटी मोनिकाला तुरुंगात जावे लागले.
हैदराबाद –
दाक्षिणात्य चित्रसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून महेश बाबूला ओळखले जाते. महेश बाबूने अभिनयासोबत आपल्या डॅशिंग पर्सनॅलिटीने चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झालेला हा अभिनेता अभिनेत्री नम्रता शिरोडकरला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला होता. महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर हे जोडपे सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. या दोघांविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.
महेशबाबूची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. काही दिवसांपूर्वी नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आस्क मी एनिथिंग’ द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी तिला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतही महेश बाबू यांच्याबद्दलही अनेकांनी तिला प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची तिनेही उत्तरे दिली.
यादरम्यान एका चाहत्याने नम्रताला प्रश्न विचारला, ‘महेशबाबू मराठीमध्ये बोलू शकतात का?’ त्यावर तिने मजेशीर उत्तर दिले आणि सोबतच तिने तिच्या मनातील इच्छाही बोलून दाखवली. चाहत्याच्या या प्रश्नावार उत्तर देताना ती म्हणाली, ‘माझीसुद्धा फार इच्छा आहे. पण माझ्या दोन्हीही मुलांना मराठी येते. त्यासोबत त्यांना इंग्रजी आणि तेलुगू भाषाही बोलता येते’, असे तिने सांगितले. चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर महेश-नम्रताने १० फेब्रुवारी २००५ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली. मात्र महेश बाबू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार झाला. महेश आणि नम्रताला दोन मुलं असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नाव आहेत.
मुंबई –
एसएस राजमौलीच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चीत ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 25 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्यु.एनटीआर, रामचरण आणि आलिया अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. तर सुपरस्टार अभिनेता अजय देवगणही या सिनेमात महत्वाची भूमिका बजावत आहे.
कोरोनाचा प्रत्येक क्षेत्राप्रमाणेच चित्रपटसृष्टीवरही मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे जिम, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल अशी सर्व गर्दीची ठिकाणे बंद होती. अलीकडे सर्व काही रुळावर येऊ लागले. दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या आपला चित्रपट पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत नाहीत. ओमिक्रॉन संकटाच्या काळात हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा बिग बजेट चित्रपट आहे. यामध्ये दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील अनेक नामवंत स्टार्स एकत्र काम करताना दिसणार आहेत. राजामौली यांनी त्यांच्या निर्णयाचे कारण स्पष्ट केले आणि सांगितले की त्यांचा पीरियड ड्रामा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट असून, हा सिनेमा जुलै 2020 मध्येच रिलीज होणार होता, पण कोरोना आणि प्रोडक्शन विलंबामुळे या सिनेमाच्या रिलीजला आधीच विलंब झाला आहे. त्यामुळे दिग्दर्शक राजामौली यांना त्यांच्या निर्णयावर ठाम राहायचे असून, आता या चित्रपटासाठी ते कोणताही धोका पत्करण्यास तयार आहेत.
मुंबई –
प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. आज पहाटे ३.३० वाजता त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. रवीनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी चाहत्यांना दिली आहे.
रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी चाहत्यांना दिली आहे. रवीनाने तिच्या वडिलांसोबत फोटो शेअर करत “तुम्ही नेहमी माझ्याबरोबर चालत रहाल, मी नेहमीच तुमची असेन, मी कधीही तुम्हाला जाऊ देणार नाही. लव्ह यू बाबा,” असे कॅप्शन तिने दिले.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, रवी टंडन हे मागील काही काळापासून त्यांना फुफ्फुसाचा त्रास होता. फुफ्फुसातील फायब्रोसिस नावाच्या आजाराने ते त्रस्त होते. यामुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता.
रवी टंडन यांनी ७० आणि ८० च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले होते. ‘खेल खेल में’, ‘मजबूर’, ‘अनहोनी’, ‘खुद्दार’, ‘जिंदगी’, ‘नजराना’, ‘एक मैं और एक तू’, ‘जवाब’, ‘आन और शान’, ‘निर्माण’, ‘झूठा कहीं का’, ‘चोर हो तो ऐसा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्यांनी आपला चित्रपटसृष्टीत ठसा उमटवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी दिग्दर्शन कारकीर्दीची सुरूवात केली आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच निर्मिती केली. १९६० मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह इन शिमला’ या चित्रपटात ते अभिनेता म्हणून देखील झळकले होते.
मुंबई –
प्रेम ही जगातील सर्वात पवित्र भावना आहे. प्रेम ही एकच गोष्ट आहे जी माणसाला दुसऱ्या माणसाशी बांधते. पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी यांच्यातील प्रेम कमी होऊ लागले की एकमेकांमधील अंतर वाढू लागते, असे अनेकदा दिसून येते. अशा वेळी प्रेमाऐवजी मारामारी होऊ लागते. नात्यात दुरावा येऊ लागतो. अंतर इतके वाढते की तिसरी व्यक्तीही त्यांच्या नात्यात ढवळाढवळ करू लागते. नात्यात दुरावा येण्यामागे अनेक कारणे असू शकतात, परंतु पुरुष आपल्या जोडीदाराला सोडून दुसऱ्या स्त्री मैत्रिणीकडे आकर्षित होऊ लागल्याचे दिसून येते. याचीही अनेक कारणे असू शकतात. साधारणपणे असे दिसून येते की काही काळानंतर पुरुषांना जोडीदारामध्ये पूर्वी दिसणारे आकर्षण दिसत नाही. अर्थात, सर्व पुरुष सारखे नसतात. अशा परिस्थितीत महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, मात्र आता घाबरण्याचे काहीच नाही. प्रेमात फसवणूक झालेल्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चला जाणून घेऊया काय आहे ती आनंदाची बातमी?
खरे तर शास्त्रज्ञांनी पत्नी किंवा मैत्रिणीसोबत फसवणूक करणाऱ्या किंवा ‘बेवफाई’ करणाऱ्या पुरुषांसाठी एक अनोखे औषध बनवण्याची योजना आखली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, एंडोक्राइन सोसायटीच्या जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्राइनोलॉजी अँड मेटाबॉलिझममध्ये एक अभ्यास अहवाल प्रकाशित झाला आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की ज्या पुरुषांना हायपरसेक्सुअल नावाचा आजार आहे ते त्यांच्या पार्टनरला जास्त फसवतात.
वास्तविक, स्त्री-पुरुषांच्या शरीरात ऑक्सीटोसिन हा हार्मोन आढळतो. सामान्यतः याला लव्ह हार्मोन असेही म्हणतात. या संप्रेरकामुळे विरुद्धलिंगी व्यक्तीकडे आकर्षण वाढते. जेव्हा या हार्मोनचे प्रमाण वाढते तेव्हा अशी समस्या उद्भवते, ज्यामुळे एक व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तींकडे आकर्षित होते.
या संशोधनादरम्यान 100 पुरुषांची निवड करण्यात आली, त्यापैकी 64 पुरुष असे होते ज्यांच्यामध्ये हायपरसेक्सुअल डिसऑर्डर अधिक आढळून आले. तर 38 पुरुष असे होते जे सामान्य होते, म्हणजेच शरीरात अशी कोणतीही समस्या नव्हती. अभ्यासात असेही सांगण्यात आले आहे की शरीरात ऑक्सिटोसिनचे प्रमाण जास्त असल्यानेच लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक करतात. ऑक्सिटोसिन आणि अतिलैंगिकता यांचा थेट संबंध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, शास्त्रज्ञांचा दावा आहे की जर आपण असे औषध बनवले तर शरीरातील ऑक्सीटोकिकचे प्रमाण कमी केले जाऊ शकते ज्यामुळे पुरुष महिलांची फसवणूक करू शकत नाहीत. अभ्यासात असेही आढळून आले की ज्या पुरुषांना संज्ञानात्मक वर्तन थेरपी मिळाली त्यांच्यामध्ये ऑक्सिटोसिन आणि हायपर सेक्सुअल डिसऑर्डरचे प्रमाण कमी झाले. मात्र, ऑक्सिटोसिनचे प्रमाण औषधाशिवायही कमी करता येऊ शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.